कविता

Submitted by लक्ष्मण खलसे on 28 March, 2019 - 00:55

चंद्रमा शीतल किरणे पेरीत होता
नसेल त्याला आवड त्याची आता
मधुनच कि काय,
रात किडा कण्हत होता

सुसाट वारा नुसता सैरावैरा
तरी लागता त्याला चाहूल तुझी
म्हणूनच कि काय,
तो थबकत होता

अवघी बाग मोहरली, रातराणीच ती
हवेत तिच्या असण्याचा दरवळ
म्हणूनच कि काय,
माझा श्वास गुदमरत होता

Group content visibility: 
Use group defaults