डोळस प्रेम

Submitted by JK1234 on 23 March, 2019 - 13:06

पहिल्यांदा अमृताला बघितलं तेव्हा तिच्या मध्ये काही कमी आहे हे जाणवलं नाही पण आपल्या उणिवांवर मात करून पुढे कसं जायचे हे तिच्या बोलण्यात आणि डोळ्यात दिसले. तशी ती दिसायला छानशी , लांब केस , सरळ नाक आणि सुंदर डोळे. दहावीचा शेवटचा पेपर देउन घरी येताना एका कारच्या अपघातात एक पाय गमावला . अश्या अवस्थते तिने Graduation पुर्णे केले .

एका छोट्या कंपनी (Softtech) मधये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम सूर केले . आथिर्क चणचण हा तिच्च्या आयुषयाचा अविभाज्य भाग . डॉक्टर आणि चेकअप वर होणार्या खर्चामुळे कधीकधी पगार पण अपुरा पडते असे. बरं घरी मागायचे तर काय गरज आहे नोकरी कराची हा बोचणारा प्रश्न???

सागर हा सामान्य मुलगा , आयुषयाचा ओझया खाली दबलेला , घरची आर्थिक परिस्थित बेताची . घरी आई ,बाबा , व लग्नाची मोठी बहिन. बाबानी कर्जे काढून त्याचे शिक्षण पुरणे केले त्यामुळे आर्थिक चणचण. सागरच्या लक्षात आला जर घरातील दुःख कमी असेल तर लवकर नोकरी मिळवली पाहिजे आणि काही ठिकाणी रिजेक्ट झालयावर सागर एका कंपनी(Softtech) मध्ये सिलेक्ट झाला.

आयुष्याच्या कडवटपणा मुळे , अमृताच्या बोलण्यातपण कडवटपणा आला होता आणि त्यामुळं तिचा ऑफिस मध्ये मित्र आणि मैत्रिणी नव्हत्या. तिचा आयुषयात कसे होणार आहे वाटत असताना सागरने तिचा प्रोजेक्ट जॉईन केला. अमृताच्या रुक्ष वागण्याने सागरनि तिच्यापासून लांबच राह्यचं ठरवलं पण प्रोजेक्टच्या कामामुळे दोघांना एकत्र काम करावं लागलं.

ऑफिसमध्ये तिच्या कडवटपणा सागरला पण जाणवला . पण ऑफिस कामात मदत करून सागरनी मैत्रीसाठी पुढाकार घेतला . घाबरतच तिने मैत्रीचा हात पुढे केला. आता अमृताला प्रथमच एक मित्र भेटला. ज्याच्याकडे मन मोकळे पणाने ती बोलू शकत होती. तो कधी कधी तिला ऑफिस नंतर घरी सोडू लागला. दोघेही चहासाठी कॅन्टीन मध्ये एकत्र दिसू लागले . सागरनी तिला आपल्या वाढदिवला घरी बोलावले. अमृता सागरच्या घरच्या स्वागताने भारावून गेली. नकळत ती दोघे मैत्रीच्या नाजूक ध्याग्यात बांधली जातं होती. हळू हळू तिच्या बोलण्यात गोडवा जाणवू लागला , तिच्या राहणीमानात बदल झाला ,आयुष्याकडे तिच्या बघण्याचा दृष्टीकोन बदलला.

छोट्या छोट्या प्रसंगातून त्याचाही मैत्री फुलत जात होती .एक शनिवारी अमृता ने सागरला Picture आणि डिनरला बाहेर जाणायबद्दल विचारलं. ३-६ चा शो आणि डिनर करून रात्री घरी आलयावर लक्षयात आलं रूम पार्टनर राधिका (मैत्रीण) तिच्या मावशी कडे गेली आहे . तिला जरा विचित्र वाटलं मग लक्षात आलं , Picture साठी तिने फोन सायलेंटवर ठेवला होता आणि राधिकाचे २ मिस कॉल होते. सागरच्या सहवासात ती फोन चेक करायला विसरली.

अमृता कॉफी बनाव्याला सांगून तो शांतपणे खिडकीच्या बाहेर बघू लागला. आज कॉफीची चव काही वेगळीच लागत होती . घरात ती दोघेच आणि हा एकांत. त्याच्या मनात चलबिचल सुरु झाली. मनातील वादळ घेवून तो तिच्या खूप जवळ जाऊन उभा राहील. अमृता घाबरली , कोणीही कधी तिच्याशी असं वागलं नव्हतं आणि सागर असं वागेल असे वाटले नव्हतं . अचानक झालेल्या प्रसंगातून आणि मानसिक धक्यातून तिचा तोल गेला. सागरणी तिला सावरण्याचा प्रयत्नं केला पण खूप उशीर झाला होता ती खाली पडली, शरीरात एक असह्य वेदना. अपघात झालेल्या पायातून रक्त निघाले आणि पायजमा रक्ताने भरला. अमृताने सागरकडे तिरस्काराने पहिले.

सागर भीतीने सुन्न झाला, तिचं हे रूप बघून सागरला त्याची किळस वाटली. पण झाल्या प्रसंगाने सागर स्वतःची लाज वाटू लागली आणि तो दरवाजाकडे धावत सुटला. रॅकवरचे बूट हातात घेउन तो बराच वेळ अनवाणी चालतं राहिला . घर कधी आले ते कळलंच नाही. त्याने शांतपणे झोपण्याचा प्रयत्न केला पण तिचा चेहरा काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हता.

सोमवारी सकाळी ती छातीत धडधड घेऊन ऑफिसला पोहोचली . त्याला समोर कसं जाणार ह्या विचारानं डोकं बधिर झाला होते. सागर उशिरा आला आणि शांतपणे जागेवर बसून काम करू लागला .

आज पायाच्या जखमी साठी डॉक्टरची अपॉइंटमेंट होती, ती ऑफिस मधून लवकर निघाली. तिला जाताना बघून सागर तिचा मागे धावला. डॉक्टर कडे तिच्या बरोबर जाण्याचा आग्रह करू लागला . तो ऐकणायचा मनस्थितीत नव्हता. तिच्या समोर परत शनिवारचा प्रसंग उभा राहिला. ती घाबरली आणि विचारतं पडली कि काय होणार . मनातील भीती खोटी ठरली. अमृता कॉफी बनाव्याला सांगून तो शांतपणे खिडकीच्या बाहेर बघू लागला .आज तो तिला खूप वेगळा वाटला. घोर अपराधी भावना त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसतं होती. दोघेही डॉक्टरांकडे पोहोचले.

डॉक्टर काकांनी अमृताला विचारला हा कोन , अमृता नि सांगितलं माझा मित्र. डॉक्टर काकानकडे कडे चेकअप करताना मात्र सागर तिच्या जवळ उभा राहिला, डॉक्टरकाकांनि “Artificial Leg” काढताच पुंन्हा रक्ताचे थेम्ब पडले. तिच्या चेहऱ्यावर एक दुःखाची कळ , पण सागरनी दिलेल्या दुःखा एवढी त्याची तीव्रता नव्हती. त्यांनी ड्रेससींग सुर केलं.

तो मात्र शांतपणे तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला धीर देते होता. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून सागरचे डॊळे भरून आले. हळव्या मानाने त्याने आपले अश्रू लपवले . त्याच्या आजचा स्पर्श बरच काही सांगून गेला . तिच्या साठी हे अनपेक्षित होत . भावना विवश होउन तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि जोर जोरात रडू लागली. डॉक्टरकाकांनी तिच्याकसे आचार्यांनी पहिल.

त्यांना तरी काय माहित . त्या दोघात आता खऱ्याअर्थाने मैत्री संपून प्रेम सुरू झाले होते.

लेखक
जीवन कुमार

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अमृताला एवढ्या वेदना होतं असताना, कॉफी करायला सांगणं अन मग स्वतः खुशाल खिडकीबाहेर बघत बसणं, हे डोळस नाही तर कळस प्रेम आहे.

दहावीला असताना झालेल्या अपघातात पाय गमावलेला तर कॉलेज पुर्ण करुन नोकरी करुन मधे इतकी वर्षे गेली तरी जखम रहाते? आणि आर्टिफिशियल फूट मधुन रक्त येतं?
<<<< अमृताला एवढ्या वेदना होतं असताना, कॉफी करायला सांगणं अन मग स्वतः खुशाल खिडकीबाहेर बघत बसणं, हे डोळस नाही तर कळस प्रेम आहे.>>>> Lol
चैतन्य, तिला वेदना होत होत्या असं काही लिहिलेलं नाहीये. पण अचानक झालेल्या प्रसंगातुन असं झालं. नेमकं काय प्रसंग ते स्पष्ट नाही.

काहीही!!

१) सागर अमृताच्या room मधे कधी आला??
२) अमृताच्या पायाबद्दल माहित असून ही तिला काॅफीची Order सोडून खिडकी बाहेर हिरवळ का बघत राहिला??
३) अमृताला diabetes होता की ती lady अश्वत्थामा होती? पायावरचा मणी accident मधे पडल्ल्यायामूले भळभळती जख्म? )पायातूःन रक््त आलं तर आलं ( पायावर सुरी/विळी/कैची/ खेकडा/ बाॅम्ब पडला असेल आणि ते पाहायला लेखक विसरला आसेल) , पण लगेच तिला doc कडे नेन्याऐवजी पळत का सुटला?? याला तिचा खून करायचा प्रयत्न होता का?? का ती मरावी असी आसुरी ईचछा???
४) <सोमवारी सकाळी ती छातीत धडधड घेऊन ऑफिसला पोहोचली . त्याला समोर कसं जाणार ह्या विचारानं डोकं बधिर झाला होते. > तिला कसली भीती वाटली? तो तिला मारायचा प्रययत्न करेल याची?
५) <सागर उशिरा आला आणि शांतपणे जागेवर बसून काम करू लागला .> तो का शांत राहीला? तिला मारायचा नीट plan आखायला?
६) <पण सागरनी दिलेल्या दुःखा एवढी त्याची तीव्रता नव्हती
> या वरन कळत आहे की त्यानेच तिला मारायचा प्रयत्न केलेला....!
७) <तो मात्र शांतपणे तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला धीर देते होता> तिचा विश्वास जिंकुन परत खूनाचा plan? कथेच्या पुढच्या भागासाठी उत्सूक आहे

ही love story नाही crime story वाटतेय.
सागरने आधी अमृताशी दोस्ती केली मग अमृताच्या room मधे येउन तिला मारायचा प्रयत्न केला असावा, पण तो असफल झाल्यामूळे तो पळून गेला...! (नेमकं हे पहायला लेखक विसरले) आता परत तिचा विश्वास जिंकून तो तिचा खून करणार आहे

<सागर हा सामान्य मुलगा , आयुषयाचा ओझया खाली दबलेला , घरची आर्थिक परिस्थित बेताची . घरी आई ,बाबा , व लग्नाची मोठी बहिन. बाबानी कर्जे काढून त्याचे शिक्षण पुरणे केले त्यामुळे आर्थिक चणचण> यावरून अंदाज येतो की सागर mentally disabled होता, serial killer वगेरे. परिस्थितीमुळे..?

असो. पुढचा भाग लिहा... नक्की लिहा... पण crime story असेल तरच आवडेल.
लिहीत रहा,वाचत रहा , लेखन चांगले होईल Happy

कथा तशी बरी आहे, फक्त निट मांडली नाहीये.

मला वाटते, परत एकदा लिहायला घ्या हिच कथा, बर्याच ठिकाणी शुद्धलेखनाच्या चुका आहेत, अन बरीच वाक्ये अपुर्ण ... रादर दोन तिन वाक्यांची सरमिसळ झाल्यासारखी वाटतायेत त्यामुळे काहीच निट कळत नाहीये
सो परत एकदा लिहा, अन निट वाचा मग पोस्ट करा Happy