सुलेखन (कॅलिग्राफी)

Submitted by हरिहर. on 26 March, 2019 - 23:29

मी केलेली काही सुलेखने. सुलेखनासाठी मायबोलीवरील काही कवितांच्या ओळी घेतल्या आहेत. सुलेखनाच्या नावाखाली बरेच ठिकाणी अक्षरांची वळणे रेखाटताना मोकळीक घेतली आहे.
वेळेचा अभाव आणि आयपॅडवर काम करताना येणारी अनेक बंधने या मुळे सुलेखनाला अर्थातच अनेक मर्यादा आल्या आहेत. कागद, ब्रश आणि रंग हाताशी येतील तेंव्हा पुन्हा प्रयत्न करेनच.
१.
purandares.jpg
२.
shashap.jpg
३.
मुग्धमानसी.jpg
४.
befikir3.jpg
५.
925D9DB5-30EC-42AF-A9E3-1D590AD37D3F.jpeg
६.
befikr2.jpg
७.
befiker1.jpg
८.
DF96E2F9-E5B6-45EB-9340-D0AF0D4578E8.jpeg
९. पद्मनाभ
3369F868-120D-4A7D-9D7D-8DBDEBEBA958.jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा माझा मायबोलीवरील पहिलाच प्रतिसाद. सुलेखने छानच झाली आहेत. सर्व सुलेखने माझ्यासमोरच रेखाटल्यागेल्यामुळे त्यांचा सुरवातीपासुनचा प्रवास मी पाहिला आहे.
Happy

अप्पा यांनी नुकतेच केलेले हे सुलेखन. त्यांना न विचारताच येथे देते आहे.

mande.parag_.jpg

3179D510-1C6C-4DE3-BE72-5AC55B6DCDCD.jpeg
(प्रतिसाद, स्मायली देता येतात की नाही तसेच मायबोलीवर चित्र अपलोड करता येते का हे पहाण्याचा हा प्रयत्न आहे. Happy )

सुंदर सुलेखनं. कवितांची निवडही छान.
जळताना विझवलेल्या कागदाची पार्श्वभूमीही कवितेच्या आशयाला साजेशी. सारं संपवून पुढे तर जायचे आहे पण आठवणी पायांना मिठी घालून बसल्यात.
माफ करा, पण अ-शुद्धलेखनाची तीट लागली आहे, ती बदलणार का?

जळताना विझवलेल्या कागदाची पार्श्वभूमीही कवितेच्या आशयाला साजेशी. सारं संपवून पुढे तर जायचे आहे पण आठवणी पायांना मिठी घालून बसल्यात. >>>>+ 999
Happy

कारवी शुध्दलेखनात काय दुरुस्ती हवी? ‘खुप दूर’ हे बरोबर आहे की ‘खूप दूर’ हे बरोबर आहे?

खूप आणि दूर दोन्ही दीर्घ
याँदे ---> यादें // सिपीया ---> सीपियाँ // रंग की // बिछा दी // सिपी ---> सीपी किंवा सीप // खूबसूरत

सॉरी हं शाली, इतके सुंदर विचार आणि रेखाटन, इतकेसे उणेही नको रहायला, म्हणून सुचवले...

धन्यवाद कारवी!
मी मुळ सुलेखनात चुका दुरुस्त करतो. पण येथील मात्र करता येणार नाही कारण संपादनाची वेळ संपली आहे.
खरे तर कविने जशी कविता दिलीय ती तशीच्या तशी उतरवली आहे.

कारवी बदल केला आहे. सुचनांबद्दल धन्यवाद!
कवितेसोबत एक शेर आहे. तोही कवितेचाच एक भाग आहे असे कवीचे म्हणने आहे त्यामुळे तोही घेतला आहे.
खूप दूर-side.jpg

शाली जी मागे मुंबई/ठाण्यातील दोन विद्यार्थ्यांनी आपल्या हस्ताक्षराचे फॉंट बनवले होते. कोणीही व्यक्ती स्वत: च्या हस्ताक्षरात टायपिंग करू शकेल असे सॉफ्टवेअर होते ते. तुमच्या पाहण्यात आले आहे का.
मराठी मध्ये शुभेच्छापत्र तयार कशी करावी. आपण नेमके कसे सुलेखन करता म्हणजे फॉंट वापरून की बोटाने स्क्रीनवर लिहून की पेंट सारखे माऊस वापरून?

अशी बरीच ॲप उपलब्ध आहेत.
मी ॲप्पल पेन्सील वापरुन आयपॅडवर काम करतो. थोडक्यात वरील सर्व हे माझे हस्ताक्षर आहे. कोणतेही फॉंट्स नाहीत.
ब्रश ऐवजी स्टायलस आणि पेपर ऐवजी आयपॅड एवढाच फरक आहे. Happy तुम्ही थोडे लक्ष दिले तर तुमच्या लक्षात येईल की एक अक्षर वेगवेगळे दिसते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अ हे अक्षर थोडेफार बदलून आले आहे. फॉंटमधे असे होत नाही. अ हा सगळ्या ठिकाणी सेमच असणार.
अंदाज येण्यासाठी सोबत स्र्किनशॉट दिला आहे.

2ADD65CA-B77F-4F9F-9211-FADBB77385B4.jpeg

3C5A1BD2-C015-49CE-8DF4-E8644EA3C8E1.jpeg

सुंदरच जमलय शाली..
अपुनबी पंखा आपका (होईल कि) आपकी ?
जावंदे बोले तो फॅन एक्दम...

थँक्यु टीना,
मै भी सोचा ये अपना फॅन किधर गायब हो गयेला है इत्ते धुप मे।
Happy Lol

थँक्यु टीना,
मै भी सोचा ये अपना फॅन किधर गायब हो गयेला है इत्ते धुप मे।>> ती जन्मालाच पुजली आहे..


EBADEDCA-BF5E-406A-B5B2-97F60E1246E1.jpeg

F351C805-C7A1-460D-BE59-34DA2F349370.jpeg

Pages