कॅक्टसचं फूल

Submitted by डॉ अशोक on 24 April, 2019 - 22:26

*
कॅक्टसचं फूल

जेंव्हा केंव्हा उमलतं, कॅक्टसचं फूल
तेंव्हा लोक वळून पहातात
सुगंध नसतो त्याला
पण नजरा वळतात...

जेंव्हा केंव्हा उमलतं, कॅक्टसचं फूल
तेंव्हा नजरा जाळणार्‍या वाळवंटात
प्रवास करणार्‍याला
एक आशेचा किरण दिसतो....

जेंव्हा केंव्हा उमलतं, कॅक्टसचं फूल
तेंव्हा मृगजळ नाही दिसत
पण वाळवंट संपेल असं
नक्कीच वाटायला लागतं....

-अशोक

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults