सांग त्यांना तुझी कोण मी लागते

Submitted by सुप्रिया जाधव. on 24 April, 2019 - 03:55

व्यर्थ सारे कुणीही कितीदा गुणा
शक्यतो ना जुमाने कधीही कुणा
ते निराधार मी शून्य गणितातले
ना जमेला कुणाच्या न झालो उणा !

उंच आकाश व्यापे खगांचा थवा
रोज टापू नवा रोज चारा नवा
दूर मागे कधीचे घरा त्यागले
ना विसावा कुठे ना कुठे गारवा !

गुंतल्याच्या कुठेही न खाणा-खुणा
मीच माझ्या घरी राहतो पाहुणा
दशदिशा हिंडतो मी हवेसंगती
सोडुनी ह्या सुगंधीत पाउलखुणा

ओढ़ वाटे तुझी रातदिन धावते
लोक म्हणतात वेडयापरी वागते
स्वत्व माझे विसरते तुझी व्हावया
सांग त्यांना तुझी कोण मी लागते

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्यर्थ सारे कुणीही कितीदा गुणा
शक्यतो ना जुमाने कधीही कुणा
ते निराधार मी शून्य गणितातले
ना जमेला कुणाच्या न झालो उणा !

खुप छान!
शुन्याची कल्पना आवडली. ज्याच्या सोबत आहे त्याची किंमत वाढवणार. एकटे असतान मात्र किंमत नाही. वजाही होत नाही, मिळवताही येत नाही.

अप्रतिम...!!!

दशदिशा हिंडतो मी हवेसंगती
सोडुनी ह्या सुगंधीत पाउलखुणा >>>> वा वा !! Happy

Thanks