फजिती

Submitted by वैशाली अ वर्तक on 3 May, 2019 - 14:08

फजिती

मला फार फुशारकी होती, म्हणजे आहेच की माझ्या इडल्या खूपच
हलक्या , स्पाँजी बनतात वा नेहमी बनतात असे म्हणा. म्हणजे सर्वांच्याच होत असतील पण मला माझ्या इडल्यांची ,छानच होतात अशी गोड समजूत आहेच.
मी माझ्या च तंद्रीत होते. आणि हो , हल्ली कसे तयार इडली ढोस्याचे
तयार वाटून पीठ , सर्वत्रच मिळू लागले आहे. तसे तेव्हा मिळत नव्हते त्यामुळे अचानक आता सारखे इडली ढोसे तयार करता येत नव्हते.
मी माझ्या अंदाजाने (कृतीने) तांदळाचा रवा व उडीद डाळ तीनास /एकच्या प्रमाणात घेउन, भिजवून, वाटून रात्री च मस्त इडली पीठ तयार करून ठेवले व रात्र भरात छान फरनटेशन (फसफसेल) होइल व इडल्या नक्कीच नेहमी सारख्याच मस्त होतील. या विचाराने , मी सर्वांना उद्या सकाळी अनायसे रविवार ,तर मस्त इडली चटणीचा ब्रेक फास्ट बर का!
असे घोषित पण केले .
रात्री आम्ही उद्या रजेचा दिवस म्हणून गप्पा करत बसलो. गप्पा छान रंगल्या. रात्री झोपण्या अगोदर अगदी मंद आचेवर दूध तापविण्यास ठेवले होते. ते तापले नंतर ते उतरवून थंड झाल्यावर फ्रीज मधे ठेवले . मग झोपायला जातांना अगदी बारिक गॕसवर ,ज्यावर दूध तापविले होते. त्या बर्नलवर इडलीच्या पीठाचे पातेले ठेवले की गॕस गरम होता तर उष्णतेने अजून छान फर्मनटेशन होईल.
सकाळी उठून कीचन मधे आले. चहाची तयारी करण्यासाठी गॕसवरून
पातेले खाली उतरविण्यास हात लाविला..,तर इडली पीठाचे पातेले गरम . ते कसे काय ? म्हणून झाकण सारून पाहिले ....तर काय ...? सर्व पीठाची एकच इडली . ती पण न फुगलेली .गॕस तसाच चालू राहिला,होता.अगदी लहान गॕस व पातेले भले मोठे त्यामुळे जळले नाही . पण माझ्या छान इडलीचा एकच इडलेश्वर झाला होता. सकाळच्या ज्या ब्रेक फास्टची मी फुशारकीने वाच्यता केली होती की माझी नेहमीचीच मस्त इडली चटणी नास्त्याला, त्याची पूर्ण वाट लागली होती.व चेष्टेचा विषय झाला व माझी खुशखूशीत फजीती झाली
वैशाली वर्तक

Group content visibility: 
Use group defaults

हा हा!
पण डेंजरस आहे हे. अजून काही झाले नाही हे नशीब.

थोड सत्य .थोड काल्पनिक . झोपायला जातांना कळल .मग सारे कवि विचार लिहायला विषय

आम्ही मित्रांनी रुमवर शिरा बनवायचा बेत केला होता. सगळ्यात जेष्ठ मित्र म्हणाले मला एकदम भारी शिरा बनवता येतो. मग भाऊंनी रवा भाजायला घेतला, तुप टाकलं. सोबत साखरही टाकली. रवा साखर जळून वास यायला लागला तर आम्हाला हाका मारुन म्हणाले, "अरे तिच्या. हे कसं काय झाले?" ओम फस् झाले शिरा प्रकरण.

मला वाटले होते तुम्ही चुकून इडली पीठाचे पातेले फ्रीज मध्ये तर दुधाचे गॕसवर ठेवले असेल. पण इथे भलतीच चूक झाली म्हणायची. एकदा रात्री माझ्याकडून सुद्धा असा उपद्व्याप घडला होता. रात्री उशिरा घरी आल्यावर साडेबाराला मंद आचेवर गरम करायला म्हणून ठेवलेले दुधाचे पातेले तसेच राहिले. पहाटे साडेतीन वाजता करपलेल्या दुधाच्या घरभर पसरलेल्या वासाने जाग आली तेंव्हा कळले.

आम्ही मित्रांनी पण शिरा करायचा ठरवलं.अर्थात सगळ्यात सोपा म्हणून.बाकीच्या दोघांनाही काहीच माहीत नव्हते.म्हणून मी पुढाकार घेतला.कारण आईने बनवताना बघितलं होतं, त्यामुळे व तव्हाच्या वयामुळे फुललेलं कॉन्फीडन्स. मग काय? घेतला रवा,घेतलं पाणी, टाकली साखर. पण बराच वेळ झाला स्टोव मोठा करून पण मोकळा व्हायच्या ऐवजी पिठलं रुपीच राहिला.
नंतर दोन-तीन दिवसांनी शेजारच्या कुटुंबाशी गप्पा मारताना त्यांच्या मुलीने विचारले रवा भाजला होता ना?
तेव्हा लक्षात आलं की आपण फक्त तेव्हढच विसरलो होतो.
अहमदाबादला गुजराती भाषेत डोसाला ढोसाच म्हणतात.
मी अहमदाबादी

आम्ही मित्रांनी पण शिरा करायचा ठरवलं.अर्थात सगळ्यात सोपा म्हणून.बाकीच्या दोघांनाही काहीच माहीत नव्हते.म्हणून मी पुढाकार घेतला.कारण आईने बनवताना बघितलं होतं, त्यामुळे व तव्हाच्या वयामुळे फुललेलं कॉन्फीडन्स. मग काय? घेतला रवा,घेतलं पाणी, टाकली साखर. पण बराच वेळ झाला स्टोव मोठा करून पण मोकळा व्हायच्या ऐवजी पिठलं रुपीच राहिला.
नंतर दोन-तीन दिवसांनी शेजारच्या कुटुंबाशी गप्पा मारताना त्यांच्या मुलीने विचारले रवा भाजला होता ना?
तेव्हा लक्षात आलं की आपण फक्त तेव्हढच विसरलो होतो.