संस्कार

Submitted by mrunal walimbe on 4 March, 2019 - 21:39

आजकाल संस्कार या विषयावर खूप सारे परिसंवाद आयोजित केले जातातं. संस्कार म्हणजे काय अन्
ते कसे करायचे, कधी करायचे, कुणी करायचे यावर खूप चर्चा मतमतांतरे आहेत... असं जरी असलं तरी शेवटी प्रत्येक मुलं हे त्याच्या घरातल्या आई वडिलांच्या आजी आजोबांच्या कृतीतून, वागण्यातून ,बोलण्यातूचं शिकतं असतं अन् तेचं ग्रहण करत असतं..
त्यासाठी वेगळं असं संस्कार शिबिर लावायची काहीच गरज नसते...
पुर्वी आम्ही लहान असताना आजी आजोबा यांनी म्हणलेली देवाची स्तोत्र, आरत्या कानावर पडून आपसूकच पाठं व्हायच्या..
आम्हाला सवय होती लहानपणी शुभं करोती पाढे असे सर्व म्हणायची त्यामुळे आम्हाला पाढे वेगळे कधी पाठचं नाही करायला लागले.. पणं
पाढे परवचा म्हणण्याची पूर्वीची पध्दत आता मोडीत निघालीये
त्यामुळे चं तरं घरच्या घरी संस्कार कसे होणार हा प्रश्न पडतो पालकांना..
मला अजूनही आठवतं मी लहान असताना आजी सकाळी झोपेतून उठल्या उठल्या
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती।
करमूले तू गोविंदःप्रभाते करदर्शनम्।।
हा श्लोक म्हणायची.. कित्येक दिवस अर्थ माहित नव्हता पणं कानावर पडून पडून श्लोक पाठ झाला होता.. असचं एक दिवस मग आजीला अर्थ विचारला तेव्हा तिने झटक्यात हा अर्थ सांगितला..

हाताच्या अग्रभागी लक्ष्मी वास करते. हाताच्या मध्यभागी सरस्वती आहे आणि मूळ भागात गोविंद आहे; म्हणून सकाळी उठल्याबरोबर हाताचे दर्शन घ्यावे. 
म्हणून चं मला असं वाटतं मुलांना जर संस्कारक्षम बनवायचे असेल तर त्याला पोषक असे घरातील वातावरण बनवले पाहिजे ज्यायोगे ते आपसूकच काही संस्कार शिकतीलं..जसं देवाधर्माचं आहे तसचं व्यवस्थितपणा, शिस्तबद्धता, आपल्या साठी खपणाऱ्या व्यक्तींबद्दलचा आदर अन् सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतः बद्दल चा आत्मविश्वास ना की प्रौढी..
त्यामुळे संस्कार या शब्दाचा खरा अर्थ जाणून घ्या अन् त्याचा बाऊ करण्यापेक्षा.. सोप्या सरळ साध्या पध्दतीने मुलांच्या कलाकलाने त्यांना या गोष्टी शिकवा म्हणजे मग त्यांच्या सारख्या सुसंस्कृत मुलांची नवीन पिढी तयार व्हायला वेळचं लागणार नाही..

संस्कारांचं विद्यापीठ म्हणजे
आपुलं घरटं
आई बाबा हेचं त्यातील शिक्षकं
आजी आजोबा तर
त्याचे कुलगुरू
अ आ इ ई मुळांक्षरांबरोबर
गिरवीती आयुष्याचे
मोठे मोठे धडे
अन् शिकून बाहेर पडती
सुसंस्कृत सुविद्य असे
नवीन पिढीचे
नव्या दमाचे हे सारे
पोशिंदे
इतरांनाही टाकती मागे
कुठल्याही कामामध्ये
पुढेचं असती चार पावले
अभिमानाने अन् गर्वाने
ऊरं भरुनी येई
पाहताना हे सारे आपुले बछडे
कंठ दाटूनी येई
कंठ दाटूनी येई

©मृणाल वाळिंबे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults