एकला

Submitted by Asu on 21 March, 2019 - 23:54

एकला

स्पर्धा माझी माझ्याशी
मार्ग माझा एकला
हारजीत तुमच्यासाठी
लढत राहणे मजला

साथ नाही संगत नाही
रस्ता असा सापळा
संग असुनि संसारी
रंग माझा वेगळा

सावलीची आस नाही
उन्हाचा सहवास हवा
राजमार्ग भला तुम्हां
शोधितो मी मार्ग नवा

जायचे कुठे माहित नाही
चालणे धर्म माझा
थांबतील पावले जेथे
तोच अंतिम स्वर्ग माझा

खेद नाही खंत नाही
जगण्याची तक्रार नाही
पांघरूनि कफन देही
मुक्तीची मी वाट पाही

-प्रा. अरूण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults