--पडका प्रासाद माझा--

Submitted by Nilesh Patil on 6 May, 2019 - 12:41

--पडका प्रासाद माझा--

पडका प्रासाद माझा कधी महाल झाला,
विचार मवाळ होता तोही जहाल झाला..।

झाला त्रास थोडा ही जींदगी सुधारतांना,
बघून प्रगतीस माझ्या मोठा सवाल झाला..।

मी कुठे मरणास हो येथे तयार होत होतो,
नाही कळले जन्म कधी हा बहाल झाला..।

प्रश्न होता जींदगीचा कसे जगावे आता,
मीच तेथे भावनांचा मोठा दलाल झाला..।

होता जिथे भरला बाजार दुःख अन कष्टाचा
सारेच सहन करण्यास तेथे हवाल झाला..।

--निलेश पाटील,--
--पारोळा,जि-जळगाव--
--मो.९५०३३७४८३३--

Group content visibility: 
Public - accessible to all site users