हिंमत

Submitted by Kajal mayekar on 24 April, 2019 - 04:16

देवा आता रिक्षा भेटूदे नाहीतर ह्या अमावस्येच्या काळ्या रात्रीत ३ किलोमीटर चालत घरी जाव लागेल... देवा plz यार रिक्षा भेटूदे... आधीच २४ व्या वर्षी ८०-९० च्या म्हातारे लोकांसारखे पाय दुखतात.. त्यात भयंकर भूक लागली आहे.. ३ किमी माझ्याने चालवल जाणारच नाही... अदिती मनातल्या मनात स्वतःशीच बोलत चालली होती.

अदिती २३-२४ वर्षाची तरूणी. दिसायला अगदीच सुंदर नसली तरीही चार चौघात ऊठून दिसणारी होती. ५ फूट उंची, सावळा रंग, लांबसडक काळेभोर केस, पाणीदार डोळे, गुलाबी ओठ... अदिती एका Private company मध्ये accountant च्या profile ला होती. Month end असल्यामुळे कामाचा load होता.

मेन रोडवर एकही रिक्षा उभी नव्हती. त्यात ऊशीर झाल्याने रिक्षाही भेटत नव्हती. अदितीच्या मनात Cab book करायचा विचार आला तस तिने Mobile चालू केला तर त्याची Charging संपली होती. तिने रागातच फोन पर्समध्ये टाकला आणि रिक्षाची वाट पाहू लागली.

रस्ता रहदारीचा होता पण आज जास्त वर्दळ नव्हती. कदाचित ऊशीर झाल्यामुळे असेल असा विचार अदितीच्या मनात येऊन गेला. काहीवेळाने ३ टपोरी मुल मोठमोठ्याने हसत खिदळत एकमेकांना शिव्या देत अदितीच्या समोरून येत होती. त्यांना बघताच अदितीच्या मनात धडकी भरली. त्यांच्या चालण्यावरून समजत होते कि ते नशेत आहेत. त्यांचही लक्ष अदितीकडे गेले. अगदी किळस यावा अश्याकाही नजरेने त्यांनी तिला खालपासून वरपर्यंत न्याहाळल. त्यांची ती वासनेने भरलेली नजर अदितीला बिलकुल आवडली नाही. तिच्या डोक्यातच गेले ते तिघेही. पण ते तिघे आणि आपण एकटे व माणसांची वर्दळ कमी असल्यामुळे तिने शांत राहून दुर्लक्ष केल.

अदितीला बघताच त्या मुलांना जोर आला. ते तिच्याकडे बघत bad comments करू लागले. तिघांमधला १ मुलगा दारूच्या नशेत रस्त्याच्या मधोमध येऊन चालू लागला. त्याच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. तो अदितीकडे येऊ लागला. अदितीही त्याच्याकडेच पाहत होती. तेवढ्यात समोरची मुलगी आपल्याच दिशेने धावत येत असल्याच त्याला दिसल. प्रथम त्याला काही कळलेच नाही. अचानक पाठीमागून येणारा ट्रकच्या हाॅर्नचा आवाज त्याला आला. त्याने पाठीमागे वळून पाहिले तर समोर काही अंतराने भरधाव वेगाने येणारा ट्रकच्या हेडलाईटचा उजेड सरळ त्याच्या डोळ्यात गेला. आधीच नशेच्या धुंदीत असल्यामुळे त्याला धड नीट उभही राहता येत नव्हते. ट्रकच्या हेडलाईटचा उजेड डोळ्यांवर पडल्याने त्याचा हात आपसूकच डोळ्यांपुढे आला. बोटांच्या अंतरातून हेडलाईटचा उजेड त्याचा डोळ्यांत जायचा प्रयत्न करत होता. काही कळायच्या आत अदितीने त्याच्या हाताला धरून त्याला बाजूला ओढले. त्याबरोबर ट्रक भरधाव वेगाने हवेसारखा गेला. काहीक्षण आपल्यासोबत काय झाले हे त्याला कळलेच नाही. भानावर आल्यावर त्याने समोर पाहिले तर ती मगासची मुलगी त्याच्याकडेच बघत होती.

तुम्ही ठीक तर आहात ना..?? अदितीने विचारले.

अ... हा... तो ऊत्तरला

अरे भावा काय झाल..?? ठिक तर आहेसना..?? दोघांमधील एकाने विचारले. तो काही बोलणार इतक्यात दुसरा मुलगा रागात बोलला " साल्या एवढी ढोसायची कशाला..?? फुकट भेटली म्हणून ढोसतच जायची का..?? ..... त्यांच बोलण चालू असताना अदिती तिकडून निघाली. तिने रिस्टवाॅचवर नजर टाकली तर बराच ऊशीर झाला होता. अदितीने एकदा समोरच्या अंधारी चिंचोळी वाटेकडे पाहिले. नंतर त्या ३ टपोरी मुलांकडे. त्यांच तिच्याकडे लक्ष नव्हत. तिने मेन रोड सोडून समोरची अंधारी चिंचोळी वाट धरली. तो शॉर्टकट होता. अदिती लांब लांब पाय टाकत होती. तिला काहीकरून घरी लवकर पोहचायचे होते.

अदितीला वाटले कि ते तिघे तिच्या पाठीमागे येणार नाहीत. पण तिचा अंदाज साफ चुकला होता. त्या तिघांपैकी एकाने तिला शॉर्टकटने जाताना पाहिले होत. त्यांचा विचार पक्का झाला होता. तिघांनी एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले. त्यांच्या चेहर्‍यावर छद्मी हास्य होते. हे अदितीच्या गावीही नव्हत. ती आपल्याच विचारात चालली होती.

अचानक अदितीला पाठीमागून हसण्याचा आवाज आला. तस तिने पाठीमागे वळून बघितले तर ते मगासचे ३ टपोरी मुल काही अंतराने उभे राहून तिच्याकडेच बघून हसत होते. ती तशीच थांबून त्यांच्याकडे पाहत होती. त्यातला एकजण तिच्याकडे चालत येऊ लागला.

अरे जानेमन इतकी पण काय घाई आहे. जरा थांब २ मिनिट... अस म्हणत तो तिच्याजवळ आला. त्याने आपला उजवा हात पुढे करून अदितीचा डावा हात धरला. तर अदितीच्या चेहर्‍यावर रागीट भाव उमटले.

हात सोड माझा... अदिती थंड स्वरात म्हणाली.

नाही सोडत हात... खूप दिवसाने पोरीचा हात हातात आलाय... अदितीच्या हातावरची पकड घट्ट करत तो म्हणाला.

अदितीने खाडकन त्या मुलाच्या कानफटात आवाज काढला. कानाखाली बसल्याबरोबर त्याने आपसूकच अदितीचा हात सोडला. अदितीने मारलेला फटका इतका शक्तीशाली होता कि त्या मुलाचा खालचा ओठ फुटून बारिक रक्ताची धार लागली. तो मुलगा अदितीपासून लांब झाला. पाठीमागे ऊभे राहिलेल्या दोघांमधला एक मुलगा अदितीसमोर आला.

काय बाॅस एकदम लेडी दया हा... क्या बात है..!!! दुसरा मुलगा अदितीचा हात धरत म्हणाला.

त्या मुलाने हात धरल्याबरोबर अदितीने त्याच्या काही लक्षात यायच्या आधीच तिने त्याचा हात उलट पिरगळला आणि पहिला ओठ फुटलेल्या मुलाच्या दिशेने त्याला ढकलला.

ए थांबा रे... हे पाखरू तुम्हाला भाव नाही देणार... अरे जीव वाचवलाय तिने आपला मग तिला त्याचा मोबदला नको का द्यायला... शेवटी ऊरलेला मुलगा अदितीच्या पुढ्यात येऊन आपल्या ओठांवरून जीभ फिरवत म्हणाला.

अदितीने त्याच्या बोलण्याचा आणि कृतीचा बरोबर अर्थ समजून ती दोन पावले पाठी झाली. आपण जवळ गेल्याबरोबर ती दोन पाऊल पाठी झाली हे बघून त्याची अजूनच हिंमत वाढली. आणखी दोन पाऊल पुढे होऊन त्याने तिच्या गळ्यातील ओढणी खेचून घेतली. त्याच्या ह्या कृतीने अदिती प्रथम दचकली पण चेहर्‍यावर तस काही न दाखवता तिने त्याच्याकडे ओढणी मागितली. त्याने नाही म्हणत आपली मान नकारार्थी हलवली. All right... म्हणत तिने मान खाली घातली आणि पटकन आपल्या पर्समधून Chefs knife बाहेर काढला. ती खाली बघून काय करतेय हे त्याला कळायच्या आतच अदितीने त्याच्या डाव्या हातावर चाकूने वार केला. चाकूचा वार होताच त्याच्या हातून ओढणी खाली पडली. अदितीने पटकन ओढणी आपल्या गळ्याभोवती घेतली.

त्या मुलाला अदितीची हि वागणूक अनपेक्षित होती. तो आश्चर्यचकित होऊन अदितीकडे पाहत होता तर मध्येच त्याच्या चेहर्‍यावर वेदनेचे भाव निर्माण होत होते. बाजूला ऊभे राहून तमाशा बघणाऱ्या दोघांच्या चेहर्‍यावरचे भावही काहीसे तसेच होते. त्या मुलाने काही बोलण्यासाठी तोंड उघडलच होत कि त्याला काही बोलायलची संधी न देता अदितीने त्याच्या दुसर्‍या हातावर चाकूने वार केला. अदितीच हे वागणे त्यालाच काय तर बाजूला ऊभ्या असणाऱ्या त्या दोघांनाही अनपेक्षित होत.

आता मात्र तो मुलगा विव्हळत अदितीपासून चार पावले मागे गेला. त्याची हि हालत बघून त्याचे दोघे साथीदार आल्या वाटेने पळून गेले. त्यांना तस पळून जाताना बघून अदितीला हसायला आले.

जे हात जीव वचवू शकतात तेच हात वेळ आल्यास जीव घेऊही शकतात. आता जसा आलास त्याच वाटेने इथून निघायच. नाहीतर तिसरा वार मी सरळ तुझ्या गळ्यावर करेन. चौथा वार छातीवर डाव्यासाईडला करायला मी उफ् तक नाही करणार... अदिती अगदी थंड आवाजात म्हणाली.

अदितीच्या शब्दांना धारच अशी काही होती कि त्या मुलाचे पाय आपसूकच आल्या वाटेकडे वळले. तो ओरडत किंचाळत जाऊ लागला. अमावस्येच्या त्या भयाण रात्रीत त्याचा आवाज अदितीच्या कानात शिरत होता. नजरेसमोरून तो मुलगा नाहिसा होईपर्यंत अदिती त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत होती. जसा तो मुलगा पुढे जाऊन नाहिसा झाला तशी अदिती उलट फिरून पुढच्या मोठय़ा दगडावर जाऊन बसली. अदितीने एकवार वर आभाळाकडे पाहिले. तिच्या डोळ्यात पाणी होते.

इतकी हिंमत माझ्यामध्ये आलीच कुठून.?? ..... साॅरी देवा मला त्या मुलावर वार नव्हता करायचा पण त्याने माझ्या ओढणीला हात घातला तर माझ्याकडेही काही पर्याय नव्हता. माफ कर देवा आणि जमलच तर त्या मुलाच्या वेदना कमी कर... डोळ्यातील पाणी पुसत अदिती मनात म्हणाली.

अदितीने हातातल्या चाकूकडे पाहिले त्यावर रक्त अजूनही तसच होत. तिने पर्समधून पाण्याची बाटली बाहेर काढली. त्यातल अर्ध पाणी तिने चाकूवर ओतल तस चाकूवरून पाण्यासकट रक्त खाली सांडून चाकू अगोदरसारखा साफ झाला. तिने टिश्यूपेपरने तो चाकू पुसून पर्समध्ये होता तसा ठेवून दिला. बाटलीतल एक घोट पाणी पिऊन बाकिच पाणी तिने आपल्या चेहर्‍यावर ओतल. ओढणीने चेहरा पुसत ती अगोदर सारखी लांब लांब पाय टाकत घराकडे निघाली.

समाप्त

प्रिय वाचकमैत्रीणींनो दिवसा रात्री घराबाहेर जाताना सोबत काहितरी हत्यार ( butter knife, spray, मिरची पावडर किंवा एखादा छोटा चाकू) आपल्या पर्समध्ये ठेवा. वेळ कधीच सांगून येत नाही. अशा प्रसंगांना फेस करण्यासाठी तयार रहा. Be brave... stay safe...

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलेय !!! सुरक्षिततेसाठी हत्यार बाळगण्याचा मेसेज मिळाला पण अदिती देवाकडे माफी का मागते आणि त्याच्या वेदना कमी व्हाव्या असे का बोलते. तो मुलगा जसे वागलाय त्यापेक्षा त्याला फारच कमी शिक्षा मिळालीय. बदला घेण्यासाठी तो परत तसे वागू शकतो.अगदीच त्याला मृत्यूदंड मिळावा असे देवाकडे मागता येत नसेल तर त्याची स्मरणशक्ती नष्ट व्हावी असे तरी मागणे अदितीने मागावे असे मला वाटते. पुढील लेखनास शुभेच्छा.

Thanks 4 comment ☺
Aditi devakde mafi magte karn hya adi kdi tine as kunavr chakune halla vgere kela nsto mhanun ti mafi magun tyachya vedna kmi vhaya ashi prarthana krte

छान लिहिलंय... प्रसंग अगदी जशाच्या तसा उभा केलाय... अक्षरशः अशी काहीही घटना होत असताना, ह्याच प्रसंगातून ती व्यक्ती जात असेल, असं वाटलं.

अवांतर: हे मत फक्त माझं मत म्हणून ग्राह्य धरण्यात यावं...
कथानायिका ओव्हर व्हाइट करण्याच्या नादात तिने देवाकडे माफी मागण, डोळ्यात पाणी येणं, त्या मुलासाठी प्रार्थना करणं, हे सगळं पूर्णपणे अनावश्यक वाटतं... त्याऐवजी संतापाने डोळ्यात पाणी येणं, अशा नराधमांना अशीच शिक्षा व्हावी अशी देवाकडे प्रार्थना करणं आणि देवाकडे अशीच सगळ्या महिलांना शक्ती दे अशी प्रार्थना केली असती तर जास्त परिणामकारक झालं असतं...

कथानायिका ओव्हर व्हाइट करण्याच्या नादात तिने देवाकडे माफी मागण, डोळ्यात पाणी येणं, त्या मुलासाठी प्रार्थना करणं, हे सगळं पूर्णपणे अनावश्यक वाटतं... त्याऐवजी संतापाने डोळ्यात पाणी येणं, अशा नराधमांना अशीच शिक्षा व्हावी अशी देवाकडे प्रार्थना करणं आणि देवाकडे अशीच सगळ्या महिलांना शक्ती दे अशी प्रार्थना केली असती तर जास्त परिणामकारक झालं असतं...... Ks ahe na.... Females are always kind hearted... So ti as bolli ... yat kahi white vgre krn nahi ahe...

कथानायिका ओव्हर व्हाइट करण्याच्या नादात तिने देवाकडे माफी मागण, डोळ्यात पाणी येणं, त्या मुलासाठी प्रार्थना करणं, हे सगळं पूर्णपणे अनावश्यक वाटतं... त्याऐवजी संतापाने डोळ्यात पाणी येणं, अशा नराधमांना अशीच शिक्षा व्हावी अशी देवाकडे प्रार्थना करणं आणि देवाकडे अशीच सगळ्या महिलांना शक्ती दे अशी प्रार्थना केली असती तर जास्त परिणामकारक झालं असतं...+1111111
पूर्णपणे सहमत...

<<<<छान लिहिलंय... प्रसंग अगदी जशाच्या तसा उभा केलाय..>>>>
अनुमोदन.

नंतर तश्याहि सगळ्या प्रार्थना तिने घरी जाऊन केल्या हो, पण पहिले तिच्या मनात काय आले ते लिहीले.
प्रार्थना झाल्यावरहि बरेच काही काही तिच्या मनात आले, उदा. उद्याचा गजर लावायचा वगैरे. ते सगळे लिहीले नाही इथे एव्हढेच!
Light 1 Happy

Thanks भावना
अज्ञातवासी
ऊर्मिला
नंन्द्या

काजल nice story..मला वाटत त्याक्षणी self defence पुरती हत्याराची गरज होती किंवा असते;हे permant solution नाही,प्रत्येक पुरुषाच्या मनात स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा.त्याची सुरवात हि घरातुन व्हायला हवी.

अज्ञातवासी +१
===

> प्रिय वाचकमैत्रीणींनो दिवसा रात्री घराबाहेर जाताना सोबत काहितरी हत्यार ( butter knife, spray, मिरची पावडर किंवा एखादा छोटा चाकू) आपल्या पर्समध्ये ठेवा. > मला जेवढं माहित आहे त्यानुसार चाकू वगैरे हत्यार बाळगणे कायद्याने गुन्हा आहे.

त्याऐवजी फोन नेहमी व्यवस्थित चार्ज केलेला असावा आणि कॅब/रिक्षा बुक करून ती गेटपाशी आल्यावरच ऑफिसमधून बाहेर पडायच हा सल्ला द्यायला हवा कथानायिकेला.

आणि रात्री ८ नंतरही हापिसात थांबावे लागले तर स्त्री कर्मचाऱ्यांना डोअरस्टेप ड्रॉप द्यायला हवा असा कायदा आहे ना?

रात्री ८ नंतरही हापिसात थांबावे लागले तर स्त्री कर्मचाऱ्यांना डोअरस्टेप ड्रॉप द्यायला हवा असा कायदा आहे ना? > >>. हो अगदीच. 8 नंतर कंपनीने कॅब प्रोवाईड करावीच लागते. जर स्वतःच्या गाडीने जाणार असाल तर कंसेंट फॉर्म भरावा लागतो. कंपनी कॅबने जाणार असेल तर लेडी एम्प्लॉयीला आधी ड्रॉप करणे, मग मेल एम्प्लॉयीला ड्रॉप करणे. गाडीत जर काही कारणाने मेल एम्प्लॉयी नसेल तर ड्रायव्हर खेरीज कंपनीचा सिक्युरिटी गार्ड असणं कंपल्सरी असतं. आमच्या कंपनीत इंटरनॅशनल ट्रॅव्हल करणाऱ्या लेडी एम्प्लॉयीज चिक्कार आहेत, त्यांना पुणे मुंबई कॅब दिली जाते त्यामध्ये घरच्या व्यक्तीला बरोबर जाणं अलाऊड आहे आणि जाणार असेल तर पुणे रिटर्नची कॉस्ट कंपनी पे करते. शिवाय मध्यरात्री परत येणाऱ्या लेडी एम्प्लॉयीजना मुंबईमध्ये transit stay पुरवला जातो.
सिक्युरिटीला 8 नंतर चालत गेटमधून बाहेर पडणारी किंवा बाहेर पडून रस्त्यावर चालणारी लेडी एम्प्लॉयी दिसली तर HR आणि अडमिन मध्ये हंगामा होईल. कंसेंट फॉर्म भरला असला तरी सिक्युरिटीला अधिक प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे.

Thanks मन्या
U r right permanent solution nahi. But apn Khrch pratek purushachya mnat Stree kde bgnyacha drishtikon bdlu shkto.?? Tyasathi parents ni mul Lhan Astanacha nit smj dyayla hvi.. but baryachda paise kmvnyachya nadat parents ch mulankde durlaksh hot ani ethunch sglyala survat hote

अॅमी I don't think ki butter knife kiva ekhada chhota chaku bag mde thevn gunha ahe.. phone charged.. Cab booked krun ti office jvl alyavrch office mdun nighav.. hyala totally agreed

गुगल केल्यावर हे सापडलं

Under the Indian Arms Act 1959, you are not allowed to carry "prohibited arms". Under Bladed weapons, blades longer than 9" or wider than 2" are prohibited arms. So, Yes it is legal to carry a knife blade under 9" long and 2" wide. ... It is illegal to carry a dangerous weapon in India.

सो छोटा चाकू चालेल.

आणि रात्री ८ नंतरही हापिसात थांबावे लागले तर स्त्री कर्मचाऱ्यांना डोअरस्टेप ड्रॉप द्यायला हवा असा कायदा आहे ना?>>>> मला नाही माहीत की असा काही कायदा वगैरे आहे, अन असलाच तरी किमान मुंबईत सगळे तो पाळीत नाहीत.

दिल्ली केस नंतर काही काळ आमच्या ऑफिस मध्ये लेडीज स्टाफ ६ नंतर थांबू देत नव्हते, पण दोनेक महिन्यानंतर ये रे माझ्या मागल्या.
मला स्वतःला उशिरापर्यंत थांबावे लागायचे, अजूनही गरज असेल तर थांबते. ट्रेन च्या कित्तीतरी मैत्रिणींची हीच गत.
पण मलातरी रात्रीच्या वेळी कॅब, रिक्षा पेक्षा ट्रेन किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्त सेफ वाटतो.

अजून एक छोटासा चाकू सोबत नक्कीच ठेवावा, अन तो पण हँडी, म्हणजे गरज पडली तर लगेच सापडेल असा. त्या व्यतिरिक्त दुसरे म्हणजे आपले क्रेडिट किंवा डेबिट कार्ड. सपकन मारले न गळ्यावर किंवा हातावर तर ते अगदी चाकूचे काम करते.

गुगल केल्यावर कळलं कि तो 8pm- डोअरस्टेप ड्रॉप वगैरे कायदा फक्त IT, ITES, BPO साठी आहे. बाकीच्यासाठी खालीलपैकी काहीतरी लागु होईल ( इथून कॉपीपेस्ट )

• Section 66(1)(b) of the Factories Act, 1948 states that no woman shall be required or allowed to work in any factory except between the hours of 6 a.m. and 7 p.m.

• Section 25 of the Beedi and Cigar Workers (Conditions of Employment) Act, 1966 stipulates that no woman shall be required or allowed to work in any industrial premise except between 6 a.m. and 7 p.m.

• Section 46(1)(b) of the Mines Act, 1952 prohibits employment of women in any mine above ground except between the hours of 6 a.m. and 7 p.m.

• According to shops and establishment act no women shall be required or allowed to work in any establishment after 9:30 PM

कथा छान आहे पण -
चाक़ू ... वार करणे ... रक्त काढणे ..निर्जन जागी ३ पुरुष वर्सेस १ स्त्री अशी लढत वगैरे वगैरे येथे कथा नायिकेस जे जमले ते खऱ्या आयुष्यात अशक्य बाब असते हे कृपया ध्यानात घ्या.

त्यामुळे पर्स मध्ये सेफ्टीसाठी हत्यार बाळगणे वगैरे सल्ले दिले तरी त्याचा वापर न होउ देणे अर्थात ते न वापरायला लागता आपण सुरक्षित राहणे हे जास्त महत्वाचे आहे. आणि ह्यासाठी जागरूक राहत निर्जन स्थान रात्रीच्या वेळी टाळणे हे सर्वात महत्वाचे आहे. असे असले तरी अवचित प्रसंगी जावे लागले आणि दुर्धर प्रसंग उद्भवला तर मॉरल्स अजिबात ढळू न देता शक्य त्या वेगाने त्या ठिकाणापासून लांब पळणे ( घाबरून पळणे म्हणजे हमखास आत्मघात होणार पण सभान राहून पूर्ण ताकदिनीशी पळणे सुरक्षित राहण्यास आवश्यक बाब असते.

जरी मार्शल आर्ट्सचे दोन चार डाव येत असतील तरी उगीच संधर्ष करत बसणे व्यर्थ आहे कारण आपली शक्ति खर्च करून आपण आपले नुक्सान करत असतो. जेथे पळण्यास अजिबात वाव नाही जसे की नैरो पैसेज किंवा कोरिडोर्स वगैरे तर एक घाव २ टुकड़े स्टाइल ऍटॅक महत्वाचा असतो. कुठल्याही परिस्थितीत एक विरोधी तिन हे व्यस्त समिकरण चुकीचे आहे आणि हां काही हिंदी पिक्चर नव्हे त्यामुळे अटॅक / वार तिन पैकी फक्त एकावर करायचा जो जरा आपल्या माऱ्याच्या आटोक्यात असेल असा अंदाज घेवून त्यास इतक्या आवशाने लोळवायचे की त्यामुळे त्याचे बाकी दोन साथीदार काही क्षण दिग्मूढ़ झाले पाहिजेत आणि हीच संधी साधत पूर्ण जोर लावून त्या स्थळापासून पळून जात लवकर सुरक्षित ठिकाण गाठणे महत्वाचे.

> चाक़ू ... वार करणे ... रक्त काढणे ..निर्जन जागी ३ पुरुष वर्सेस १ स्त्री अशी लढत वगैरे वगैरे येथे कथा नायिकेस जे जमले ते खऱ्या आयुष्यात अशक्य बाब असते हे कृपया ध्यानात घ्या.
त्यामुळे पर्स मध्ये सेफ्टीसाठी हत्यार बाळगणे वगैरे सल्ले दिले तरी त्याचा वापर न होउ देणे अर्थात ते न वापरायला लागता आपण सुरक्षित राहणे हे जास्त महत्वाचे आहे. आणि ह्यासाठी जागरूक राहत निर्जन स्थान रात्रीच्या वेळी टाळणे हे सर्वात महत्वाचे आहे. > +१

छोटा चाकू ठेवणे पर्समध्ये ठीक आहे. पण जरा लांबून वापरता येणारे व एका वेळेस दोघा तिघांवर वापरता येणारे शस्त्र जसे की पेपर स्प्रे अधिक उपयोगी ठरेल.
असले कुठलेही शस्त्र जवळ ठेवताना त्याचा केव्हा आणि कसा योग्य वापर करावा याची पूर्ण माहिती हवी, नाहीतर आपल्या बचावासाठी आणलेल्या शस्त्राचा समोरच्यालाच फायदा व्हायचा.

हातात पिस्टल असली तरी ते वापरायची अक्कल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे धैर्य आवश्यक असते. खचुन गेलेल्या मनावर कुणीही अधिपत्य गाजवू शकतो. पूर्वीच्या बाहुबली स्टाइल जमान्यात असो की आताच्या आधुनिक युद्धात असो दोन्हीकडे मानसिक दबाव तंत्र सर्वात जास्त इफेक्टिव्ह ठरते. म्हणून मनाने खंबीर राहिले तर समयसुचकतेने अनेक बाके प्रसंग मुलींना टाळता येणे शक्य आहे.

बरेच प्रतिसाद पटले.
कथा चांगली रंगवली आहे.
मुलाबद्दल वाईट का वाटलं वगैरे मुद्दे प्रतिसादात आले असले तरी एखाद्याला जखम करणं, रक्त वाहताना पाहणं वगैरे शॉकिंग असेलच.काही क्षण दया ही रिऍक्शन शक्य आहे.(एखादा माणूस शत्रू आहे, हाल हाल होऊन मरावा असं आपण मनात कळवळून एखाद्या क्षणी म्हणत असलो तरी एखाद्याला प्रत्यक्ष इजा करणं/मारणं इमोशनली प्रचंड ताण देणारं असू शकतं.मध्ये कुठेतरी रेल्वे मोटरमन चे अनुभव वाचले होते.एखादा माणूस अपघाताने/जीव देण्यासाठी आडवा येतो.डोळ्यांना दिसतो.पण गाडीत बसलेल्या हजारो माणसाच्या सुरक्षिततेसाठी कचकन ब्रेक मारून त्या एका माणसाला वाचवता येत नाही.अश्या प्रकारचे ताण आणि गिल्ट अनावर होऊन एका मोटरमन ने जीव दिला आहे गाडीखालीच.) More about PTSD.
अवांतर: कथेत सिनेमा प्रमाणे काल्पनिक व्हिलन एका नंतर एक आले आहेत.तिघे एकत्र आले असते तर या काल्पनिक प्रसंगातून काल्पनिक नायिकेचं सुटणं अशक्य होतं.पण वाचून एकदम मस्त वाटलं. पॉवर टू विमेन असं काहीतरी फिलिंग आलं.
शक्यतो असे प्रसंग येऊ नयेत, अटळ प्रकारे आले तर प्रसंगावधान बाळगून सुटणे अशक्य नाही.

Pages