दूर निघून गेलेल्या बाबाकडून लाडक्या लेकीस...

Submitted by दत्तप्रसन्न on 4 May, 2019 - 15:54

डोळ्यात तुझ्या का पाणी
वाहते या सांजवेळी
येते आठवण का गं
कोवळ्या बालपणीची

होतो का स्पर्श बाबाचा
डोक्यांवर हात ठेवुनी
म्हणती खुशाल राहा
छान होणार सर्व राणी

थकलेले शरीर जरी
नजर होती मंदावली
डोळ्यात तरीही जपुनी
तुझी गोड गोड छबी

नको करूस काळजी
खिन्न राहू नको कधी
सुखात मी असणार आहे
लाभली तुझ्यासारखी परी

नको वाईट घेऊस वाटुनि
भेट अखेर राहिली जरी
असेन तुझ्याच सभोवती
जाणवेल योग्य समयी

आशीर्वाद सतत राहील
देउ अजून काय मी तरी ?
गालावर सतत राहूंदेत
छानशी हसरी खळी

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद आपल्या प्रतिसादा बद्दल.
बाबा मोकळेपणाने व्यक्त होऊ शकत नाही पण प्रेम आई एवढंच करत राहतो.
माझ्या एका मैत्रिणीच्या वडिलांचे गेल्या वर्षी निधन झाले. तिला संध्याकाळी भेटायला गेलो असताना, ती अप्पांच्या आठवणी सांगत होती आणि त्यावेळेस सहजच ह्या कवितेचा जन्म झाला.

वाह