उदार

Submitted by वैशाली अ वर्तक on 28 March, 2019 - 03:52

उदार
सृष्टी पहा कशी l सतत उदार l
साहुनिया भार l उदात्तेने ll

लता वेली वृक्ष l सदा बहरुन. l
करिती संपन्न l जगतास ll

अर्पूनिया दान l प्रकाशती सारे l
चंद्र सूर्य तारे l गगनात ll

माय बाप सदा l करिती वर्षाव l
जाणिजे स्वभाव l लेकरांचा ll

देवाने दिधले l आपणास रास l.
द्यावे दुस-यास l हाची धर्म ll

असावे उदार l सदा सर्वजण l
हीच शिकवण l निसर्गाची ll

उदार म्हणोनी l जगती महान l
दानवीर कर्ण l दानशूर. ll

वैशाली वर्तक
(अंर्तमन काव्य संग्रहातील)

Group content visibility: 
Use group defaults