मन तुझ्यात गुंतले

Submitted by वैशाली अ वर्तक on 15 March, 2019 - 06:27

विषय- मन तुझ्यात गुंतले

सहज झाली नजरा नजर
अन् भरली थेट मनात
सावरली तिने लाडिक बट
भावली तिची अदा क्षणात

लागले जीवास वेड
सतत तिजला "पाहणे"
होता जरा नजरे आड
शोधिले भेटण्या बहाणे

योगायोगे आली सामोरी
भेट घडली अवचित
निरुत्तर उभी ठाकली
न उमजे बोलणे कदाचित

साधिला मुक संवाद
नजर कटाक्षांनी क्षणिक
कळले न , माझेच मला
कधी?कसा? झालो भावनिक

होता देवाण - घेवाण
शब्दांची अमुच्यात चार
ठरले भेटण्याचे ठिकाण
मन झाले आगतिक फार

सहज घडलेली भेट
अजुनी ही स्मरते मनीं
"मन तुझ्यात गुंतले "
कळले मज त्याच क्षणी .

वैशाली वर्तक (अहमदाबाद )

Group content visibility: 
Use group defaults