हकालपट्टी - शतशब्दकथा

Submitted by किल्ली on 4 March, 2019 - 06:47

"ती भयाण कुरूप दिसते. तिचं ते टक्कल पडलेलं बोडकं डोकं पाहिलं की मला भीतीच वाटते. मला तिच्याकडे नाही जायचं."
"असं म्हणून कसं चालेल, तुला मूळ स्थानी परत जायलाच हवं”
"तिच्याकडे गेलं की रुक्ष, भकास वाटत राहतं, नकारात्मक लहरींनी तनमन व्यापून जातं आणि उदास छाया पसरून राहते. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे माहिती असूनही तू मला तिच्याकडे पाठवत आहेस. तुझ्याशिवाय मी क्षणभरही राहणार नाही. तुझी चंदेरी कांती, लालसर केस, सोनेरी डोळे ह्यांनी मला मोहून टाकलंय. मी इथेच राहीन."
“तिच्या वाईट अवस्थेला तूच जबाबदार आहेस, आईवर ही वेळ आणू शकतोस तर मी कोण!”
असे म्हणून तिने त्या मानवाला अंतरिक्षमार्गे पृथ्वीवर ढकलून दिले.
----------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगायोग!

मी सध्या चौघीजणी वाचत आहे. तर काल रात्री वाचत असताना मी चक्क हकालपट्टी शब्द वाचला.
Happy
त्यानिमित्ताने मी इथे मी जी वर शंका उपस्थित केलेली तिचं निरसन झालं असं सांगते. Happy

त्यानिमित्ताने मी इथे मी जी वर शंका उपस्थित केलेली तिचं निरसन झालं असं सांगते>>> हे एक बरं झालं Happy
धन्यवाद प्राची, निधी , मीरा, जुई, सस्मित, रत्न Happy
(येथे पण धन्यवाद गर्ल्स आणि रत्न असं चालल असतं, कित्ती मुली आहेत माबोवर!! )

खरंय...

एके काळी मानवाला पृथ्वी अन्तराळातुन निळी दिसली होती, आता कय होणार, काय दिसणार देव जाणे..
आपणच आपला विनाश ओढवुन घेत अहोत

मस्त कथा
थोडक्यात पण जास्त आशयपूर्ण !

Pages