२०१९ लोकसभा निवडणूक अंदाज

Submitted by मेरीच गिनो on 13 March, 2019 - 21:40

निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. एरव्ही राजकारणाबाबत उदासीन असणारेही जागरूक झाले आहेत.
सर्वांच्या उत्सुकतेचा विषय म्हणजे या वेळी काय होणार ?

गेल्या वेळी प्रचंड अपेक्षा वाढवून ठेवत नरेंद्र मोदींचे सरकार अस्तित्वात आले. काँग्रेसचा भ्रष्टाचार, धोरण हीनता, अण्णा हजारेंचे आंदोलन या पार्श्वभूमीवर मोदींनी स्वतःला समर्थ पर्याय घोषित करताना वारेमाप आश्वासने दिली. त्यातली कित्येक आश्वासने त्यांच्याही लक्षात राहिलेली नाहीत.

प्रधानमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यावर त्यांनी उत्तर प्रदेशातल्या एका सभेत सांगितले की तुम्हाला सहा महीने काम आणि सहा महीने सुट्टी मिळेल. सहा महीने तुम्ही शेतीची कामे बघा. शेतमालाला दुप्पट भाव मिळेल. पीक विमा संरक्षण मिळेल. जमिनीची गुणवत्ता सुधारून देऊ. कंपनी शेती करून फायदा चौपट करून देऊ.

याशिवाय दोन कोटी रोजगार. प्रत्येकाला रहायला घर, १०० स्मार्ट सिटीज, स्विस बँकेतून काळे धन आणणार अशा प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता. काळ्या धनाचा मुद्दा निवडणुकीचा मुद्दा बनला. या शिवाय प्रत्येक राज्यात, शहरात तिथल्या समस्यांबाबत आश्वासने दिली गेली.
यातली किती आश्वासने पूर्ण झाली हा संशोधनाचा विषय आहे.

सरकारी आकडेवारी फसवी आहे असे अनेकांनी निदर्शनास आणले. जीडीपीचे निकषच बदलले गेले आहेत. हेच निकष लावून मागच्या सरकारांची कामगिरी पुन्हा पाहिली तर आताची जीडीपी खोटी आहेत हे दिसून येते. अर्थव्यवस्था संकटात आहे. नोटाबंदीत अनेकांचेरोजगार गेले. दोन कोटी रोजगार पूर्ण झाले नाहीत. पकोडे तळण्याचे सल्ले दिले गेले.

मात्र निवडणुका सरकारच्या परफॉर्मन्सवर होणार का ?

२०१४ ला अमितस शहांनी त्या त्या राज्यात नाराज आणि सत्तेपासून दूर असलेल्या तसेच संधीसाधू अशा सर्व घटकांना सोबत घेतले होते. बिहारात रामविलास पास्वानांना काँग्रेस आणि राजद पुरेशा जागा देत नव्हते. अमित शहांनी त्यांना भरघोस जागा देत ७ खासदार निवडून आणल्याने त्या पक्षाला बिहारमधे ३४ जागांची लॉटरी लागली. नितीशकुमार तटस्थ राहिल्याचाही लाभ त्यांनाच मिळाला.

उत्तर प्रदेशात देखील अनेक छोटे घटक सोबत घेतले. महाराष्ट्रात मराठेतर अनेक छोटे मोठे समूह गळाला लावले. धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन देऊन तो समाज सोबत घेतला. यामुळे काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली. राष्ट्रवादीची बारामती सीट कशी बशी वाचली. अशी मोट प्रत्येक राज्यात बांधली. असे सूक्ष्म सोशल इंजिनयरींग करत पुढे ते विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधेही पुढे नेले. मात्र धनगर आरक्षणासारखी आश्वासने पूर्ण न झाल्याने त्यांच्या एखाद दोन मंत्र्यांना सत्तेचा लाभ चाखता आला तरी बाकीचा समाज अस्वस्थ आहे. युवक अस्वस्थ आहेत. व्यापारी नाखूष आहेत.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस पुन्हा त्याच जुन्या चुका उगाळताना दिसते. महाराष्ट्रात १९९८ चा अपवाद वगळता गेल्या सहा निवडणुकात एकत्रित काँग्रेस किंवा शरद पवार अधिक काँग्रेस कधीही २४/२६ जागांच्या वर गेलेले नाहीत. दोन तीन वेळा २० च्या खाली राहीले आणि २०१४ ला फक्त पाच जागा आल्या. त्यातल्या चार राष्ट्रवादीच्या होत्या. यातली एक उदयन राजेंची !
या पार्श्वभूमीवर राज्यातल्या छोट्या छोट्या समूहांना सत्तेचा वाटा देण्याची नीयत काँग्रेसने दाखवली नाही. परिणामी तिसरा पर्याय उभा राहिला. सतत हारलेल्या १२ जागा देतानाही झुलवत ठेवल्याचा परिणाम म्हणून आघाडी झालीच नाही. उत्तर प्रदेशात जिथे ताकद नाही तिथे जास्त जागांचा आग्रह धरायचा आणि जिथे आपली ताकद आहे तिथे अपमानास्पद प्रस्ताव द्यायचे यामुळे काँग्रेससोबत युती झालेली नाही.

मात्र या तिस-या आघाडीने भाजपशीही जुळवून घेतलेले नाही. याचा परिणाम म्हणून तिरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे. तरी देखील भाजप २०० च्या पलिकडे जाणार नाही असे अंदाज होते एव्हढी प्रचंड नाराजी या पक्षाबाबत आहे. मात्र बालकोट एअर स्ट्राईकनंतर पहिल्यांदा मतदान करणारे युवा भाजपकडे आकर्षित होतील तसेच अन्यही समस्या विसरून भाजपला मत देतील असा होरा आहे.

मात्र स्पष्ट बहुमत या पक्षाला मिळणार नाही. फार तर २०० जागा मिळतील. स्पष्ट बहुमतासाठी मित्र पक्ष धरूनही जागा कमीच पडणार आहेत. अशा वेळी कुणाच्या तरी पाठिंब्याची गरज भासेल. १० / १२ जागा कमी आल्या तर कुणाचाही पाठिंबा मिळेल. पण ४० पेक्षा जास्त जागांची गरज भासली तर सत्ता भाजपचीच येईल पण मोदी पीएम होणार नाहीत या पवारांच्या विधानाचा प्रत्यय येऊ शकेल.

युपीएची सत्ता येण्याची शक्यता धूसर वाटते.

तुम्हाला काय वाटते ? आपापले अंदाज लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागच्या इलेक्शनला राष्ट्रवादीच्या चार व काँग्रेसच्या दोन जागा आल्या होत्या.
मला वाटते युपीए सत्तेत येऊ शकेल पण बरीच मोठी आघाडी करावी लागेल.

याचा परिणाम म्हणून तिरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे. >>
रंगाचा बेरंग करणार ही आघाडी. तुला ना मला घाल कुत्र्याला टाईप गत झालीय त्यांची. आधीच कमी असलेल्या मते फोडायची कामं ही आघाडी करणार एवढं नक्की.त्यामुळे भाजपच्या सिटा मागच्यापेक्षा वाढल्या तरी आश्चर्य वाटायला नको

तुला ना मला घाल कुत्र्याला टाईप गत झालीय त्यांची >> एक चोर आणि एक खूनी यातला एक नवरा निवडायचा पर्याय दिला तर बाईने बिनबोभाट निवडावा का ? की तिसरा पर्याय बघावा ?

छान लेख. सर्वांच्याच हिताचा विषय आहे. दिल्लीकर भाजपा कडे किंवा आप कडे जातात हे बघायचे. मागच्या वेळेस लोकसभेत ७ पैकी ७ भाजपा आणि पुढे काहीच महिन्यात विधानसभेसाठी ७० पैकी ६७ जागा आपला होत्या.

स्पष्ट बहुमत कुणालाही मिळण्याची शक्यता कमी वाटते. मी आवडीने हा धागा फॉलो करणार.

Bjp च्या जागा ह्या वर्षी कमी होतील असे मला वाटते .
कारण BJP परत स्पष्ट बहुमतांनी निवडून आली तर कामगार हिता विरुद्ध निर्णय घेईल असे खूप लोकांना वाटत .
जमीन अधिग्रहण विषयी वटहुकूम काढून त्यांची भूमिका शेतकरी हिताची नाही अशी सुधा भीती आहे .
Gst मुळे व्यापारी बिथरले आहेत .
ह्या सर्व कारणानं BJP chi mat Kami होतील .
पण भावनिक प्रश्न मतदारांची मत swing Karu शकतात .
त्या मुळे सर्वांनी भावनेच्या आहारी न जाता विचार करून योग्य व्यक्तीला मत देणे आवश्यक आहे

मला वाटते भाजप उत्तम बहुमताने विजयी होईल. त्यांचे संघटन आधी होतेच आणि आता निवडणुकीच्या कितीतरी आधीपासूनच अतिशय बळकट बनवले गेले आहे. घरोघरी उत्तम संपर्क सुरू आहे. धार्मिक कार्यक्रम, सप्ताह यांची धमाल उडवून दिली जात आहे. ऐन हंगामात रामनवमी येते. त्याचा पुरेपूर वापर करून घेतला जाईल हे उघड आहे. मुंबई आणि ठाणे-पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर संघटन आणि मस्तिष्कमार्जन झाले आहे.
पुलवामा-बालकोट परिणाम तर मोठ्या प्रमाणावर आहेच. विकासाचे मुद्दे कधीच बाजूला पडले आहेत. विद्यार्थी, तरुण पिढी भाजपच्या मागे आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. मतदार याद्या तपासण्याचे कामही कधीपासूनच सुरू आहे. जे दिसतेय ते असे आहे.
फक्त उत्तर प्रदेशात जागा कमी होऊ शकतील आणि कदाचित बिहार राजस्थानात. उत्तर प्रदेश अखिलेशच्या बाजूने किंचित झुकतो आहे असे या क्षणी वाटते.

भाजप - ३००+
एनडीए - ३५०+

पंतप्रधान - श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी

एक बदल होण्याची धूसर शक्यता आहे.

विरोधी पक्षनेत्या - सौ. प्रियंका रॉबर्ट वाड्रा

इ वी एम है तो मुम्किन है...
Submitted by हेला on 14 March, 2019 - 13:01

भाजप जिंकला तर इवीएममुळे

आणि

इतर कोणी जिंकले तर तो जनादेश

असा पवित्रा निकालानंतर घेण्यात काहीच अर्थ नाही.

स्विंग निवडणूक असेल. भाजपा 240 किंवा 180. अध्ये मध्ये काही नसेल. NDA घटक पक्ष 30 ते 60

काँग्रेस 65 किंवा 120, काँग्रेस साथी 30 ते 50.

फेडरल फ्रंट: 80 ममता अखिलेश मायावती वगैरे

हा धागा फॉलो करत रहायला आवडेल

माबोवर अनेक जण मुद्देसूद विश्लेषण करत असतात, अनेकदा चांगली माहिती मिळते
पण इथंही नेहमीचे यशस्वी कलाकार येऊन मागचे स्कोर सेटल करत, व्यक्तिगत चिखलफेक करत राहिले तर त्यांचे काय करावं हा प्रश्न आहे

महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीचा फरक पडेल असे वाटते का, अडले दिवसपर्यंत शिव्या घालणारे आता गळ्यात गळे घालत आहेत
मनसे ला तर कोणीच विचारत नाहीत
राष्ट्रवादी घराणेशाही आणि माढा मध्ये गुरफटले आहेत
कॉग्रेस बाजी मारणार काय गुपचुप येऊन?

या निवडणुकीत स्वामी ओम विजयी होणार आहे, आणि रामराज्य स्थापन करणार आहे. तसेच पाच वर्षाचे असल्यापासून ते गंगेच्या पात्रात एका पायावर उभं राहून रात्रंदिवस तपश्चर्या करत होते त्यामुळे या निवडणुकीत तेच विजयी होणार आहेत. त्यांनी यज्ञ पण सुरू केला असेल आतापर्यंत.

भाजप समर्थकांना माझा एक प्रामाणिक आणि स्वच्छ प्रश्न आहे. भारतात सरकारवर नियंत्रण ठेवणारी , त्यांना हिशोब मागणारी, त्यांचे चुकले तर दाखवून देणारी, सरकारद्वारे कोणा घटकांवर अन्याय होत असल्यास त्याविरोधात आवाज उठवणारी अशी कोणतीच यंत्रणा, संस्था, पक्ष, व्यवस्था तुम्हाला नकोच आहे का?

अण्णा हजारेंनी ह्याचसाठी, लोकपाल कायद्याची मागणी २०११ मधे केली होती. त्यावेळी, त्यावेळच्या सरकारने अण्णांना खलनायक ठरवत त्यांची पुरेपुर बदनामी केली होती. त्यावेळी कॉंग्रेस ममर्थकांना वरिल प्रश्न का पडला नाही ?

कॉग्रेस बाजी मारणार काय गुपचुप येऊन?>>
ह्म्म, तसे दिसत आहे खरे. बहुतेक ठिकाणी बिजेपी आणि काँग्रेस इतकी सरळ लढत होईल असेच दिसत आहे. प्रादेशिक पक्ष संपवायचे व्रत घेतले आहे या दोन्ही पक्षांनी आणि बीजेपी सध्या आघाडीवर आहे ह्यात.
मोदी आणि पार्टी राहुल आणि काँग्रेस सोडून इतरांवर फार कमी टीका करत आहेत. बिजेपिकडे पैसा तर प्रचंड आहेच शिवाय संघासारखी सशक्त संघटना आहे. बहुसंख्य मुर्खांचा पाठिंबा आहे. काँग्रेस थंड होऊन खातेय पण निर्णायक भूमिका ठेवण्याची धडपड दिसत आहे त्यांची. गणित चांगले बांधून घेत आहेत. सोबतीच्या पक्षांना दुखावणे नाही, अवघड जागी वेळकाढूपणा, प्रशासनातील जुन्या पापपुण्याईचा फायदा करून घेणे इत्यादी चालू आहे. भाजपा आले तर मरण आहे, काँग्रेस आली तर आजचे मरण उद्यावर इतकेच. कडबोळे यावे तर थोडा जीव तगेल बहुतेक.

मी कोन्ग्रेस समर्थक नाही. भाजप समर्थकांना प्रश्न विचारत आहे. त्यावर कोन्ग्रेस समर्थकांना प्रश्न विचारून मुद्दा विषय भरकटवून उपयोग नाही..

भाजपा नको, इतर कोणीही चालेल. शक्यतो कडबोळेच यावे अशी इच्छा आहे.

मिपावर क्लिंटन आयडी लिहायचा तसं कोणी नाहीय का माबोवर?

हा धागा वाचत राहणार.

क्लिंटन आता मिपावर तरी लिहितो का? दोन्ही काय तिन्हि चारी बाजूंनी लिहायला इथे भरपूर आहे. पण आता पूर्वीसारखे वातावरण नाही राहिले. भाजपच्य ट्रोलांनी सगळे नासवुन टाकले आहे. कुणी निंदा कुणी वंदा कायम चिखलफेक हाच आमचा धंदा झालाय. कुठे कशाला अभ्यासू निबंध लिहून त्याखाली येणार्‍या विचकट खोचक अपमानकारक प्रतिक्रिया वाचत बसायच्या. डेकोरम संपव लाय ह्यांनी. गेले ते दिन गेले.

भाजप समर्थकांना माझा एक प्रामाणिक आणि स्वच्छ प्रश्न आहे. भारतात सरकारवर नियंत्रण ठेवणारी , त्यांना हिशोब मागणारी, त्यांचे चुकले तर दाखवून देणारी, सरकारद्वारे कोणा घटकांवर अन्याय होत असल्यास त्याविरोधात आवाज उठवणारी अशी कोणतीच यंत्रणा, संस्था, पक्ष, व्यवस्था तुम्हाला नकोच आहे का? >>

अहो हेच तर हवेय भाजप समर्थकांना. तुम्ही म्हणताय तशी यंत्रणा विरोधी पक्षनेते बनून राहुलजी अगदी सक्षम रित्या चालवताहेत.
इतक्या होतकरू विरोधी पक्षानेत्याला सत्तेत आणून त्या महत्वाच्या कामात खोडा कशाला घाला? असा साधा विचार भाजपवाल्यांनी केला असेल म्हणून ते बिचारे हृदयावर दगड ठेऊन मोदींना पाठिंबा देतात, बाकी काही नाही.

भाजप जिंकला तर इवीएममुळे, आणि, इतर कोणी जिंकले तर तो जनादेश>>> आधी तो हारायचा तेंव्हा तो इवीएममुळे असा शोध लावला गेला होता, त्याचीच ही फळे आहेत.

हेला मी एकेकाळी भाजप समर्थक होतो
त्यामुळे मी उत्तर द्यायचे प्रयत्न करतो

तुम्ही म्हणताय ती यंत्रणा असणे हे कुठलेही सरकार असले तरी आवश्यक आहे, कोणत्याही एका व्यक्तीला पक्षाला अमर्याद अधिकार मिळाले की काय होते याची इतिहासात अनंत उदाहरणे आहेत
त्यामुळे माझी मनापासून इच्छा आहे की सत्ताधारी पक्षाला सतत वचक असावा अशी एक सक्षम यंत्रणा असलीच पाहिजे

आणि मोदी सरकारने अपेक्षा भंग आणि अनेक अनाकलनीय निर्णय घेतले असले तरी त्यांना पर्याय म्हणून अद्याप महागठबांधन मधले मायावती, ममता, राहुल गांधी यांच्या हाती सत्ता यावी असे वाटत नाही. भाजप परवडले पण हे नको अशी सुंदोपसुंदी करून वाट लावतील अशी भीती आहे
जसे इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाही नंतर जनता दलाच्या कडबोळी सत्तेने सावळा गोंधळ केला तसे काहीसे होईल असे वाटत आहे.

यामुळे पुढील 5 वर्षासाठी भाजप कडेच सत्ता राहावी पण राहुल गांधी च्या नेतृत्वाखाली एक समर्थ विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस ने बळकट व्हावे, त्यांनी इतक्यात आपली प्रतिमा बरीच चांगली केली आहे असे एक सामान्य नागरिक म्हणून वाटते, अजून 5 वर्षात ते अधिक परिपकव होतील आणि मग पुढची टर्म काँग्रेस कडे जायला हरकत नाही.

अहो हेच तर हवेय भाजप समर्थकांना. तुम्ही म्हणताय तशी यंत्रणा विरोधी पक्षनेते बनून राहुलजी अगदी सक्षम रित्या चालवताहेत.
इतक्या होतकरू विरोधी पक्षानेत्याला सत्तेत आणून त्या महत्वाच्या कामात खोडा कशाला घाला? असा साधा विचार भाजपवाल्यांनी केला असेल म्हणून ते बिचारे हृदयावर दगड ठेऊन मोदींना पाठिंबा देतात, बाकी काही नाही.

अनुमोदन....

कॉग्रेसकडे पंतप्रधान पदासाठी रागा सोडून बरेच चांगले पर्याय आहेत. ते जोपर्यंत पुढे येत नाहीत. तोपर्यंत त्यांना मतदान करण्यात काही अर्थ नाही.
उदा. निलंकेणी, सचिन पायलट.

नाही असे वाटत, कुठल्याही पक्षाकडे कायमस्वरुपी अशी सत्ता राहूच शकत नाही. आणि मला खात्री आहे राहूल गांधी एक समर्थ पर्याय म्हणून पुढे येत आहेत. पण आता या क्षणी त्यांच्यावर पंतप्रधानपदाची धुरा दिली तर कितपत सांभाळू शकतील याची खरोखरच शाश्वती वाटत नाही. यापेक्षा आगामी ५ वर्षात कॉंग्रेसची तळापासून बांधणी करत, राजकारणातल्या खाचाखोचा शिकत, आणि संयमी, विचारी नेतृत्व म्हणून आल्यास खात्रीने जनता कॉग्रेसच्या परड्यात मते टाकेल.

भाजप जोवर त्यांच्या सत्तेच्या माज चढलेल्या नेत्यांना, आणि उन्मादी समर्थकांना आवरत नाही तोवर त्यांचे भवितव्य टांगणीवरच राहणार. आणि ते आवरूही शकत नाहीत कारण त्यांच्याच मुळे ते सत्तेवर आहेत, त्यामुळे हे माकडचाळे सहन करणे त्यांना भागच आहे.

मोदी एकेकाळी समर्थ कणखर व्यक्तिमत्व म्हणून आल्याने बरे वाटलेले पण हास्यास्पद विधाने, खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका आणि एकामागून एक खोटे बोलण्याची स्पर्धा यामुळे विश्वास गमवून बसले आहेत.

पण आपल्या दुर्दैवाने मोदींना समर्थ पर्याय म्हणून गेल्या ५ वर्षात एकही पक्ष, व्यक्ती आलेला नाही. ना विरोधी पक्षात, ना भाजपात. त्यामुळे त्यातल्या त्यात जो कमी वाईट असेल त्याला जनता निवडेल हेच खरे.

त्यातून निवडून येणाऱ्या कुणालाही भाजपाची दारे उघडल्याने सगळे हौशे नवशे गवशे तिकडे धावत सुटलेत, त्यामुळे आज या पक्षात उद्या त्या, आणि आज भाजपाला शिव्या देणारे उद्या त्यांच्या गळ्यात गळे घालणारच नाहीत याची काहीही शाश्वती नाही.

मला वाटत नाही आजच्याइतका मतदार यापूर्वी कधी गोंधळला असेल. लाखो कोट्यांवधीचा चुराडा करून होणारी ही निवडणूक काय साध्य करणार आहे देव जाणे

हि टर्म भाजपकदे गेलि कि पुढच्या टर्म विसरा.
Submitted by हेला on 14 March, 2019 - 15:33

भाजप / काँग्रेस किंवा तिसरी आघाडी यांच्या पैकी कुठल्याही समर्थकाला विचारले तरी ९९.९९ टक्के लोकांचं हेच उत्तर असणार आहे.

@ आशु चॅम्प, नेमका to the point प्रतिसाद. पण तीन तीन आघड्यांचा
घोडेबाजार असताना, मोदी शिवाय दुसरे तगडे नेते अजूनतरी दिसत नाहीत. आणि ज्या हिशेबाने काँग्रेसमध्ये कडबोळी असताना कारभार मुंगीच्या गतीने चालत होता, तसा पुन्हा बहुतेकांना नकोय.
काँग्रेसच्या विटेपेक्षा भाजपचा दगड परवडला, अशीच भावना बऱ्याच लोकात आहे. त्यामुळे यावेळीतरी मला सत्ताबदल किंवा कडबोळे होईल अस वाटत नाही.

Pages