माय मराठी

Submitted by वैशाली अ वर्तक on 15 March, 2019 - 06:18

माय मराठी (12 वर्णीय काव्य)

मराठी असे, आमुची मायबोली
पायिक तिचेच, राहू सदा काळी
असे ती गोड , अमृताहून - ही
विसरु नयेत, ऋण कदा काळी.

कसे ?किती? वर्णू , तिचे गुण गान
सर्व भाषेत तिची , वेगळी शान
संपन्न ,समृध्द अन् अलंकारिक
तिच्या गौरवाने, उंचाविते मान.

भुपाळी गाऊनी, उठवे सकाळी
भक्तीरसाची गाई ,उदंड गाणी
वीररसात स्फूरली , पोवाड्यांनी
अभंग -ओवी , जणू गंगेचे पाणी.

नवरस संपन्न ही मायबोली
वृत्त , छंद ,समासाने नटणारी
ज्ञानदेव तुकाची अमृत वाणी
संस्कार ,कला, संस्कृती जपणारी

दिन सोनियाचा , आज उगवला
करू साजरा गौरवाने जियेचा
लिहूनी ,बोलूनी , वाचवू भाषेला
ठेवू मान सर्व ,जगती तियेचा.

......वैशाली वर्तक 1/3/2019

Group content visibility: 
Use group defaults

छान