Submitted by शब्दरचना on 2 March, 2019 - 09:14
मी अनंतात लोपले,
सोडून पाश तुझे मागे,
तू ओल्या संध्याकाळी एकटा
सैरभैर होशील का?
मी ना उरले मागे,
समजाया तुझी व्यथा,
तसबिरीसमोर तु माझ्या
पुन्हा एकदा मांडशील का?
मी ना आता गाया भूपाळी तेथे,
ना पुकाराया तुला पहाटे,
जाणिवेने तळमळून ह्या,
मध्यरात्री उठशील का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तू एकटाच बसोनि तसबिरीसमोर
तू एकटाच बसोनि तसबिरीसमोर माझ्या
या वाक्याने कवितेतली लय जातेय, या ओळीतले दोन शब्द जर कमी करायला हवेत.
सुचनेसाठी आभार. आशा आहे आता
सुचनेसाठी आभार.