राहूनी...

Submitted by आरपार on 19 March, 2019 - 02:42

काय मी एवढ्या व्यापात होते,
तुझी खुशाली पुसायचे राहूनी गेले...

काय मी एवढ्या धुंदीत होते,
तुझे कोडकौतुक राहूनी गेले...

काय मी एवढ्या घुश्श्यात होते,
तुझे ऐकायचे राहूनी गेले...

काय मी एवढ्या दुःखात होते,
तुझे अश्रू दिसायचे राहूनी गेले...

काय मी एवढ्या नशेत होते,
तुला खांदा द्यायचेही राहूनी गेले...

Group content visibility: 
Public - accessible to all site users