राधा कृष्ण प्रेम

Submitted by वैशाली अ वर्तक on 11 April, 2019 - 01:50

राधा कृष्ण प्रेम १/४/२०१९
सुधाकरी (अभंग )

जळी स्थळी दिसे l
तीज एकमात्र l
कृष्ण च सर्वत्र l
राधेश्याम ll 1

ध्यानी मनी तोचि l
देवकी नंदन l
करिता मंथन l
हरीनाम ll 2

अविरत करी l
हरिचे चिंतन l
बोलती कंकण l
कृष्ण कृष्ण ll 3

सोड ना आक्रुरा l
कोसती गोपिका l
विनवी राधिका l
क्षणोक्षणी ll 4

नको जाऊ कृष्णा l
कैसे कंठु दिन l
जीव होतो क्षीण l
तुजवीण ll 5

मुरलीचे वेड l
लावीतो मुरारी l
भाळीते बावरी l
राधाभोळी ll 6

नाद मुरलीचा l
हरपतो भान l
राधिकेचे ध्यान.
सदाकाळ ll 7

राधा रमणचे l
प्रेमच आगळे l
जगी या वेगळे l
सर्वाहून ll 8

मूर्ती मंत प्रेम l
भक्तीचे प्रतिक l
प्रेम हे सात्विक l
राधेकृष्ण ll 9

रमण राधेचा l
आत्मा एकरुप l
प्रगटला दीप l
अव्दैताचा ll 10

वैशाली वर्तक

Group content visibility: 
Use group defaults

खूप सुंदर... साधं सोपं सरळ, तुकोबांच्या ओवीसारखं!!!
वाचता वाचता केव्हा संपलं कळलंच नाही.

Sankruti japat kavita karne khup aavghad aahe pan te tummi sidha kelat..
kavita khupach sundar aahe.