बटरफ्लाय!

Submitted by अज्ञातवासी on 3 May, 2019 - 04:16

"ये बस."
"नाही ना."
"का नाही,"
"मूड नाही."
"अरे बस रे, काय घेशील?"
"ब्लॅक डॉग!"
"शेकन, नॉट स्टीर्ड?"
"येस."
"ते मार्टिनीसाठी असतं. तू ना, जास्त जेम्स बॉण्ड च्या मुविज बघत जाऊ नकोस."
"हम्म."
"परवा हाय वे वर अपघात झाला, भयानक होता तो."
"हम्म."
"त्या बाईकचा चकनाचूर झाला."
"तुला बोलायला हाच विषय मिळालाय का?"
"अरे रागवतोस काय, हे घे!"
....
"बोलणार आहे की नाही, की जाऊ मी."
"काय बोलावं तेच कळत नाही."
"अच्छा ऐक ना, बेडरूमची काच बसवलीस का तू?"
"हो परवाच."
"ओके... छान बसली ना?"
"तू असं का विचारतेय?"
"कारण अपघात झाला त्याच्या बाजूलाच आपण राहतो ना, म्हणून."
"काय... काय... संबंध... मला काय होतंय...."
"शांत झोप, कायमचा..."
"तू... तू..."
"तुझं आणि तुझ्या वाईफचं भांडण झालं, त्यात तू ब्लॅक डॉगची बॉटल काचेवर फेकून मारलीस. काच फुटली. तू नवीन ऑर्डर केलीस. दुसऱ्या दिवशी ते काच घेऊन आले, आणि हायवेवर थोड्यावेळ ठेवली. काचेवरचा सूर्यप्रकाश परावर्तित झाला, आणि त्या मुलाच्या डोळ्यावर पडला. त्याला समोरचं काहीच दिसलं नाही, आणि तो ट्रेलरला धडकला आणि मेला. हे सगळं तुझ्यामुळे घडलं. ही इज माय ट्रू लव."
"देवा, मूर्ख मुली, सायको."
त्याने धडपड केली, आणि थोड्यावेळात शांत झाला.
"आय लव पोईजन!"
तिने व्हिस्कीची दुसरी बॉटल फोडली. एका ग्लासात ओतली, आणि आस्वाद घेऊ लागली.
थोड्यावेळाने...
"मला काय होतंय? शीट... ही अल्वेज टोल्ड मी, एखाद्या दिवशी व्हिस्कीत विष घालून मी बायकोला मारणार आहे, बास्टर्ड!!!"
ती खाली कोसळली, कोसळताना रागात तिने व्हिस्कीची बॉटल समोरच्या काचेवर फेकून मारली.
-------
"हॅलो, नॅशनल ग्लास हाऊस?"
"बोला?"
"एक आठ बाय आठ ची १० एमएम ची काच मागवायचिये."
"कुठे, पत्ता द्या?"
"SHATTERED GLASS HOUSE, NEAR HIGH WAY....."

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथेचं जॉनर, नियो नॉयर क्राईम थ्रिलर.
ओपन इंडेड कथा.
(अंधाधून सारखी) बऱ्याच शक्यता आजमावता येतील,मी फक्त माझी शक्यता मांडतोय...

यात बराचसा प्रतिसाद ॲमीचा कॉपी करून मोडीफाय केलाय!

तर कथेत दोन पात्रे आहेत, एक स्त्री आणि एक पुरुष.
स्त्री ही पुरुषाशी अनैतिक संबंध असलेली, म्हणून त्याची बायको घरी नसताना त्याच्याकडे आलेली. बायको कुठंतरी गेली असेल, भांडणामुळे...
त्याआधी नवरा-बायकोचे भांडण झाले. त्यात त्यांच्या घराची काच फुटली.
काच मागवली. ती काही काळ घराबाहेर राहिली होती तेव्हा अपघात होऊन एक मुलगा मेला.
तो मुलगा या माणसाशी अनैतिक संबंध असलेल्या स्त्रीचा बॉयफ्रेंड होता. बदला घ्यायचा म्हणून तिने त्याच्या घरी जाऊन, व्हिस्कीत विष मिसळून त्याला मारले.
तिने दुसरया बॉटल मधली व्हिस्की घेतली, पण त्यातदेखील विष होतं कारण भांडणानंतर बायकोला मारायचा प्लॅन नवर्याने केलेला, त्यामुळे ती मेली.
काही दिवसांनी बायको आली, तिने या दोघांच्या डेड बॉडी बघितल्या,
थोडं स्थिरस्थावर झाल्यावर शेवटचा काच मागवण्याचा फोन काही दिवसानी केलेला.

ये बस."
"नाही ना."
"का नाही,"
"मूड नाही."
"अरे बस रे, काय घेशील?"
"ब्लॅक डॉग!"
"शेकन, नॉट स्टीर्ड?"
"येस."
"ते मार्टिनीसाठी असतं. तू ना, जास्त जेम्स बॉण्ड च्या मुविज बघत जाऊ नकोस."
"हम्म."
"परवा हाय वे वर अपघात झाला, भयानक होता तो."
"हम्म."
"त्या बाईकचा चकनाचूर झाला."
"तुला बोलायला हाच विषय मिळालाय का?"
"अरे रागवतोस काय, हे घे!"
....
"बोलणार आहे की नाही, की जाऊ मी."
"काय बोलावं तेच कळत नाही."
"अच्छा ऐक ना, बेडरूमची काच बसवलीस का तू?"
"हो परवाच."
"ओके... छान बसली ना?"
"तू असं का विचारतेय?"
"कारण अपघात झाला त्याच्या बाजूलाच आपण राहतो ना, म्हणून."
"काय... काय... संबंध... मला काय होतंय...."
"शांत झोप, कायमचा..."
"तू... तू..."
>>>>>
इथपर्यंत पूर्ण क्लिकबेट होतं, घटना तिच्या घरी घडतेय हे दाखवण्यासाठी!!!

"तुझं आणि तुझ्या वाईफचं भांडण झालं, त्यात तू ब्लॅक डॉगची बॉटल काचेवर फेकून मारलीस.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
इथे एक हिंट होती.

"मला काय होतंय? शीट... ही अल्वेज टोल्ड मी, एखाद्या दिवशी व्हिस्कीत विष घालून मी बायकोला मारणार आहे, बास्टर्ड!!!"
ती खाली कोसळली, कोसळताना रागात तिने व्हिस्कीची बॉटल समोरच्या काचेवर फेकून मारली.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
आणि हीही!

"हॅलो, नॅशनल ग्लास हाऊस?"
"बोला?"
"एक आठ बाय आठ ची १० एमएम ची काच मागवायचिये."
"कुठे, पत्ता द्या?"
"SHATTERED GLASS HOUSE, NEAR HIGH WAY....."
>>>>>
फक्त पोयटीक शेवटासाठी, आणि जमलं तर पुढचा भाग डेव्हलप करण्यासाठी लूज एन्ड!!
Wink

काय बोलु. You are great..
तुझा प्लॉट वाचण्याधी अशाप्रकारे विचार केला होता पण पटलाच नाय मनाला आणि तिथंच घोळ झाला. Sad

> इथपर्यंत पूर्ण क्लिकबेट होतं, घटना तिच्या घरी घडतेय हे दाखवण्यासाठी!!! > अच्छा! मला तेच वाटलेलं. म्हणून मी तिला शेजारीण करून टाकलं.

> स्त्री ही पुरुषाशी अनैतिक संबंध असलेली, म्हणून त्याची बायको घरी नसताना त्याच्याकडे आलेली. > या दोघांचे अनैतिक संबंध असतील का हा विचार मी डिस्कार्ड केलेला. केवळ मैत्रीदेखील असू शकते.

> आणि वाक्याचा सिक्वेन्स बरोबर आहे, तू सांगितलंस म्हणून मी पुन्हा पुन्हा चेक केलं, पण बरोबरच निघालं > हो तू सांगितलेल्या कथेनुसार पाहिलं तर बरोबर येतंय.

@चंपा - शांतपणे वाचा, नक्की कळेल! Happy
@अथेना - प्रतिसादासाठी धन्यवाद! आणि बऱ्याच दिवसांनंतर दिसलात मायबोलीवर

> स्त्री ही पुरुषाशी अनैतिक संबंध असलेली, म्हणून त्याची बायको घरी नसताना त्याच्याकडे आलेली. > या दोघांचे अनैतिक संबंध असतील का हा विचार मी डिस्कार्ड केलेला. केवळ मैत्रीदेखील असू शकते
>>>>>>>>>>>>>>>>>>>
हो, मैत्रीचा अँगल दिला तरी हरकत नाही...

तरीही!
"मला काय होतंय? शीट... ही अल्वेज टोल्ड मी, एखाद्या दिवशी व्हिस्कीत विष घालून मी बायकोला मारणार आहे, बास्टर्ड!!!"
>>>>>>
असं कुणी आपल्या स्पेशल मैत्रिणीलाच सांगेन, नाही का?

Wink

यात समतोल साधायचा असेल तर काचमागवू बायको मरायलाच हवीय.तिचं काच शोरूम वाल्याशी अफेअर असतं आणि त्याची बायको तिला मारते असं काही.
इथे 3 जण मेल्याने समतोल बिघडतोय ☺️☺️☺️
(हा आपला असाच रिकामवेळचा फालतुपणा)

उत्तर वाचल्यावर परत वाचली तेव्हा पटकन कळली. फक्त ते सुरूवातीचं अरे बस रे, काय घेशील हे कोण कोणास म्हणाले. त्याचं घर आहे आणि तो यजमानासारखा वागणारा गृहित धरला तर त्याने अगं बस गं असं म्हटलं पाहिजे.

Pages