या शद्बांनो परत फिरा रे...

Submitted by श्यामा on 6 May, 2019 - 03:57

या शद्बांनो परत फिरा रे....

हे शब्दांनो,वाग्देवीच्या पुत्रानो
माझ्या मनाची गुपित सांभाळणरया सख्यांनो
असे रुसु नका रागऊ नका, परत फिरा रे

या नश्वर देहाने टिपलेल्या अनुभवांना तुम्हीच बदललत अक्षरात
इंद्रधनुचे रंग वेचून भरलेत माझ्या मनात
तुमचच बोट धरुन केली सफर जगाची
चाखली चव न उमगलेल्याही भावनांची
माझ्याही प्रतिभेला फुलं येऊ लागली होती कवितेची

तुम्ही माझ्या विचारांना परजलत सजवलत
आखीव रेखीव बनवुन जगात आणलत
पण माझ चुकलं
नवं आकाश शोधता शोधता घरट मागे सुटल
मृगजळापाठी धावताना गंगेशी नातं तुटलं

आता भावना वाहून जातात कविता होण्याआधीच
विचार ओघाळून जातात शब्दरूप घेण्याआधिच
खुप काही सुचतय
खुप काही साठलय
पण शब्दांचा ओघ मात्र कधीचाच आटलाय
कोरा कागद हिणवतो मला
वाकुल्या दाखवतो माझ्या वांझोट्या प्रतिभेला

म्हणूनच विणवते शब्दांनो परत एकदा माझ्या कुशितून कविता बनून जन्म घ्या रे
या शब्दांनो परत फिरा रे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults