तो मूर्ख म्हणाला मला

Submitted by मुग्धमानसी on 30 April, 2019 - 02:37

तो मूर्ख म्हणाला मला, असा लागला, जिव्हारी भाला...
तळपला असा अधिकार, अनाहूत वार, सवयीचा झाला!

तो मूर्ख म्हणाला मला....

तो मूर्ख म्हणाला मला, पावले जरा जरा अडखळली,
शून्यात बुडाली वाट, जळून पहाट, पुन्हा मावळली!

तो मूर्ख म्हणाला मला, खोल कुणीकडे, छेडला षड्ज,
शांतता अशी ओरडली, मौन बडबडली,
मनाची गाज!

तो मूर्ख म्हणाला मला, एवढे काय त्यात कोसळले?
तू तीच तोही तो तोच तेच शिरपेच पुन्हा पाजळले!

तो मूर्ख म्हणाला मला....

का मूर्ख म्हणाला मला? बोलले काय जरा नावडते?
की असे वागले या बुद्धीचे कौतुक सारे झडले?

मी बुद्धी माझी... मीच देह हा माझा
हा शब्दही माझा, दुखरा अर्थही माझा!

तो मुर्ख म्हणाला मला, असो.. ते काही अवचित नाही!
मी आहे जी मी असते जे ते कुणास उमगत नाही.

मी मूर्खही नाही, बुद्धीमानही नाही.
मी काही शब्दांतून प्रकाशत नाही!

तू मूर्ख म्हणावे मला, याहिवेगळा, कुठे सन्मान?
प्रतिसाद तुझा, अभिमान... तुझे मी भान!

Group content visibility: 
Use group defaults

फार दिवसांनी माबो वर काही टाकायचे धाडस केले. एकूण रागरंग बघता आता पुन्हा येथे फिरकणे नाही!

कवितेवरील प्रतिसादांसाठी धन्यवाद.

मुग्ध मानसी
कविता वाचून हे प्रतिसादातून गोंधळ घालत आहेत असे वाटून मायबोलीला टाटा करायचा प्रश्न आलाच कुठे ? इकडे काही आयडीमध्ये भलतीकडचे स्कोर सेटलमेंट सुरुय तेव्हा इग्नोर करा आणि खंतावु नका मनाला .... कवितेतून भावना प्रगट होणे सर्वाना जमत नाही तेव्हा लिहिण्याचे सोडु नका असे आवर्जून सांगू इच्छितो.

छान आहे कविता.

असंबद्ध प्रतिसदांकडे दुर्लक्ष करा. इथे लिहिणे थांबवू नका.
तुमच्या बऱ्याच कविता जबरदस्त आवडल्या आहेत इथे बहुतेकांना.

मुग्धमानसी
कृपया येथे कविता प्रकाशित करणे थांबऊ नका.
संपर्कातुन मेल केली आहे.

मुळात सर्वानी कौतुकच करावे हा समज चुकीचा आहे
कलाकाराला तेव्हडी जाण असावी

आणि माझी कवितेबद्दल जाण कमी आहे पण हि कविता आहे कि गझल ?
मला तरी नाही आवडली

मुग्धमानसी,
<<<एकूण रागरंग बघता आता पुन्हा येथे फिरकणे नाही!>>> हे असं काही तुम्ही लिहाल असं वाटलं नव्हतं. तुमच्या कविता लेख वाचुन तुमच्याबद्दल काही मत तयार झालेलं. इथले असंबंद्ध, रीकामटेकडे प्रतिसाद तुम्ही इतके मनावर घेतले याचं आश्चर्य वाटलं.

Once I asked to a manager of a firm, "sir, you're serving here for more than 30 years. And I know that there was a time when most of the members were against you. Still how could you continue here? why didn't you leave?"
He said, "I knew that I'm not wrong, they're wrong. Why should I leave? they were supposed to leave. And with this very thought I could continue here.."

बाकी कविता आवडली!
लिहीत रहा...

मु.मा. कृपया लिखाण सुरू ठेवा.आजकाल एखादा काडी टाकून बाजूला होतो व प्रतिसादकांची वेगळीच लढाई सुरू होते. धागा भरकटवणं हाच उद्देश असतो काहींचा.

छान आहे कविता.
असंबद्ध प्रतिसदांकडे दुर्लक्ष करा. इथे लिहिणे थांबवू नका.
तुमच्या बऱ्याच कविता जबरदस्त आवडल्या आहेत इथे बहुतेकांना.

>>>> +१

तो मुर्ख म्हणाला मला, असो.. ते काही अवचित नाही!
मी आहे जी मी असते जे ते कुणास उमगत नाही
>> हे ज्याला कळले त्याच्या इतका सुखी कुणीही नाही. तु लाख मुर्ख म्हण मला पण मज ठाऊक आहे मी तो/ती नाही.
कोणी मुर्ख म्हटल्याने आपण मुर्ख होत नाही तर मुर्ख कसे नाही हे आवेशाने सांगायला जातो तेव्हा तो मुर्खपणा असतो. ज्याच्याकडे जे असते तेच तो दुसऱ्याला देत असतो.
तात्पर्य-- लेखन थांबवू नका. आपल्या आनंदासाठी लिहा. इतरांना त्यातून काय घ्यायचे ते ते घेतील.

सुंदर. लेखन ही कला आहे पण एवढ छान लेखन सगळ्याना नाही जमत !

आपल्याच कवितेवरून २ ओळी आठवल्या त्या पुढील प्रमाने .....

" तो/ ती काहिही म्हणूदे मला,
त्याचे कोणास काय ईथे.
पण...
जिथे अतीरम्य फुले अगणित,
काटे ही वसती तिथे. "

जिथे साद तिथे प्रतिसाद, जिथे क्रिया तिथे प्रतिक्रिया.
लिहित रहा एवढच सांगायचय होत.

छान आहे कविता.
असंबद्ध प्रतिसदांकडे दुर्लक्ष करा. इथे लिहिणे थांबवू नका.
तुमच्या बऱ्याच कविता जबरदस्त आवडल्या आहेत इथे बहुतेकांना. >>>>+११११

धन्यवाद!

मी कसेही काहीही बोलले तरी मायबोलीवर लिहिल्याखेरिज रहात नसते. इथल्या टिकेने आणि स्तुतीने मी माणसात आले आहे. इथे माझी मुळात 'दखल' घेतली गेली आहे. This place is special to me.

_/\_

छान कविता
कवितेतला अनुप्रास भावला.
लिहीत राहा.