तिला काही सांगायचय

Submitted by राजेंद्र देवी on 1 April, 2019 - 04:04

तिला काही सांगायचय

आताशी फक्त वाद होतात
संवाद होत नाही
मला काही सांगायचे असते
तिला काही बोलायचं नाही

अंतिरीच्या हाका
एकमेका ऐकू येत नाही
शब्दाविण कळले सारे
असे आता होत नाही

जन्मांतरीची गाठ आपुली
आता ती सुटायची नाही
मला काही बोलायचं नाही
तिला काही सांगायच नाही

राजेंद्र देवी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला, तिला काही सांगायचंय
पण
तिला मात्र मला काही सांगायचं नाहीये
असा अर्थ लावला मी
फक्त "तिला काही सांगायचंय" या वाक्याचे २ अर्थ निघू शकतात

तिला काही सांगायच असतं पण ती ते सांगत नाही कारण संवाद संपला आहे पण एकमेकांना समजून घेतलं जातंय म्हणूनच शेवटी कोणालाच काही सांगायचे नाही असे आहे,

धन्यवाद