दुनिया रंग बदलते आहे

Submitted by सुप्रिया जाधव. on 25 March, 2019 - 02:48

हक्कांसाठी लढते आहे
धारातिर्थी पडते आहे

रंग लावल्यावर दुनियेचे
दुनिया रंग बदलते आहे

ज्याला हल्ली धूसर दिसते
त्याच्यासाठी सजते आहे

दगड पायथ्याचा झाले मी
वरून कोठे दिसते आहे ?

राखही नाही, मागमुसही !
कापरापरी जळते आहे

पुढे जायचे ठरवत बसते
उभे राहता खचते आहे

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users