प्रेम विरह

Submitted by वैशाली अ वर्तक on 15 March, 2019 - 06:25

प्रेम विरह काव्य ( ९वर्णीय)

कशी मी साहू हा विरह
कैसे कंठू दिन एकेक
जरी असता राजसुख
उदास हा दिन प्रत्येक

नयनी दिसे तव मूर्ती
पहावे, तर कळे भास
वाटे तू आलास समीप
ध्यानी मनी तुझाच ध्यास

अनिल, शशी करवी - ही
कितीदा धाडिला सांगावा
धरिलास का रे अबोला
कर ना , तू दूर रुसवा

वैरीण भासे मज रात्र
जग हे निद्रेच्या खुशीत
रहाते मी तळमळत
तव आठवांच्या कुशीत

राहूनी सेवेत रामाच्या
कृतार्थ पणाने जगला
माझ्या मनीचा मुक भाव
कधी न तुला उमगला

असुनी मी राज मंदिरी
सोशिली दशोत्तरी चार
अंधारातील ज्योती सम
विरह सोशिला अपार.

....... वैशाली वर्तक

Group content visibility: 
Use group defaults