अखेरची भेट

Submitted by वैशाली अ वर्तक on 28 April, 2019 - 10:01

भेट अखेरची
वाढदिवसाचा दिवस . खर तर आता काही जन्म दिवस साजरा करण्याचे वय नाही . आणि तसे ही आपल्याकाळीं कुठे लहानपणी आजच्या सारखे वाढदिवस साजरे करायचे. सध्या तर वाढदिवस साजरे करण्याचे फॕडच झाले आहे. सकाळपासून आपण फोन जवळ अथवा फोन हाताशी घेऊन बसावे लागते . आणि whatsapp वर तर वाढदिनाच्या शुभेच्छा दुथडी भरुन वहात असतात. .....मग 2/4 तासांनी..... धन्यवाद देणाचे काम करावे लागते . .... अगदी तसेच तिचेपण चालले होते
तसे पहाता... तिचे फारसे लक्ष नव्हते.....येणा-या फोनकडे. पण काय करणार?
फोन तर घ्यावे लागत होते. व ओघाने बोलणे आलेच.
फोन आला की डोळ्यात पाणी तरारलेले, दाटलेला आवाज व समोरून सांत्वनाचे संभाषण. खरच आहे .दिवसच तसा तिच्या साठी तसाच होता.
सकाळी तिने चहा घेतल्यावर कपाटातून चार गुलाब डायरीत ठेवून वाळवून (वाळलेले आपल्यासाठी बर का! पण तिच्या साठी ते अजून तितकेच टवटवीत आहेत .)त्या फूलांची तयार केलेली फ्रेम हातात घेऊन , क्षणभर पहात असता नकळतच अश्रूंचा वर्षाव झाला होता.. हो ...तशीच आहेत ती फूले. तिला वाढदिनाच्या दिवशी, तिच्या मिस्टरांनी दिलेली फूले होती. तिने ती फूले प्राणापलीकडे जपलीत .व शेवटची आठवण नात्याने तिने त्या फूलांची फ्रेम करुन घेतली व ती फ्रेम तिला जवळ असली की मिस्टर अजून सोबत आहेत असे वाटते. त्यांच्या सहवासाचे मानसिक सुख तिला मिळते .
खरच 4/5 वर्षापूर्वी जन्मदिवस निमीत्याने दोघे एकत्र मस्त बाहेर जेवावयास गेले. आल्यावर एकत्र बसून निवांत नेहमी प्रमाणे गप्पा केल्यात
...तसेही त्यांच्यात वाद फारच कमी व्हायचे. ... फारच कमी जोडपी अशी असतील हल्लीच्या काळात , कीं वाद नाही होत. नक्कीच दोघे एकमेकास पूरक होते. वरूनच जोडी देवाने करून पाठविली होती म्हणायचे. एकदुजेके लिए म्हणतात ना तसे जोडपे होते. गप्पा झाल्यावर दुपारचा चहा घेऊन तिचे मिस्टर तिच्या संमतीने कल्ब मधे ब्रीज खेळावयास तिला येतो म्हणत निघाले.
येथे घरी संध्याकाळी दीर व वहीनी शुभेच्छा देण्यास व, संध्याकाळी एकत्र जेवण करुयात असे आमंत्रण देण्यास आले होते. दीर म्हणाला, असेही ,....तुम्ही , मियाबिबी सकाळी एकत्र जाऊन आलाच आहात .आता रात्री आपण एकत्र जेवुयात .असे ही आजकाल मुले परदेशात व मुली त्या सासरी .त्यामुळे दोघा दोघांनाच रहावे लागते.
हो ,चालेल की असे म्हणत तिने संमती पण दिली. तेवढ्यात फोन आला. भावजींनी फोन जवळ असल्याने त्यांनी फोन घेतला . आणि...... ऐकावे ते नवलच. धक्का देणारे ,आकाश कोसळल्या गत. तिचा दीर अस्वस्थ दिसला. फोन ठेवत ,तो म्हणाला ,"" दादाला हाॕस्पिटल मधे नेले आहे. आपल्याला तिकडेच निघावे लागेल .लगेच तीघे जण हाॕस्पिटलमधे पोहचले. पण दुर्दैव तिच्या मिस्टरांची ज्योत आधीच मालवली होती. सर्वच अचानक. नाही त्रास.... नाही दुःख... सर्वच अघटित.दिवसा दोघांनी दिवस छान मजेत घालविलेला. काय .... आणि संध्याकाळ,.. एकदम जोडीतील एक जीव होताचा नव्हता झाला . काय झाले असेल? कसा विश्वास ठेवायचा? .
आत्ता जातांना माझ्या सोबत स्वतःच्या हाताने बागेतील गुलाब फूले खुडून आणलीत काय !...आणि म्हणत
"हं ,हा एक गुलाब माझ्या लाडक्या मुली कडून हं ..,
हा एक तुझ्या लाडक्या मुलाकडून... आणि
ही ...नातंडांकडून ...आणि हे माझे स्वतःचे माझ्या प्रिय बायकोस
अशी ही फूले देत ,पुन्हा वाढदिनाच्या शुभेच्छा देत.हसत मुखाने निरोप घेत ,"येतो" म्हणत निघालेला, सदा active तिचा जोडीदार तिला कायमचा सोडून गेला होता. सहाजिकच ती शेवटची फूलांची वाढदिनाची भेट ठरली होती.तिने पण अगदी प्राणापलीकडे जपली आहे ,
आज पण ती फूले तिला , "मी तुझ्या जवळच आहे "ची सदा जाणीव देत असतात.

Group content visibility: 
Use group defaults