हुरहूर

Submitted by डॉ अशोक on 28 April, 2019 - 23:24

-- हुरहूर ------
*
हुरहूर कसली ही, जीवा लागलेली
उडे नीज तरी ना स्वप्न संपलेली !
*
कां होते असे, तुला पाहतांना
घसा कोरडा अन, तहान हरपलेली !
*
कर पास दैवा, परिक्षा जीवनाची
समोरी लक्ष्य अन, वाट हरवलेली !
*
उलटेच सदा सारे, इथे कां घडावे?
ठिणगीच विझवे, ही आग भडकलेली !

-अशोक

Group content visibility: 
Use group defaults