हकालपट्टी - शतशब्दकथा

Submitted by किल्ली on 4 March, 2019 - 06:47

"ती भयाण कुरूप दिसते. तिचं ते टक्कल पडलेलं बोडकं डोकं पाहिलं की मला भीतीच वाटते. मला तिच्याकडे नाही जायचं."
"असं म्हणून कसं चालेल, तुला मूळ स्थानी परत जायलाच हवं”
"तिच्याकडे गेलं की रुक्ष, भकास वाटत राहतं, नकारात्मक लहरींनी तनमन व्यापून जातं आणि उदास छाया पसरून राहते. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे माहिती असूनही तू मला तिच्याकडे पाठवत आहेस. तुझ्याशिवाय मी क्षणभरही राहणार नाही. तुझी चंदेरी कांती, लालसर केस, सोनेरी डोळे ह्यांनी मला मोहून टाकलंय. मी इथेच राहीन."
“तिच्या वाईट अवस्थेला तूच जबाबदार आहेस, आईवर ही वेळ आणू शकतोस तर मी कोण!”
असे म्हणून तिने त्या मानवाला अंतरिक्षमार्गे पृथ्वीवर ढकलून दिले.
----------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानवानी पर्यावरणाचे नुकसान केले आणि पृथ्वीला भयाण, ओबडधोबड केली आणि मग नवीन वस्ती करायला दुसऱ्या ग्रहावर जाऊन राहतोय पण तेथील रहिवासी त्याला म्हणताहेत कि तुझ्या आईच्या ( पृथ्वीच्या) विनाशाला तूच कारणीभूत आहेस, तिचा विनाश केलास आता इथे आमचा विनाश करशील असं म्हणून त्याला पृथ्वीवर ढकलून देतात. (हा प्रतिसाद ह्या शशकला मिळालेला, मिपावरून)

मस्त किल्ली.

मला प्रतिसाद वाचायच्या आधीच समजली कथा. Happy

चंदेरी म्हणजे चंद्र असेल, लालसर म्हणजे मंगळ असे वाटते ना वाटते तोवर, तिने त्याला ढकलले असं वाक्य आले.
ग्रह तर तो असतो ना मग तिने म्हणजे कुणी ढकलले मानवाला असे वाटले होते

नेहमप्रमाणेच मस्तच किल्ली Happy ... वाचतानाच वाटले आपल्या पृथ्वी बद्दलच आहे.. थोड्या शब्दात खूप चांगला मेसेज आहे

धन्यवाद मंडळी Happy
शशक माझा आवडता कथाप्रकार आहे Happy
चटकन लिहुन (टायपायचा कंटाळा आणि वेळेचा अभाव आहे हो) होतो, क्रमश ची भान्गड नसते Happy Proud
एक मात्र आहे की शशक लिहीताना विचार मात्र खुप करावा लागतो.

हकालपट्टी असतो की हाकलपट्टी?>> सस्मित तै, मीन राशीच्या लोकांना कन्फुज करू नये, ते आधीच महा कन्फुझ असतात.
लगेच पटतं त्याना कोणी काहीही सांगितल तरी Lol

हकालपट्टी असतो की हाकलपट्टी>> पहिलं असावं

हकालपट्टी असतो की हाकलपट्टी>> पहिलं असावं. >>>>.नाही, हाकलपट्टी शब्द बरोबर आहे.

सस्मित, गुड पॉइंट. मला पण प्रत्येक वेळेस वाचताना ठेच लागत होती.

किल्लीतै छान जमलीय शशक! Happy आवडली. इथे परत वाचली. Happy

हकालपट्टी असतो की हाकलपट्टी?>> मला हकालपट्टी च बरोबर वाटतंय .. गेल्यावर्षी मराठीच्या पुस्तकात हकालपट्टी असाच शब्द होता..
आताच तपासलं, नवनीत डिक्शनरीत हकालपट्टी म्हणून शब्द आहे. Happy

क्रियापद म्हणून वापरताना हाकलणे वापरतात, पण हकालपट्टी चं हाकलपट्टी करत नसावेत.. ( पण मला हाकलपट्टीच सोयीचं वाटतंय Lol )

Pages