गुलमोहोराचे फूल

Submitted by Asu on 12 May, 2019 - 12:44

गुलमोहोराचे फूल

गुलमोहोराचे फूल कलंदर
न्याहाळता सूक्ष्म निरंतर
दिसले अजब प्रेम प्रकरण
लाल केशर प्रेम उधळण

पंच पाकळी मृदु सिंहासनी
बसली मध्ये स्त्रीकेसर राणी
की लाल केसरी भव्य सदनी
रांगोळी घालिते पित अंगणी

पती सभोती दश-पुंकेसर
बांधुन पित पागोटे डोईवर
रक्षण करण्या दक्ष पतीवर
प्रेमे उधळती पराग पत्नीवर

प्रेमाची ही अजब कहाणी
हिंदोळत होती पानोपानी
गात होती प्रेमाची गाणी
हिरव्या हिरव्या गार रानी

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults

मी या आधी पण काही कविता पोस्ट करतांना फोटो टाकायचा प्रयत्न केला होता. पण जमले नव्हते.
मला या कवितेबरोबर गुलमोहराच्या फुलाचा फोटो पोस्ट करायचाच आहे. कारण त्या फोटो शिवाय ही कविता नीट समजणार नाही. तरी तो कसा करायचा कृपया कोणी मार्गदर्शन करेल का ? .