अशीच येते वेळ एक ती

Submitted by shriramb on 12 April, 2019 - 20:55

अशीच येते वेळ एक ती
अफाट पडतो पाउस उपरा
धो धो बरसुन सर्वांगावर
मनी झिरपतो, करीत निचरा

अशीच येते वेळ एक ती
थेंबांवरती किरण रुपेरी
रंग पसरता इंद्रधनूचे
मनास येते नवी उभारी

अशीच येते वेळ एक ती
रितेपणाची सुटते संगत
न्यूनावर गंडांतर येते
दुर्बलताही जाते खंगत

अशीच येते वेळ एक ती
संचित सरणावरती चढते
मरणाच्या भीतीला मारुन
आरस्पानी सृजन जन्मते

~ श्रीराम

Group content visibility: 
Use group defaults

वाह.... Happy