आदर

Submitted by तेजश्री कांबळे on 22 April, 2019 - 05:57

आदर

करता करविता माणूस,जपली सारी माणसं,
जपतां आदर सर्वांचा माणुसकी घडवली

विश्वास हा ठेवला आपुलकीचा,कर्तव्य सांभाळता,
भूमी तंव आपली असता,कठोर श्रम करता

राबता राबता झाला मोठा, नको करू मोठेपणा
कष्ट करुनी हो मोठा,नको गर्व दाखवू तुझा,

करता आदर मात-पित्यांचा,कर आदर मोठ्या माणसांचा,
जप संस्कृती आपली माणसा,कर आदर सर्वांचा.

तेजश्री कांबळे
ठाणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users