सुपर्ण तरुंच्या छायेतील तो गाव मजला लाभला...

Submitted by दत्तप्रसन्न on 9 May, 2019 - 19:46

निस्पंद सारे होऊनि
थांबुनी मी आहेच ना
सुपर्ण तरुंच्या छायेतील
तो गाव मजला लाभला

गावात त्या अनोळखी
पाऊलवाट एक भेटली
अखंड गोष्टी सांगुनी मजला
मनातले काही बोलली

जुनी बहू पुराणी ती
मार्ग दावूनि श्रमली परी
असंख्य वाटसरुंची जी
पायधूळ होऊनि राहिली

तीच कथा सुपर्ण छायेची हि
कान्हाची मुरली जिने ऐकिली
अबोल अविरत शांत राहुनी
श्रान्तवित उभी पांथस्थां ती

झुळझुळणाऱ्या नदीकाठी
एक दगडही भेटला भला
म्हणाला दयार्द नजरेतुनी
सांगूकारे माझी कथा

कितीएक पक्षी येति
अंगाखांद्यावर माझ्या बसती
किलबिल किलबिल करुनि संगे
पाणी पिउनि उडून जाती

वाट बघत मग बसतो त्यांची
अचल कठीण दिसलो जरी
भेटणार कधी माझी पिले
एकच आस उरे मनी

निरोप घेता गहिवरुनि
भाग्य वाटे अशासाठी कि
गावातील त्या सुहृदांची
आगळी वेगळी भेट झाली...एक आगळी वेगळी भेट झाली.

Group content visibility: 
Use group defaults