बदला - सफाईदार रहस्यपट. काही चुका झाल्यात का ? ( स्पॉयलर्स असणार इथे)

Submitted by किरणुद्दीन on 20 March, 2019 - 15:40

अ‍ॅलर्ट : - हा धागा बदला हा सिनेमा पाहीलेल्यांसाठी आहे. ज्यांनी पाहिला नाही त्यांनी कृपया पाहण्याआधी वाचू नये.

सिनेमाच्या कथेबद्दल अर्थातच इथे काही नाही. मात्र सिनेमा कसा वाटला, चुका आहेत कि अचूक रहस्यपट आहे याबद्दल आपण इथेच हितगूज करूयात.

थोडंसं सिनेमाबाबत :
badla.jpg

सिनेमाची श्रेयनामावली सुरू झाली तेव्हांच हा सुजॉय घोषचा सिनेमा असल्याचे समजले. हे ठीकच झालं. नाहीतर तो कसा असेल याच्याबद्दल थोडीतरी कल्पना केलीच असती. मात्र प्रोमोज किंवा दिग्दर्शकाच्या नावावरून सिनेमा ताकास तूर लागू देत नाही. शेवटी चकवा असणार हे ठाऊक असूनही तो चकवतोच. शेवटच्या काही मिनिटात अपेक्षित शेवटाचा अंदाज येतो. मात्र नाट्य खिळवून ठेवते.

अमिताभचे डोळे आता पाहवत नाहीत. पण या सिनेमात ते उत्तमरित्या लपवले गेले आहेत. अर्थात दोन तीन क्लोज अप्समधे ते दिसतात. तेव्हां बघवत नाही. ताजमहाल च्या जागी खंडहर तसं वाटतं. त्याच्या डोळ्यातली आग केव्हांच विझली आहे. मात्र तरीही देहबोली आणि आवाज याच्या जोडीला शब्दफेक यावर अमिताभने बादल गुप्ताचे पात्र भन्नाट साकारले आहे.

सुजॉय गुप्ताच्या सिनेमात ज्या शहरात कथानक घडते त्या शहराचे कथेच्या ओघात होणारे दर्शन हा आता कौतुकाचा विषय नाही राहीलेला. ते एक पात्रंच असतं हे ठाऊकच आहे आपल्याला. सिनेमाबद्दल इतकंच.. रहस्यकथा साकारताना कथेच्या ओघात जाणवणार नाहीत इतपत चुका माफ असतात. मात्र अलिकडे प्रेक्षकांना रहस्यपट पाहून पाहून ब-याच गोष्टींचा अंदाज येतो. कदाचित हाच विचार करून चकवे सोडले गेले आहेत. ते करताना काही चुका राहील्यात का असे प्रश्न पडतात. त्या प्रश्नांवर बोलूयात.

पहिला प्रश्न : -तापसी पन्नूचे कॅरेक्टर उभे करताना गडबड झाली आहे असे वाटले. ती एक यशस्वी उद्योजिका आहे. प्रसिद्ध आहे. पैसा आणि सत्ता आहे हातात. असे लोक एखाद्या नामांकित वकीलाला का पारखतील ? ती ज्या पद्धतीने वकीलाला आपली कहाणी सांगताना धक्के देते तो भाग गंडला आहे असे वाटते. अर्थात चित्रपटाच्या फ्लो मधे ते जाणवत नाही हे ही खरे. मात्र धक्के देणे ही चित्रपटाची गरज आहे. पात्रांची का असावी ? त्यातून एक यशस्वी उद्योजिका आपल्या वकीलाला मुद्दामून गाळलेल्या जागा न भरता डिटेल्स सांगते ते ही कधी, तर तीन तासात तिच्या भविष्याचा फैसला होणार असेल तेव्हां ! हे खरे वाटत नाही.

दुसरा प्रश्न : - कहानी १ प्रमाणेच मेक अप आर्टिस्टला इथेही काम आहे. मेक अप आर्टीस्ट सामान्यांना सहजपणे उपलब्ध होऊ शकतील का ?

तिसरा प्रश्न : - बादल गुप्ता जो आपल्याला सिनेमात पहिल्यांदा भेटतो आणि शेवटपर्यंत तिची कहाणी सांगतो. तो तिला बोलता बोलता बोलतो की माझ्यापेक्षा जास्त रानीला कोण चांगले ओळखेल ? ही हिण्ट तो समोरच्या हुषार मुलीला का देईल ? ज्याला आपले ध्येय साध्य करायचे आहे , तो ही चूक करणार नाही.

चौथा प्रश्न - बादल गुप्ता तिला सांगतो की तुझ्यावर रानीने पाळत ठेवली. तुला भेटायला येणा-यांवर पण तिने पाळत ठेवली. असेच एकदा तिने मला पाहीले माझा पाठलाग केला..... इथे प्रश्न उभा राहतो की अरेच्चा ! म्हणजे हा बादल गुप्ता आणि नैना तर या आधीही भेटलेच होते की... तर मग .... सिनेमा गंडला की काय ?

चौथ्या प्रश्नात माझी काही चूक नसेल तर मग ही चूक माफ करणे अवघड होतेय.
एरव्ही संजॉय घोष एक दमदार रहस्यपट देण्यात कमालीचा यशस्वी झालेला आहे. अंधाधून पेक्षा हा सिनेमा कितीतरी पटीने उत्तम रहस्यपट आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बादल गुप्ता (नकली) जेव्हां नैनाची गोष्ट रिव्हर्स करून सांगतो तेव्हां नैना ते कबूल करते. अर्जुनने त्यांच्याजवळ येऊन कबुली दिल्याने त्याला पहिल्यापासून एक वर्जन ठाऊक असते. त्यानंतर त्यांनी पाठलाग करून खात्री करून घेतलेली असते. आता फक्त तिच्या तोंडून ऐकायचे असते त्यांना..

ते मुखवट्याचं टाळलं असतं तर अनेक बारकावे टिपणा-या या सिनेमाचा शेवट असा झाला नसता. त्या ठिकाणी मेक अप आर्टिस्ट सुद्धा आणता आला असता.

तो फोन चा किस्सा नैना ने सांगितला आहे,
तो कितपत खरा ते आपले आपण ठरवायचे>>>> तसं पहायला गेलं तर मग सगळा सिनेमा नैनानेच सांगितलाय, कशावरून अपघात झाल्यावर लगेच माणूस तिथे येतो व या दोघांना मदत विचारतो? ते पात्र पण नैनाने काल्पनिक उभं केलं असेल कोणीतरी ब्लॅकमेल करतोय हे दाखवायला.

ते पात्र आहे की नाही यांनी राणी ला काहीच फरक पडत नव्हता
पण शेवटी कळते की ते पात्र खरे होते ,तिचा वकील त्याला पैसे देतो तेव्हा,

बादल त्या पात्राचा उपयोग तुला अजून कोण ब्लॅकमेल करू शकेल?? हा प्रश्न पुढे न्यायला करतो, आणि सुई राणीकडे वळवतो

आता कोणाला माहीत तिच्या वकिलाने त्या माणसाला खरोखर पैसे दिले की नाही ते, ती पण नैनाने मारलेली थाप असू शकते. संपूर्ण चित्रपट नैना सांगेल तीच पूर्व दिशा आहे, अमिताभला फक्त तीन गोष्टी नैनाच्या तोंडून वदवून घ्यायच्या आहे सनीचा खून, त्याची डेड बॉडी कुठे आहे आणि अर्जुनाचा खून, बाकी नैनाने कितीही थापा मारल्या आणि त्याला माहित असेल तरी तो काही बोलणार नाही.

बोकलत,
शेवटी तिच्या लॉयर चा फोन येतो तेव्हा तो तिला सांगतो,
तेव्हा ती अनुभव/घटना कथन मोड मधून बाहेर आलेली दाखवली आहे

ब्लॅक मेलर ला जिमी पैसे देताना दाखवला आहे, ती प्रत्यक्ष घडलेली घटना आहे कारण तो फोनवरून नैनाशी बोलतो
ही कहाणी नाहीये, म्हणजे नसावी

पण फोन जर अर्जुन कडे नव्हता आणि नैना कडेही नव्हता तर राणी ला कसे कळले की तो शेवटापर्यंत मेसेज चेक करत होता
फोन चा ट्रेस लागला कुठून

ब्लॅक मेलर ला जिमी पैसे देताना दाखवला आहे, ती प्रत्यक्ष घडलेली घटना आहे कारण तो फोनवरून नैनाशी बोलतो>>>>

हो ही सत्य घटना , पण तो ब्लॅकमेलर नसतोच, तो फक्त साक्षीदार असतो त्या दोघांना अपघातग्रस्त गाडी जवळ पाहिलेला,
नैना विचारते सुद्धा, तो कोर्टात काही बोलणार नाही ना म्हणून

जर अर्जुन कडे नव्हता आणि नैना कडेही नव्हता तर राणी ला कसे कळले की तो शेवटापर्यंत मेसेज चेक करत होता>>>>>

ज्याच्या बरोबर मेसेज चालले असतील त्याने सांगितले असेल शोध सुरू झाल्यावर. म्हणून राणी ला कळले तो किती वाजे पर्यंत ऑनलाईन होता, किंवा व्हाट्सअप्प वर लास्ट सीन असे काहितरी (जे आपल्याला दाखवले नाहीये)

गाडी ढकलताना सनी जिवंत होता, हे नैना आवर्जून का सांगते?
तिच्या आधीच्या फिलॉसॉफी प्रमाणें लॉयर ला त्या माहितीने काहीच फरक पडणार नसतो

कारण उद्या बॉडी सापडली तर कोज ऑफ डेथ एकसिडेंट न होता पाण्यात धकळल्याने मृत्यू असा होईल,

म्हणजे आधी 304 कलम ( निष्काळजीपणामुळे दुसर्याचा मृत्यू) लागले असते , आता 302 ( खून करणे)

**** स्पॉयलर अलर्ट ****

१. तो मुलगा डिक्कीला आतून लाथा बुक्क्या मारण्याएव्हढा फिट होता तरी ढकलून दिलं तिने पाण्यात.. तरीही अमिताभ ला सांगताना "पर तब तक बहुत देर हो चुकी थी" असं का म्हणते?

२. त्याला वाचवलं असतं तर छोटासा का होईना पण खटला चालला असता.. आणि ती दुसऱ्या पुरुषासोबत होती हे उघड झाले असते ते टाळण्यासाठी जिवंत माणसाला पाण्यात बुडवून मारलं? तिची सो कॉल्ड पॉवर वापरून तिला तेवढी फॅक्ट लपवता नसती आली? किंवा तिथल्या लोकांना मॅनेज नसतं करता आलं?

३. बाकी निम्मी उर्फ निर्मल अभिनयात पारंगत असतो असा उल्लेख करून त्यांनी त्याला वकिलाची भूमिका एवढी चांगली कशी वठवता आली याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. पण वर कोणीतरी म्हटलंय त्याप्रमाणे नुसता अभिनय आणि कसलेल्या वकिलाप्रमाणे नुसत्या स्पॉंतानीयस संवादातून जिगसॉ पझल सोडवत जाणे यात फरक आहे. ते निम्मिला कसे जमले असावे?

४. प्रॉस्थेटिक मेकप माणसाचा चेहरा इतका बदलू शकतो?

५. निम्मी उर्फ निर्मल कोणत्याच अँगलने भारतीय वाटत नाही.

६. रच्याकने चित्रपटाचा सारांश असा की चित्रपटात अमिताभ नाहीच्चे Lol

७. चित्रपटात गाणी, अश्लील सीन्स, घरगुती ड्रामा नाही ही जमेची बाजू.

८. अमृता सिंग आधी जरा जास्तच अघळपघळ दाखवली आहे ते अजिबात डायजेस्ट झालं नाही. कोणतेच परदेशस्थ भारतीय असे असतील असं अजिबात वाटत नाही.

निम्मी उर्फ निर्मल कोणत्याच अँगलने भारतीय वाटत नाही.

त्याचे डायलॉगही नीट डब किंवा लिपसिंक झालेले नाहीत. तो बोलतोय काहीतरी वेगळं आणि ऐकू काहीतरी वेगळंच.

थिएटरमध्ये पाहूनही, पायरेटेड कॉपी नव्हे

मिरर, डिस्ने टाइप दिसणार हॉटेल , तिन प्रश्न बाप रे ट्रेलर पाहुन इतक्या कॉप्या सापडल्या , ऑफिशियल रिमेक म्हणजे फ्रेम टु फ्रेम कॉप चाल्ते का? ओरिजनल सिनेमा आवडला आहे.
हा नेफीवर आल्यावर बघु.

उद्या बॉडी सापडली तर कोज ऑफ डेथ एकसिडेंट न होता पाण्यात धकळल्याने मृत्यू असा होईल,>>>>>

आम्ही त्याला मेलेला समजून डिक्कीत टाकले, तो जिवंत होता हे गाडी पाण्यात ढकलताना मला माहित नव्हते
असा बचाव तिला करता आला असता,

मला वाटते, एका सेकंदात प्रेक्षकांचे तिच्याबद्दल चे मत परिस्थितीची बळी ते पाषाण हृदयी असे बदलण्यासाठी तो संवाद योजला असावा

डेथ डिक्लेर करणे पोलीस , हॉस्पिटलचे काम आहे , त्यांना इंफॉर्म करायचे सोडून डायरेकत बॉडी नदीत ढकलली,

पण तो जिवन्त असल्याने आता मृत्यूचे कारण , पाण्यात धकळल्याने मृत्यू हेच होणार व मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल 304 लागू होणार, बचाव करायला मार्गच नाही. अनवधानाने केले असते तरी 304 लागू होतेच , आता तर मुद्दाम ढकलले , म्हणजे 302 , खुनाचे कलम

Pages