गुलाब

Submitted by सुरज जगधने on 2 March, 2019 - 11:01

गुलाब
तू एक गुलाब आहेस
काटयांनी वेढलेलं
मी एक दवबिंदू
भल्या पहाटे पडलेलं
पडून-पडून मी
तुझ्याच मिठीत येऊन पडलो
इकडे-तिकडे बघूण
दुसऱ्या दवबिंदूवर हसलो
गुलाबी तुझ्या मिठीत
मी स्वतःलाच विसरलं
पाणी असून माझं जीवन
मोत्यासारखं बहरलं
गार गुलाबी थंडी
त्यात तुझी गोड मिठी
किती छान असतात ना
प्रेमाच्या गाठी-भेटी
हितगुज आपलं चालू असताना
नजर तुझ्यावर कुणाचीतरी गेली
गुलाबा,तोडलं तुला अन
साथ आपली तिथचं सुटली
तरीही मी तुझ्या मिठीत
होतो तुला घट्ट चिटकून
मातीमोल केलं गं मला
तोडणारयांनी झटकून-झटकून....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults