बंधारा भाग-एक

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 23 April, 2019 - 09:34

"साहेब ते नदीवर जे काय चाललंय ते काम तुमीच करता काय ?" वाफाळलेला चहा पातळ कपड्यातून किटलीत ओतत चहावाल्यानं विचारलं.
"हो,आम्ही करतोय " सूरजला प्रश्न अपेक्षित नव्हता.
"झालं का नायी मग अजून ?" चहावाला.
"सुरजन मान डोलावली.
त्याला खरंतरं आत्ता गाडीचं टेन्शन होतं.गाडी नवीन होती,जेमतेम सहाच महिने पूर्ण झाले असतील आणि अशी ऐनवेळी पंचाईत.
सुरज देशमुख
श्रीरामपूर मधल्या बंधाऱ्याच्या कामासाठी शासनाकडून नेमण्यात आलेला तरुण,हुशार आणि उत्साही इंजिनियर.
नुकतीच पदवी घेऊन गेल्या वर्षभरात शासनाच्या बांधकाम खात्यात रुजू झाला.
स्वतः शैक्षणिकदृष्ट्या हुशार असला तरी वडील-साहेबराव देशमुखांच्या राजकीय वजनाचा नोकरी मिळवताना फायदा झालाच.शैक्षणिक हुशारीचा उपयोग कॉलेजमधून बाहेर पडेपर्यंतच, त्यानंतर येणाऱ्या परीक्षेत तिचा उपयोग फारसा होतं नाहीच.
आता सुरजलाही साहेबरावांचं असं याच्या नोकरीसाठी शब्द टाकणं पटलं होतं असं नाही पण काहीवेळा काही गोष्टी आपल्या मनात नसतानादेखील मान्य करावी लागतात, त्यापैकीच हे एक होतं.
शब्द टाकून आलेला असला तरी दिलेल्या कामात कसर सोडणं त्याच्या स्वभावात नव्हतं.
त्यात आत्तापर्यंत शहरी बाबू म्हणून वाढल्यानंतर असं जेमतेम दोनशे वस्ती असणाऱ्या गावात येऊन राहणं आणि इथल्या लोकात मिळून काम करणं त्याला 'स्वदेस' चा वगैरे फील देत होतं !
पुण्यातून थेट श्रीरामपूर !
अगदी महिन्याभराचं काम होतं खरं, पण तो महिना पावसाळ्याच्या सुरुवातीचा.
साईटची साधारण पाहणी करून परत रूमवर जायला निघेपर्यंत चांगलीच रात्र झालेली होती .
या भागात अंधार जरा लवकर पडतो.साधारण नऊसाडेनऊ झाले असावेत.
इथं आल्याआल्या समोर पसरलेलं नदीचं ते पात्र बघून लहर आली आणि तो आत उतरला,परत येताना लक्षात आलं, घड्याळ हातातून गायब होतं.पाण्यात पडलं असावं म्हणून तसाच येऊन गाडीत बसला.सोबत एक मदतनीस होताच.तो भाग बऱ्यापैकी तुरळक वस्तीचा आणि दाट झाडीचा.
गाडी सुरु करून काही अंतरावर रस्त्याकडेच्या टपरीशेजारी चहाला थांबले.
चहा घेऊन पुन्हा गाडीत बसल्यावर लक्षात आलं कि गाडी सुरूच नाही होते.
थोडीफार खटपट केली पण काहीच होईना.आता यावेळी इथं मेकॅनिक मिळणं अशक्यच होतं.
खाली उतरले आणि आणखी एका कटिंगची ऑर्डर दिली.
"साहेब कायी प्रॉब्लेम नायी ना ?"
चहावाल्याचा परत प्रश्न.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. श्रीरंगपूर की श्रीरामपूर, प्लिज क्लारिफाय.
२. क्रमशः की 'कायी प्रॉब्लेम नाही ना' संपलं, प्लिज क्लारिफाय.
३. चहा नेहमी वाफाळलेला का असतो (प्लिज रेफर फारएन्ड यांची उपमासृष्टी)
४. सुरजने होकारार्थी की नकारार्थी मान डोलावली, प्लिज क्लारिफाय.
५.त्याला खरंतरं आत्ता गाडीचं टेन्शन होतं.गाडी नवीन होती,जेमतेम सहाच महिने पूर्ण झाले असतील आणि अशी ऐनवेळी पंचाईत.>>>> काय पंचाईत, प्लिज क्लारिफाय.
६.इथं आल्याआल्या समोर पसरलेलं नदीचं ते पात्र बघून लहर आली आणि तो आत उतरला>>>> आल्याआल्या की साईटची पाहणी करून झाल्यावर, प्लिज क्लारिफाय.
७. थोडीफार खटपट केली पण काहीच होईना.आता यावेळी तीच मेकॅनिक मिळणं अशक्यच होतं.>>>> तीच, तिचा काही रेफरन्स कथेत असेल तर प्लिज क्लारिफाय.

कथा - गूढ हॉरर कथाबीज वाटतंय. बंधाऱ्यात कुणाचातरी बळी गेल्याची दाट शक्यता आहे. चहावाला पुढे स्टोरी सांगणार असल्याची आणि सूरज त्यावर विश्वास ठेवणार नाही (तरुण,हुशार आणि उत्साही) याचीसुद्धा दाट शक्यता आहे.

पुलेशु, पुभाप्र....

@ ज्ञातवासी>>
Title मधे लिहिलय ना 'भाग एक'
मग समजून घ्या ना..
इतके प्रश्न विचारतोयस जसं तुला syllabus ला आहे ही story..
Lol

अज्ञातवासी
भाग एक म्हणल्यावरपण क्रमशः ची गरज का आहे ?
श्रीरामपूर फायनल !
आधी घड्याळ पडलं आणि नंतर साईटची पाहणी पूर्ण झाली,आल्याआल्याच तो पात्रात उतरला होता असा उल्लेख आहे.
चहा 'मस्त थंडगार' कुणी पीत असेल असं वाटत नाही,लोक वाफाळलेलाच पितात.
गाडी बंद पडली ह्याचा स्पष्ट उल्लेख आहे.पंचाईत यालाच म्हणतात.
इतकं लक्ष देऊन कथा वाचलीत आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद.दुरुस्तीचा प्रयत्न केलेला आहे.

सुरजने होकारार्थी की नकारार्थी मान डोलावली, प्लिज क्लारिफाय.>>>1...........
पहिला भाग फारच छान आहे.....पुलेशु

सुरजने होकारार्थी की नकारार्थी मान डोलावली, प्लिज क्लारिफाय.>>>1...........
पहिला भाग फारच छान आहे.....पुलेशु

आचार संहिता संपली असेल त्या गावात आणि /किंवा सर्व तंत्रज्ञ कामगार वगैरे सुट्टीवरून आले असतील परत तर जरा त्या बंधाऱ्याचे उरलेले काम पूर्ण करायला घ्यावे अ.न.वि.

गोष्ट सुरवातीला तर छान वाटते,पण नेमका हा भाग संपला,हे कळणार कसं ? मला वाटतं की लेखका पेक्षा मायबोली ने ,एखादी रचना प्रकाशित करताना, अशा गोष्टींचा विचार केला पाहिजे.