नसतेस घरी तू जेव्हा

Submitted by amolpayghan on 24 April, 2019 - 03:42

नसतेस घरी तू जेव्हा

नसतेस घरी तू जेव्हा
मज आनंद खूप होतो
मी बोलावूनि घरी मित्रांना
मांचुरीअन बनवून खातो

ती आणली बघ कोबी
बिटरूट हि घेतले
मिरची थोडीशी चिरली
तिखट मिठ हि टाकले
नसतेस घरी तू जेव्हा---

मळून छान मैद्याने
मक्याचे पिठ मी टाकले
मग गोल करून पीस
तेलात तळून घेतले
नसतेस घरी तू जेव्हा---

ग्रेव्ही कशी बनवावी
मज प्रश्न हाच उद्भवतो
मग रेडिमिक्स अनुनी
मी ग्रेव्ही चा बेत जमवतो

गरम करुनि पाणी
रेडिमिक्स त्यात मिसळतो
फिरवूनि मग चमच्याने
थोडावेळ मग उकळवतो
नसतेस घरी तू जेव्हा---

तयार होताच मग ग्रेव्ही
मांचुरीअन त्यात सोडले
होऊ देऊन वेळ मिनिटांचा
प्लेटात माझ्या ते घेतले
नसतेस घरी तू जेव्हा--

घेताच चव पाहिल्याची
मनात विचार ग येतो
असतीस कदाचित तू जर
आनंद द्विगुणित असता
नसतेस घरी तू जेव्हा---

- अमोल

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users