(दारूची बाटली)

Submitted by उपाशी बोका on 21 April, 2019 - 15:22

सुप्रिया तैं ची क्षमा मागून सादर करत आहे, गोड मानून घ्या.

(दारूची बाटली)

हाक मारलीस..
ओ दिली !

जवळ आलीस..
मुभा दिली !

दुर्लक्ष केलस.
वाट पाहिली

झिडकारलस..
सूट दिली अर्थात घेतलीसुध्दा !

टाहो फोडलास..
मागे फिरलो !

ग्लास मागितलास..
साथ दिली !

सावली धरलीस..
गझल दिली !

जाम कंटाळलीस..
चकना दिला

सोडू म्हणता साथ सुटत नाही..
तुझे माझे पटता पटत नाही !!

तूच सांग..
करूयात तर काय करूया का पार्टी ??

- तहानलेला बोका

Group content visibility: 
Use group defaults