गिनी पिग (शतशब्दकथा)

Submitted by अनन्त्_यात्री on 6 March, 2019 - 05:14

प्रणव, दहावीत लिहिलेले निबंध हे माझं शेवटचं मराठी लेखन. कसा जिंकणार मी "कांदाभजी" संस्थळाच्या शशक स्पर्धेत?"-मी
" अबे, बिंधास लिही. जिंकशील"
" प्रणव, प्रयत्न करून थकलोय रे, पण जमतच नाय"
" ठीकाय, ह्या "खास"पेनने लिहून बघ. हे पेन नोबेल विजेते शास्त्रज्ञ नारगोळकरांना आजच मी बँकेत सही करायला दिलं होतं "
" तुझ्या पेनने काय वेगळे दिवे लागणार? पण दे."
.
प्रणवचं पेन लिहायला घेतलं अन शशक झरझर सुचत गेली. मग फटाफट टंकून "कांदाभजी" वर टाकली.
.
माझ्या विजेत्या कथेला प्रतिसाद देणाऱ्या बहुतेकांनी लिहिलं होतं "कसलेल्या वैज्ञानिकाने लिहिल्या सारखी उत्तम जमलीय."
.
प्रणवच्या "ब्रेन-हॅकिंग-पेन" च्या यशाने मी स्तिमितही झालो होतो....अन चिंतितही !

(अन्यत्र पूर्वप्रकाशित)

Group content visibility: 
Use group defaults

भारीच!
पुन्हा एकदा वाचायला मजा आली!

सहीये ! कांदाभजी Wink Lol
बऱ्याच श श क वाचल्या एवढ्यात .. पाऊस च पडलाय असं दिसतंय माबो वर

छान आहे शशक !!! प्रणवने ब्रेन-हॅकिंग-पेन चा प्रयोग करण्यासाठी लेखकाला गिनिपिग बनवले. लेखक त्या पेनच्या फायद्यामुळे खुश झाला तर त्याचा दुरुपयोग केल्यास होणाऱ्या संभाव्य धोक्यांमुळे चिंतीत झाला.

सुंदर....

दक्षिणा, प्रि तम : कृपया गोल्डफिश यांनी दिलेले स्पष्टीकरण वाचा.
कथालेखक तर गिनीपिग झालाच आहे पण शास्त्रज्ञ नारगोळकरही नकळत गिनीपिग झाले.

पहिल्यांदा वाचल्यावर समजली नव्हती पण गोल्डफिश नी दिलेले स्पष्टीकरण वाचून परत वाचल्यावर कळली...छानच झालीय

छान.
या विषयावर खरेतर मोठी विज्ञानकथा यायला हवी..! Happy