Submitted by पुरंदरे शशांक on 4 March, 2019 - 01:27
हर हर महादेव
उमापति थोर । सांब सदाशिव । हर हर महादेव । कैलासीचा ।।
गजचर्मधारी । विभूती लेपन । त्रिशूल धारण । डम्रुसह ।।
योगीयांचा योगी । देवांचाही देव । मुळींचा प्रणव । आदिनाथ ।।
आशुतोष रुद्र । भैरव शंकर । नामे शुभंकर । वोळखिजे ।।
संसारी-विरक्त । कृपाळू-संहारी । ऐसा मदनारि । वर्णवेना ।।
साष्टांग नमन । एकविध भावे । भक्ती योग द्यावे । दीनालागी ।।
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप सुरेख शब्दात शिवस्तुती
खुप सुरेख शब्दात शिवस्तुती केली आहे. सुंदर!
खुप सुरेख शब्दात शिवस्तुती
खुप सुरेख शब्दात शिवस्तुती केली आहे. सुंदर!>><+१
ॐनम:शिवाय सुंदर शिवस्तुती
ॐनम:शिवाय
सुंदर शिवस्तुती
सुंदर! ॐनम:शिवाय!!
सुंदर! ॐनम:शिवाय!!