खुली किताब

Submitted by www.chittmanthan.com on 30 March, 2019 - 02:13

आपला देश आपली संस्कृती, आपला समाज याबद्दल आपल्याला इतक्यांदा अभिमानाचे डोस पाजलेले असतात किंवा ते आपल्या अंगात इतके भिनवलेले असतात की आपण 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला त्याबद्दलचा अभिमान दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करतोच.

खर तर आपला देश म्हणजे एक "खुली किताब" आहे ज्याबद्दल सर्वच व्यक्तींना सर्व काही माहीत आहे. असाच विचार करून मी newspaper वाचायला घेतला. त्याच त्याच टिपिकल राजकारणाच्या बातम्या...!! एक दोन accidents, rapes किंवा murder यापलिकडे नवीन अणि interesting अस काही नसतच हल्ली..!!

कालच्या newspaper मध्ये दोन तीन headlines होत्या "काँग्रेस चा हुकमी एक्का प्रियांका गांधी" "shabarimala मंदिरात प्रवेश करणार्‍या kanagdurga नावाच्या बाईला घरच्या लोकानी वाळीत टाकले " अणि "लान्स नायक Nazir Vani यांना अशोक चक्र" त्या वाचल्या अणि विचारचक्र सुरू झाले.

प्रियांका गांधी च्या राजकारणातील प्रवेशाच्या बातमीतील राजकारण काढून टाकले तर एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शत्रूशी लढायचे असेल तर तुम्हाला तुमच्या घरातील स्त्रीला फ्रंट फूटला लढवावे लागते किंबहुना तिच्याशिवाय तुम्ही जिंकूच शकत नाही...!!! स्त्री शक्तीची किम्मत कमीत कमी अडचणीत तरी कळते याच बर वाटल...!!

खर तर आपल्याला women power फक्त आपल्या अडचणी सोडवायला हवी आहे कारण जेव्हा ह्याच Empowered women la तिच्या हक्काची जाणीव होते आनि ती ते समाजाकडे मागायला लागते तेव्हा समाजाच्या भुवया उंचावतात. याची अनेक उदाहरणे आपल्या समाजात सापडतील. काही लोक तर इतपर्यंत सल्ले देतात की जितके मिळतय तितक स्वातंत्र्य घ्या अणि गप्प बसा अहो पण ते तुम्ही कधी दिलत. ते स्त्रियांनी समाजाकडून हिसकावून, लढून घेतलय... या देशाकडून समाजाकडून इतकेच नव्हे तर स्वताच्या फॅमिली कडूनसुद्धा ...!!! खर तर बलात्काराला त्याच्या वासनेपेक्षा तिच्या कपड्याला दोष देणार्‍या लोकांकडून दुसरी काय अपेक्षा करणार...!!!

काल वाचलेल्यातली तिसरी बातमी Nazir vani बद्दलची होती. ती वाचली तेव्हा मला पटल की वाल्याचा valmiki आजच्या जगात पण होऊ शकतो. याचा एक terrorist ते अशोक चक्र विजेता आर्मी ऑफिसर हा प्रवास थक्क करणारा आहे. दहशतवादी कारवाया सोडून तो आर्मी मध्ये दाखल झाला अणि असा पराक्रम केला की आज त्याच्या नावावर कीर्ती चक्र, शौर्य चक्र अणि मरणोत्तर अशोक चक्र नावावर आहे.

शेवटी प्रियांका काय kanagdurga काय किंवा nazir काय हिंदुस्थानच्या canvas वर उद्याची पहाट रंगवणारे रंग आहेत. असे रंग भेटले तर दोनचार ओळी सुचतात नाहीतर शेवटच्या पानावरच्या स्पोर्ट्स न्यूज वाचायच्या अणि पेपर घडी करून टेबलवर फेकून द्यायचा...!!!

chittmanthan.ooo

Group content visibility: 
Public - accessible to all site users