बालपण

Submitted by jayshree deshku... on 4 April, 2019 - 02:41

आयुष्यात कधीतरी आपलं जगण
विकृत वाटायला लागत
मन अस्वस्थ होऊन स्वत:च्या
बालपणाची भिक मागायला लागत

ते खोट खोट हसणं
मुखवटा पांघरून वावरणं
आतून चिड चिड व्हायला होत
निरागस हस्यासाठी मन अक्रांदायला लागत

खोटा अहंकार,जीवघेण्या स्पर्धा
मागे किती म्हणून धावायचं असं वाटून जात
लहानपणी हसत बागडत चढवलेला झोका
अन काऊ- चिऊच्या गोष्टी यात मन रमू लागत

संसारात उरवा -पुरवी करताना ,
घराच्या विटा चढविताना
भातुकलीतल्या चूल बोळक्याना
मन खुणावू लागत

कपड्यांचा ढीग, दागिन्यांचा सोस
सार सार काही झुगारून द्याव वाटत
आईच्या प्रेमळ हाकेला ओ देत
तिच्या कुशीत शिराव वाटत

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान ...
फक्त काही टायपो दुरुस्ती
हास्यासाठी, आक्रंदायला

छान आहे.

लागतं, जातं, होतं, वाटतं

बालपणीच्या व मोठेपणीच्या वैयक्तिक गरजा वेगळ्या असतात. मोठेपणीच्या खूप निराळ्या आवडी, गरजा असतात. जोडीदाराचे प्रेम , सहवासाची गंमत, वाटणारी ओढ यापुढे सर्व फिके वाटू लागते. बालपणात कोणतीही जबाबदारी नसते, सर्व गरजा वडीलधारे पुरवतात. बालपण रम्य, सुखात गेले असेल तर प्रत्येकाला गोड आठवण येतेच. पण निसर्ग नियमानुसार सदैव पुढेच जायचे म्हणत नाईलाजाने आयुष्याची वाट चालावी लागते. वाटेत ठेचा लागल्या तर आहेतच त्या सोनेरी आठवणी फुंकर घालायला.
सुंदर आहे कविता.