--सावरु कसा मी--

Submitted by Nilesh Patil on 1 May, 2019 - 07:45

--सावरु कसा मी..--

माझ्या या मनाला सावरु कसा मी,
माझ्या या आसवांना आवरु कसा मी..।

थांबवूनी घे तु या निसटत्या क्षणांना,
बघूनी या फुलांना बावरू कसा मी..।

भटकून आलो मी शांत माळरानावर,
फुलांसमवेत आता या बहरु कसा मी..।

रात्रीस गोडशा स्वप्नांना उराशी बाळगूनी,
चंद्रावर या आकाशी लहरु कसा मी..।

कोण मी अन् काय असे ओळख माझी,
दुनियेत मोकळेपणाने वावरु कसा मी..।

बांधेन घरटे टुमदार म्हणतो मी मनाशीच,
संसार माझा उघडा हा पांघरु कसा मी..।

भूक भाकरीची ग्रासते पोटास माझ्या,
खडकाळ जमीन माझी नांगरु कसा मी..।

--निलेश पाटील,--
--पारोळा,जि-जळगाव--
--मो-९५०३३७४८३३--

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults