खुप क्युट दिसतेस तू रागावल्यावर

Submitted by प्रतिक सोमवंशी on 30 April, 2019 - 07:37

ए ऐक ना खूप cute दिसतेस तू रागावल्यावर
राग असतो इवलासा तुझा त्या तुझ्या इवल्याशा नाकावर
नजरेच्या कोपऱ्यातून तू माझी वाट बघत रुसून बसलेली असतेस कॉटवर
मीही पाहत बसतो तुला पण कंट्रोल करतो स्वतःवर
ए ऐक ना खूप cute दिसतेस तू रागावल्यावर
नाही जमत कधी कधी तुझे सगळे हट्ट पुरवायला
कधी नसतो ग खरच वेळ माझ्याकडे स्वतःशी सुद्धा बोलायला
तू असतेस नेहमीच सोबत म्हणून बर वाटत सगळं सांगायला
पण तू रुसलीस का कासावीस होत खूप माझ्या मनाला
ए ऐक ना खूप cute दिसतेस तू रागावल्यावर
पण बस झाल ना आता किती ठेवशील दूर स्वतःला भांडण झाल्यावर
कधी तरी विचार कर काय बितत असेल या हळव्या मनावर
तस आवडत तुझ रुसणं फुगण मला आणि हक्काने चिडणं माझ्यावर
हसन तुझं हट्ट पूर्ण करून नेहमी माझ्याकडून घेतल्यावर
©प्रतिक सोमवंशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users