महिला दिन? ते काय असतंय?

Submitted by टोच्या on 8 March, 2019 - 09:47

कालच्या अंगमोड मेहनतीनं ठसठसणार्या हाडांकडं दुर्लक्ष करून ती भल्या पहाटे उठली. नवर्‍याचा चहा, न्याहारी, पोरांचा डबा, पोरींची येणीफणी, धुणंचुणं आवरून दिवसभराचं रांधून ती शेतावर रोजंदारीवर निघाली, तेव्हा तिचं पोरगं म्हणालं, 'माय, महिला दिनाच्या तुला सुबेच्च्या'... लेकराकडं कौतुकानं पाहत माय म्हणाली...' ते काय आसतंय रे? '

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

<<महिला दिन - जाता जाता हे ही बघा>>
गिरीश, सगळ्या सरकारी इस्पितळांत हीच परिस्थिती असते.

<<छोटीशी कथा आवडली.>>
अॅमी, धन्यवाद

उर्मिला, महिला दिनाच्या शुभेच्छा!
उर्मिला : हा हा हा ! काय अस्त ते ताई
आमच्या घरातला संवाद!

महिला दिनी खर तर ग्रामीण भागात राहून अतिशय प्रतिकुल परिस्थिती मध्ये यश संपादन केले आहे मग ते छोटे का असेना आशा महिलांचा सत्कार करून त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे आस मला वाटतं .

किरणद्दीन यांनी दिलेली बातमी भयंकर आहे. फार दु:ख झाले वाचुन. आशा आहे त्या लोकांना लवकर पकडुन जन्मभर तुरुंगात ठेवतील.

शाली यांनी लिहिलेले पण धक्कादायक तितकेच राग आणणारे आहे. पण इतर लोकांना दिसत असुन काही बोलत नाहीत हेही धक्कादायक आहे.

महिला दिन रोज असायला हवा.

पुरुषांनी एकच दिवस महिलादिन ठरवलेला पाहून जर महिलांनी वर्षातला एकच दिवस ' कष्ट करायचा दिवस ' / ' घरातल्यांची काळजी करायचा दिवस' करायचा ठरवला तर काय होईल विचार करा...!

महिला दिन साजरा करायला काहीचं हरकत नाही. पण ज्या महिला हा दिवस साजरा करतात त्या मुळात टुकार असतात. घरी नवरा श्रीमंत असतो आणि आपण किती गडे आधुनिक असा गैरसमज करुन ह्यांचा महिला दिन साजरा होतो. त्यांचे कपडे की लक्तरे बघून मला कीव येते. बायकांचे खरे प्रश्न खूप खोलवर आहेत. खास करुन दलित आणि मुसलमान बायकांचे. दलितांकडे शिक्षण नाही आणि मुसलमान बायकांकडे तर स्वातंत्र्याचं नाही. गर्भपात अजून एक भीषण समस्या आहे. गर्भ मुलीचा असला तर तो नको असतो. मुलाचा असला तर एक काय चारपाचही मुलगे चालतील.

इकडे महिला दिना च्या दिवशी बायका शॉपीन्ग ला निघतात, असे ही महिन्यातून ५ वेळा फॅशन बाजारात जातातच पण महिला दिन ला तर निकड असल्या सारख्या जातात, ५००, ७०० $ खर्च करून मग हाय टी, आणि तत्सम एन्जॉयमेन्ट होते मग घरी दमून भागून परत येतात.

आम्ही नोकरदार स्त्रिया, वेळ काढून बझार ला आलो नाही म्हणुन आमच्या नावाने गॉसिप होते, शिष्ट म्हणवले जाते, वगैरे.
थोड्या फार प्रकारात देशा परदेशात असे चालते ..

Pages