आई

Submitted by amolpayghan on 24 April, 2019 - 11:27

आई

दुखणे जरी बाळाचे
जळते मातेच्या काळजात
डोळ्यास झोप नाही
चिंतेत जगली रात

पसरून पदर देव्हाऱ्यात
स्वतःचे गार्हाणे मांडते
कर बरे बाळास माझ्या
म्हणुनी देवाशीच भांडते

लेकरास दुःखात पाहून
आज ती खचली होती
धरुनी छातीशी कोकराला
उपाशीच निजली होती
-अमोल

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"पसरून पदर देव्हाऱ्यात
स्वतःचे गार्हाणे मांडते
कर बरे बाळास माझ्या
म्हणुनी देवाशीच भांडते"

सुंदर शब्दरचना केली आहे... आवडली नाही तरच नवल.