आम्ही भारतीय

Submitted by वैशाली अ वर्तक on 2 May, 2019 - 07:51

विषय -- आम्ही भारतीय
12 वर्णीय

आम्ही कोण म्हणोनि काय पुसता
येता मनीं असा विचार जयाच्या
नागरिक च असे , तो भारताचा
नसा नसात देशभक्ती तयाच्या.

जिथे दिसे समता भाव सर्वत्र
असुनिया जाती न् धर्म अनेक
न करी कधी भेद भाव तयात
तोचि असे "आम्ही भारतीय " एक.

अभिमान हा , तयांना संस्कृतिचा
बाळकडू प्यायलेला संस्काराचा
परोपकारी जीव सदा तयाचा
भाव वसे सदा विश्व बंधुत्वाचा.

रक्ताचा एक ,थेंबही न सांडिता
विलीन केलीत संस्थाने अनेक
राखूनिया केवळ शब्दांचा मान
घडविला अखंड भारत एक.

अशी नांदे विविधतेत एकता
स्वातंत्र्य वीरांची किती गावी गाथा
लाल -बाळ-पालांची स्मृती जगता
भारतीयांची जी , उंचाविते माथा

घडविण्या बदल नव्या युगाचा
पाऊल भारतीयांचे पुढे सदा
आली कितीही परकीय संकटे
न डगमगे मन , तयांचे कदा.

.......वैशाली वर्तक.

Group content visibility: 
Use group defaults