सहजीवन -सहचर्य

Submitted by mrunal walimbe on 16 March, 2019 - 03:17

आज संध्याकाळी घराबाहेर पडले थोडीशी भाजी फळे आणि इतर सामान आणायचे होतेचं अन् तेवढच बाहेर मोकळ्या हवेत फेरफटका मारल्याचा आनंद ही लुटायचा होता.
बाहेर पडले पण सोसायटी तून बाहेर पडेस्तोवर थोडासा वेळचं झाला वाटलं चला निम्म्या तूनच परतूया का काय पण मन काही ऐकेना मग तसेचं पाय ओढत ओढत पुढे पुढे चालत राहिले.
पण दिवाळी संपल्यामुळे आणि अजून शाळांना सुट्ट्या असल्यामुळे खूप सारे मध्यमवयीन (साठीच्या आसपासचे) आजी आजोबा फिरताना दिसले...
नेहमी कसे नात येणार नातू येणार म्हणून अडकलेले हे आजी आजोबा आज मात्र पायात कुठल्याही प्रेमळ पाशाची बेडी नसल्यामुळे निवांत अन् काही से मुक्त पणे फिरावयास बाहेर पडलेले दिसत होते.
कुणी आजी आजोबांच्या आधाराने तर कुणी आजोबा आजीच्या सहाय्याने थोडेसे झुकत मनीच्या गूजगोष्टी करताना पाहून खरचं गंमत वाटली.
मधे एक पुस्तक माझ्या वाचनात आले होते त्याचं नाव नीटसं आठवत नाही पण आज त्याची खूपच आठवण झाली. पुस्तक हे सहजीवनावर होते. लेखकाने फार सुंदर पद्धतीने सहजीवनाचा अर्थ त्यात नमूद केला होता.
आज जेव्हा हे सारे आजी आजोबा पाहिले ना तेव्हा खरचं कुठेतरी मनात जाणवत राहिले हेच ते सहजीवन.
आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा माणूस आपली सारी कर्तव्ये पार पाडून थोडासा या व्यवहारी जगापासून मोकळा झालेला असतो ना तेव्हाच त्याला असे छोटेसे सहजीवन जगण्याचे क्षण सापडतात.
मी ज्या पिढी बद्दल आता म्हणते आहे ना त्या पिढीला आताच्या मुलांसारखी मोकळी ढाकळी राहण्याची जगण्याची सवयच नव्हती. पण त्यांच्या कडे एक जबरदस्त
Sixth sense होता...
आजीला कुठल्या तरी गोष्टी ची गरज असेल तर तिने न सांगताच ते आजोबा ती गोष्ट घेऊन हजर.. आहे की नाही तादात्म्य
हीच तर या लोकांच्या सहजीवनाची नीव .
ह्या पिढीने खूप खस्ता खाल्ल्यामुळे त्यांना
त्यांच्या तारुण्यात काही गोष्टी नाही करायला मिळाल्या पण तरीही त्यांच्या त काही प्रेम नव्हते असे नाही.
आजच आणखी एक सहजीवनाची गोष्ट एका sony मराठी च्या 'ह म बने तु म बने' या मालिकेत बघितली.
त्यातील आप्पा हे पात्र साठी ओलांडलेल्या आजोबांचं प्रतिनिधित्व करतं तर माई हे पात्र साठी पार केलेली आजी.
तर गोष्ट तशी खूपचं छोटीशी अन् वरकरणी बघता अगदी साधीशी.
होत असं की आप्पा त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्री माईंना शब्द देतात की आपण बंगला बांधला की मी त्या बागेत आलेलं पहिलं गुलाबाचं फुलं तुझ्या डोक्यात माळीन. पण सगळ्या प्रपंचाच्या व्यापात ते कुठेतरी विरुनचं जातं.मग retired झाल्यावर आप्पांना वेळच वेळ असतो त्यामुळे ते त्यांची बागेची आवड जोपासू लागतात. गुलाबाचं झाडं लावतात अन् आता त्याला फुलही येतं पण त्यांच्या नातवाला त्याचं फुलाचा गुलकंद हवा असतो म्हणून तो ते तोडणारं एवढ्यात आप्पा त्याच्यावर डाफरतात. त्याला म्हणतात तुला हे फुलं अजिबात मिळणारं नाही. घरातले सारेचं अंचबित होतात की नातवाचे लाड पुरवण्याच्या वयात आप्पा स्वतः कसे काय हट्ट करतात?
आप्पा स्वतः चं मघा म्हटल्याप्रमाणे सारा खुलासा सगळ्यांसमोर करतात अन् म्हणतात अरे दुसरा गुलाब येण्याची वाट पाहण्याचा patience नाही रे माझ्यात कारण आता किती दिवस आहेत आपल्याजवळ माहित नाहीत पण तरीही या सहजीवनातं माईला दिलेलं वचन पूर्ण करण्याची मात्र खूप ईच्छा आहे रे!
खरचं हा सारा episodeबघताना थोडसं काळजात चर्र झालं आणि वाटलं माणूस खरचं आपल्या सहचाऱ्याचा किती शेवटपर्यंत विचार करतो ना..
याचाचं तर प्रत्यय मला दिसत होता पावला पावला गणिक आपल्या सहधर्मचारिणीला सावणारे आजोबा अन् आपल्या कपाळावरच्या ठसठशीत कुकंवाला आधार देणारी आजी.
किती सुंदर सात्विक असं दृश्य हे! कि जे पाहून माझे डोळे आनंदाने अन् कृतकृतार्थतेने पाणावले..
यावरून माझीचं एक सहजीवनावरील जुनी कविता आठवली.

सहजीवन- एक कृतार्थ आयुष्य

सहजीवन, सहचर्य ते काय असतं?
प्रत्येक लग्न झालेल्या जोडप्याला
ते लाभलेलं असतं
कुणी कसं खुलवायचं
कुणी कसं निभावायचं
कुणी कसं जमवायचं
हा ज्याचा त्याचा प्रश्न?
सहजीवनातं '*मी*' ला स्थान रितं
अन् '*आम्ही*' ला स्थान जास्तं
सहजीवन म्हणजे फुलांचा सडा
पूर्णपणे जमीन भिजवून टाकलेला
आसमंतात सुगंध दरवळणारा
सहजीवन म्हणजे गरुडझेप
आकाशाला गवसणी घालणारी
कधीही मागे वळून पाहिला न लावणारी
अशा या सहजीवनातं
साखरेप्रमाणे विरघळावे
अन् त्याचा आनंद घ्यावा
इतरांनाही उद्भोद् द्यावा
हीच तर खरी गमंत आहे
सहचर्याची.

©मृणाल वाळिंबे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आमच्या आजोबांनी तर आमच्या आजीला पीड पीड पीडलं.
काही सहजीवन वैगेरे नसावं तरुणपणी आणि म्हातारपणातही.
<<<आजीला कुठल्या तरी गोष्टी ची गरज असेल तर तिने न सांगताच ते आजोबा ती गोष्ट घेऊन हजर>>> छे! स्वतः आणणं दुरच उलट मुली/मुलांनी तिच्या आवडीची काही वस्तु आणुन दिली तरी टोमणे मारायचे रागारागाने Lol

अशी खूप उदाहरणं मिळतील बघायला सस्मित. माझ्या ओळखीच्या एक आजी तर आख्खं आयुष्य आजोबांच्या दादागिरीला घाबरून जगल्या. आता आजोबा गेल्यावर जरा हसताना आणि निवांत दिसतात.

हम्म..
त्या काळी हे प्रतिसादात लिहिलेले चित्र सर्वत्र असायचे हे खरे असले तरी लेखात वर्णिलेले सहजीवनाचे नमुनेही तुरळक का होईना पण पाहिलेले आहेत.

ज्यांना हे सहजीवन लाभले ते खरेच जगले.... बाकीचे केवळ जन्माला आले म्हणून आयुष्य कंठीत राहिले.

छान आहे...अलीकडच्या पिढीत खूपशी अशी आजी आजोबाची जोडपी दिसतील...पण खूप वेळा मुले( मुलगा सून मुलगी) नोकरी करत असल्याने नातवंडे आणि घर सांभाळण्यात च बिझी असतात

हौ रोमँटिक <3 Blush Blush

एकदा कोथरूड स्टँड बसस्टॉपपाशी बसची वाट बघत थांबले होते. सकाळी ७.३० च्या आसपास वेळ. कर्वे पुतळाकडून भरधाव स्कुटर येताना दिसली. आणि चाक स्किड होऊन माझ्यासमोरच्या डीवायडरपाशी दनकन आदळली. मागे बसलेली स्त्री आपलीआपण पटकन उठून स्टॉपच्या खुर्चीवर येऊन बसली. तिचा नवरा तिकडेच पडला होता त्याच्याकडे ढुंकूनदेखील पाहिलं नाही. दोघे मध्यमवयीनच होते. ६० च्या आसपास वय. स्वातंत्र्यानंतर जन्मलेले.