तुफान आलंया

Submitted by प्राजक्ता निकुरे on 27 April, 2019 - 01:38

नुकताच हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात झाली होती . मकरसंक्रांतीनंतर तिळातिळाने दिवस वाढत चालला होता . सकाळी प्रसन्न वाटणारे वातावरण ८ नंतर उष्ण जाणवत होते . हळूहळू उन्हाने डोकं वर काढायला सुरुवात केली होती . माणसे घराबाहेर पडताना छत्री टोप्या स्वतःजवळ बाळगत होते जो तो उन्हापासून बचावासून सगळे उपाय करत होता . दुपारी तर घराबाहेर पडणे अवघड झाले होते महत्वाचे काम असेल तरच ती व्यक्ती घराबाहेर पडत असे . बाहेर लिंबू सरबत , पन्हे , कोकम सरबत , उसाचा रस यांचे स्टॉल जागोजागी लागले होते . शहरात हि परिस्थिती होती पण गावात ? गावात मात्र याच्या विपरीत परिस्थिती आहे . जसजशी उन्हे वाढत होती तसतशी गावातील नाले , तलाव, विहिरी, कूपनलिका, नद्या सर्व आटत चालले होते . डोक्यावर खूप उन्ह असताना पण त्यांना पाण्यासाठी कोस कोस दूर भटकावं लागत होत . गायी गुरे ढोरे निपचित पडून होती . ना खायला अन्न ना प्यायला पाणी दिवसातला बराचसा वेळ पाणी शोधण्यात चालला होता सर्वांचा .

हौसा आणि रामराव असचं एक सधन जोडपं . बरीच शेतीवाडी , दूधदुभतं त्यांच्या घरी आहे पण मागच्या काही वर्षांच्या दुष्काळामुळे ना काही नीट पिकलं ना मालाला हमी भाव मिळाला . घरात सगळं असून पण काहीच नसल्यासारखी अवस्था झाली होती त्यांची . पडलेल्या दुष्काळामुळे आणि वाढत्या कर्जामुळे हि दोघेही काळजीत होती त्यातच त्यांची मुलगी या वर्षी दहावीला होती तर मुलगा आठवीला दोघेही खूप हुशार , समजूतदार. गावाची , आपल्या घराची परिस्थिती ओळखून होते . दिवसातला बराच वेळ पाणी आणण्यात जात होता त्यांचा तरी नीट पाणी मिळत नव्हते . डोक्यावर रखरखीत उन्ह आणि पायपीट करत आणलेलं थोडसं पाणी . या सगळ्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांवर मरणाची वेळ आली होती .

चांदण्या रात्री हौसा आणि रामराव अंगणात गप्पा मारत होते . तर मुले शेजारी सरपंचाच्या घरी TV बघण्यासाठी गेली होती . त्या गावात आधीच पाण्याचा प्रॉब्लेम त्यात लाईटचा पण प्रॉब्लेम . शहरात बरं असत ना २४ तास लाईट , मुबलक प्रमाणात पाणी आणि आपण कसेही त्याचा वापर करतो .

“ मालक हे काय होऊन बसलंय हो काय कळना बी काय करावं ते ४ वरीस झालं पण पाण्याचा एक थेंब बी न्हाय इतक्या दिस कसं तरी भागलं पण आता न्हाय , कुठं गेला हा पाऊस काय माहित “

“ अगं ये हौसा असं का बोलती तू होईल सगळं ठीक तू न्ह्ग काळजी करू “

“ आव पर कधी माझ्या समोर आपली पोर भुकेने व्याकुळ होतात पर म्या काय बी करु शकत न्हाय अन न्हाय सहन होत आता हे कर्जाचे डोंगर , हतबल झाले हाय म्या या निसर्गासमोर “

“ बस बस हौसा नगं रडूस आधीच आभाळातून काय पाणी येत न्हाय निदान तुझ्या डोळ्यातलं तरी पाणी वाया नगं घालवू काही तरी उपाय नक्की असलं परत एकदा जोमानं उभं राहू आपण “

“ हरले म्या आता “
“ हे बघ काही हि झालं तरी हार मानून न्हाय चालायचं “

“ तुमचं बरोबर हाय आपण परत खूप मेहनत घेऊ अन परत आपलं शेत फुलवुया “

“ हम्म “

त्या दोघांचे बोलणे त्यांची मुले ऐकत होती .

“ आय बा तुम्ही नका काळजी करू आताच म्या एक कार्यक्रम बघितला हाय तो बघितल्यावर असं वाटालय कि आपलं गाव बी पाणीदार व्हईल “

“ असा कोणता कार्यक्रम बघितला हाय तुम्ही दोघांनी जरा आम्हाला बी सांगा “

“ अगं आय आम्ही अमीर खान सरांचा तुफान आलयां हा कार्यक्रम बघितला त्यात ना ते आपल्याला आधी शिकिवितात कि काय करायचं कस करायचा कसे खड्डे खोदायची नेमकं काम कस करायचं ते समदं ते आपल्याला शिकिवितात . हा सगळा कार्यक्रम आपल्या श्रमदानातून होणार हाय . अन याला बक्षीस बी हाय . आतापर्यंत बऱ्याच गावांनी यात सहभाग घेऊन बक्षीस बी जिकलं हाय अन त्याबरोबर आपलं गाव पाणीदार बी बनवलं हाय . आपलं सरपंच बी बोललं हाय कि आपण या स्पर्धेत भाग घेऊ म्हणून “

“ हे तर लय बेस झालं कि म्हंजी आता आपलं गाव बी पाणीदार होणार तर “

“ व्हय बा अन उद्या आपल्याला चावडीवर बी बोलावलं हाय त्याबद्दल बोलायला “

सर्व गावकरी चावडीवर गेल्यावर गावाच्या सरपंचानी बोलायला सुरुवात केली .

“ तर सर्व गावकरी मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे कि आपला गाव दुष्काळात आहे ते म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे आपला गाव पाणीदार करण्यासाठी आणि मला अशा आहे कि तुम्ही सर्वजण मला यात साथ द्याल याची “

“ अवं सरपंच आपला गाव सुधारावा यासाठी आम्ही काय बी करायला तयार हाय तुम्ही फकस्त बोला काय करायचं हाय ते व्हय कि नाय गावकरी मंडळी “

“ ते मला माहित आहे रामराव . आपल्याला यावर्षी आपल्या विहिरीतलं , तलावातील, नद्यामधला सर्व गाळ काढायचा आहे आणि हे सगळं श्रमदानातून करणार आहे आपण तसेच या वर्षी आपण पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग पण घेणार आहे . “

“ सरपंच हि स्पर्धा कसली हाय “

“ सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ही मुळात गावागावांमध्ये होणारी एक निराळी स्पर्धा आहे. स्पर्धेच्या ठरावीक कालावधीत कोणते गाव पाणलोट व्यवस्थापन आणि जलसंधारणाचे सर्वाधिक काम करू शकते, हे पाहणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे . पानी फाउंडेशन देत असलेल्या प्रशिक्षणाद्वारे मिळालेले ज्ञान वापरून स्वत:चे गाव पाणीदार करण्याची संधी यानिमित्ताने गावकऱ्यांना मिळते . ४५ दिवसात आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे . यात आपाल्याला मशीन चा पुरवठा पण होणार आहे आणि जर जिंकलो तर बक्षीस पण आहे आणि नाही जिंकलो तरी पाणी तर मिळणारच आहे ना तर मग काय मंडळी तयार आहात ना तुम्ही एक तुफान घडवायला “

“ व्हय सरपंच आम्ही सर्व तयार हाय यासाठी तुम्ही फकस्त बोला कधी काम करायचं आहे ते “

या गावाने तर सहभाग घेतला या स्पर्धेत आपला गाव पाणीदार करण्यासाठी चला एक नवीन प्रयन्त करून पाहूया . पाणी वाचवू आणि पाणी जिरवू सुद्धा . आपली निसर्गाबद्दल असणारी जबाबदारी फेडूया . वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवून श्रमदान करूया . आहात ना तुम्ही सर्व सोबत . चला तर मग एक तुफान घडवून आणूया .
www.jalmitra.org वर १ मे रोजी होणाऱ्या महाश्रमदानासाठी आजच नाव नोंदणी करूया .

***** समाप्त *****

प्राजक्ता निकुरे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे लिखाण जरा अजून लवकर यायला हवे होते. ह्यावर्षी १ मे रोजी होणार्‍या महाश्रमदानाकरता जलमित्रांची नाव नोंदणी बंद झालेली आहे.

पण भविष्यात जेव्हा केव्हा हा अनुभव घेता येईल तर जरूर घ्यावा.

छान आहे.

हर्पेन, तुम्ही जाणार आहात ना महाश्रमदानाकरता ?

तुम्ही दिलेल्या प्रदिसादाबद्दल आभारी आहे आणि हो मी पण जाणार आहे . लेख येण्यास जरा उशीर झाला पण काही हरकत नाही पुढच्या वर्षी जोमात सहभाग घेऊ .

हे काये? लोकं शिव्या घालायलेत पाणी फाउंडेशनला.

ॲमी जी जलसंधारण, जलसंपदा, मृदसंधारण ही खाती पुर्वी अत्यंत भ्रष्ट कारभार करीत होती. फडणवीस सरकारच्या काळात यांचा भ्रष्टाचार पन्नास टक्क्यांपेक्षा कमी झाला. या खात्यांमध्ये पैसे खाणारी मंडळींमुळे चांगले लोक बदनाम झाले. सरकारी उत्पन्न साठ ते सत्तर टक्के नोकरांच्या, मंत्री,संत्री यांचा पगार, भत्ते व प्रशासकीय खर्च यातच संपते.
योजनांना मुळात पैसा कमी व परत भ्रष्टाचार यातून कामांवर मर्यादा येतात. मुळात भ्रष्टाचार गावपातळीवरील पुढारी करत असतात. नकली मजूर सोसायट्या तयार करणे, टेंडर घेऊन तोडून देणे. चेक पेमेंट असते तर सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दहावीस टक्के रक्कम देऊन त्यांच्या नावावर कामे घेतली जातात.
आता यंत्राचा शोध मनुष्याचे श्रम कमी करण्यासाठी झाला आहे. पण सरकारचा अट्टाहास मनरेगा अंतर्गत मजूरांकडूनच कामे केली पाहिजेत. मजूर नसताना कर्मचाऱ्यांना मनरेगा कामे करण्याची सक्ती केली जाते. मग काही लोक यंत्राने कामे करून बिले मजूरांच्या नावे काढतात.‌मजूरही थोडा हिस्सा घेऊन सामील होतात. पाणी फाउंडेशन निस्वार्थपणे कामे करत आहे व या फुकट्या लोकांना पैसा खाता येत नाही. म्हणून शिव्या देत असावेत. पाणी फाउंडेशन मध्ये सुद्धा काही चोर शिरलेले असु शकतात.

लवकरच या खात्यांतील भ्रष्टाचाराची मोडस ऑपरेंडी व पैसा कसा व कुठे मुरतो हे , कुणाला किती टक्के मिळतो हे लिहिण्याच्या विचारात आहे.