रात्र वैऱ्याची आहे! सावध असा ! दक्ष असा !!

Submitted by अँड. हरिदास on 28 February, 2019 - 03:57

रात्र वैऱ्याची आहे! सावध असा ! दक्ष असा !!

पुलवामावर झालेल्या भ्याड भीषण आत्मघाती हल्ल्यानंतर 12 दिवसांनी भारताने पाकिस्तानला जबरदस्त तडाखा दिला. भारतीय वायुसेनेच्या लढवय्यांनी पाकमध्ये घुसून ४० च्या बदल्यात ४०० अतिरेक्यांना यमसदनी धाडलं. कोट्यवधी भारतीयांच्या जे मनात होतं, अगदी तसाच सव्याज बदला भारताच्या शूरवीर सैनिकांनी घेतला. वास्तविक, भारताने केलेला एअर सर्जिकल स्ट्राईक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आत्मसंरक्षणार्थ उचललेलं पाऊल होते. कारण, पुलवामा हल्ल्याचे सूत्रधार जैश ए महोम्मद चे दहशतवादी भारतावर पुन्हा मोठा हल्ला करण्याचे नियोजन करत असल्याची सबळ माहिती भारताला मिळाल्याने त्यांचा खात्मा करणे जरुरीचे होते. त्यानुसार भारत सरकारने नियोजनबद्ध पाऊले उचलून सर्जिकल स्ट्राईक-२ पार पडले. मात्र, या कारवाईनंतर अपेक्षेप्रमाणे बिथरलेल्या पाकिस्तनाकडून भारतावर प्रतिहल्ला करण्याचा फुसका प्रयत्न केला जातोय. ना 'पाक' वलग्ना करून खोटीनाटी माहिती पसरविल्या जातेय. त्यामुळे सीमारेषेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थात, पाकच्या प्रत्येक कुरापतीला रोखठोक उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सक्षम आणि सज्ज आहे. पाकड्यांनी आगळीक केलीच तर त्यांना चारीमुंड्या चीत केल्या जाईल, यात शंका नाही. मात्र, युद्ध फक्त रणभूमीवरच खेळल्या जात नाही तर अनेक पातळ्यांवरून ते लढल्या जात असते.. युद्ध फक्त सैनिक लढत नाहीत तर देशाच्या नागरिकांनाही संयमाचे आणि विवेकाचे युद्ध लढावे लागत असते. त्यामुळे विद्यमान नाजूक परिस्थितीत भारतीय नागरिकांनी सावध आणि दक्ष राहण्याची गरज आहे. समाजमाध्यमवर व्यक्त होतांना संयम आणि विवेकाचं भान प्रत्येकाने ठेवायला हवे. राष्ट्रीय अस्मितेच्या आणि देश सुरक्षेच्या मुद्दयांवर कुणीही राजकारण करु नये. देशांतर्गत शांतता बाधित होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. समोरून वार करणाऱ्याची छाती चिरता येते. मात्र, पाठीत वार करणाऱ्याचा घाव रोखता येत नसतो. तेव्हा, जन हो सावध असा ! दक्ष असा !!रात्र वैऱ्याची आहे !!!

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तनाला राजनीती आणि रणनीती या दोन्ही पातळ्यांवर घेरले आहे. एअर सर्जिकल स्ट्राईक द्वारे भारताचे सैन्य कशाप्रकारे पाकची धूळधाण उडवू शकते, याच एक ट्रेलर भारतीय वायुदलाने दाखवून दिले. मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेत आणि पाणी अडविण्याचा निर्णय घेऊन भारताने राजनैतिक पातळीवर पाकच्या नाकातोंडात पाणी आणले. या परिस्थितीत बेभान झालेला पाक पलटवार करणार हे अपेक्षितच होते. सवयीप्रमाणे यावेळीही पाकने छुपा वार करण्याचा प्रयत्न केला. काल पाकच्या ३ लढाऊ विमानांनी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला. अर्थात सावध आणि दक्ष असलेल्या भारतीय सैन्याने त्यातील एका विमानाला नस्तेनाबूत करून दोघांना पिटाळून लावले. मात्र त्यानंतर पाकने खोटानाटा कांगावा करत भारताची दोन विमाने पाडल्याचा दावा केला. वास्तविक, हवाई संघर्षात भारताचे एक ‘मिग-२१’ विमान पडले आणि एक वैमानिक पाकच्या ताब्यात सापडला होता. भारतीय सैन्याने पाकचा खोटारडेपणा तात्काळ जगासमोर आणला आहे. मुळात, भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकची भंबेरी उडाली आहे. पाकिस्तानी जनतेची किमान दिशाभूल करण्यासाठी काहीतरी खोटेनाटे पसरविणे ही पाकी नेतृत्वाची अपरिहार्यताच म्हणावी लागेल. कारण भारताच्या भूमिकेनंतर पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाल्यासारखी परिस्थिती आहे. सामान्य माणूस काहीसा भेदरलेला आहे. त्यामुळे त्यांची दिशाभूल करून जनतेचे मनोबल राखण्याचा केविलवाणा प्रयत्न पाक नेतृत्वाकडून केला जातोय.

भारताने कधीच युद्धाची भाषा केली नाही.. पाकिस्तानी आगळीक सुरु असतानाही भारताची भूमिका संयमाचीच होती. आताही भारताने कोणत्याही देशाविरोधात कारवाई केलेली नाही. जैश च्या दहशतवाद्यांनी पुलवामा हल्ला करून माणुसकीचा मुडदा पडला. त्यामुळे मानसुकीच्या या शत्रुंना अद्दल घडविणे गरजेचे होते. हवाई दलाच्या कारवाईमध्येही फक्त दहशतवादी तळेच लक्ष करण्यात आली. आजही आमचे युद्ध मानसुकीचे शत्रू असलेल्या दहशतवाद्यांविरोधातच सुरु आहे. त्यामुळेच संपूर्ण जग भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकले आहे. अर्थातच ही बाब पाकिस्तान मान्य करणार नाही. त्याचे वाकडे शेपूटही सरळ होणार नाही. काहीनाकाही कुरापती पाक काढतच राहणार. पुलवामा हल्यात जैश आणि पाकच्या हस्तक्षेपाचे संपूर्ण पुरावे भारताने पाकिस्तान आणि जगाला सादर केले असल्याने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय राजकारणात कोंडी झाली आहे. जवळपास सर्व बलाढ्य देश विशेषतः चीन सुद्धा सध्यातरी भारताच्या बाजूने उभा राहिल्याचे दिसतेय. त्यामुळे, पाकिस्तानची घाबरगुंडी उडालीये. पण तरीही पाकिस्तानचं वाकड शेपूट वळवळणारचं. बिथरलेल्या पाकिस्तानपुढे सध्यातरी दोन पर्याय आहेत. त्यापैकी एक म्हणजे भारतावर हवाई हल्ले करणे; पण ते शक्य नाही. कारण, भारताच्या हवाई सुरक्षेचा नमुना पाकला दिसला आहे. शिवाय भारताचे तिन्ही दल हाय अ‍ॅलर्टवर आहे. दोन्ही देशांच्या लष्करी ताकदीवर नजर टाकली तर क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे, रणगाडे, लढाऊ विमाने, विमानवाहू युद्धनौका, पाणबुड्या, विनाशिका आणि सैनिकांची तुलना करता पाकिस्तान भारताच्या आसपासही फिरकू शकत नाही. त्यामुळेच पाकिस्तान दुसरा पर्याय वापरू शकतो, तो म्हणजे पाठीमागून वार करण्याचा.

समोर समोर टिकाव लागनार नाही हे लक्षात आल्यावर देशांतर्गत हल्ले आणि दहशतवादी कारवाया करण्याचा मार्ग पाक आणि त्याचे पुरस्कृत दहशतवादी निवडू शकतात. यासाठी केवळ काश्मीरच नव्हे, तर देशातील प्रमुख महानगरांना लक्ष्य केले जाऊ शकते. त्यामुळे आता खर्‍या अर्थाने रात्र वैर्‍याची आहे सतत सावधान राहाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. सुरक्षा यंत्रणा, गुपतचर विभाग, पोलीस याचीच नव्हे तर आपली सर्वांची जबाबदारी आता वाढली आहे. सर्वांनीच येणार्‍या काळात अत्यंत सतर्क राहिले पाहिजे. आपल्या जवळपास कोणतीही संशयित हालचाल घडत असेल, तर तत्काळ पोलिसांना कळवले पाहिजे. देशांतर्गत शांतता बाधित करण्यासाठी सोशल मीडियाच्या आधारे अफवा पसरविण्याचे कारस्थान काही विघातक शक्तींकडून रचल्या जाऊ शकते. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका.. अफवा पसरवू नका. पूर्ण खातरजमा केल्याशिवाय कोणतीही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करू नका. एअर सर्जिकल स्ट्राईक नंतर काही जण उन्मादक पोस्ट सोशल मीडियावर व्हयरल करत आहेत. पण ही वेळ राजकारणाची नाही.. आरोप प्रत्यारोपांची नाही. आपापसातील मतभेद उकरून काढण्याचीही नाही. तर एकजुटीचे देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आहे. देशाच्या सीमांची रक्षा करण्यासाठी सेना समर्थ आहे... देशाला पोखरणाऱ्या अफवा, संशयासारख्या अनेक शत्रूंशी आपण लढू या. आपल्या सैन्याचा फक्त आणि फक्त ‘भारतीय’ म्हणून लढण्याचा गुण अंगी बाणवूया. या क्षणापासून एक दिलानं एक भारतीय म्हणून उभे राहू या. कारण, रात्र वैऱ्याची आहे.. आपल्याला सतर्क राहवेचं लागेल!

--

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेत आणि पाणी अडविण्याचा निर्णय घेऊन भारताने राजनैतिक पातळीवर पाकच्या नाकातोंडात पाणी आणले. ....>>>>
नक्की काय परिणाम झाला आहे याची काही आकडेवारी वगैरे उपलब्ध आहे का?

परस्पर विरुध्ध गोष्टी समोर येत आहेत
काही लोक म्हणतात , आपण टोमाटो निर्यात थांबवली म्हणून तिकडे भाव १८० रु किलो झाले
काही म्हणतात आपण गेल्या ३ वर्षात टोमाटो निर्यात केलेच नाहीयेत कारण पाक णे बंदी घातली होती,

tv वाले म्हणतात हजारो किलो खजूर सडला,
बंदी घातल्याच्या दुसर्या दिवशी खजूर कसा सडायला लागेल?

पाणी थांबवणे - हे फक्त भारताच्या वाट्याचे आहे, त्यामुळे पाकच्या वाट्याचे पाणी त्यांना मिळत असताना (हे सगळे ३ ४ वर्षानंतरचे बोलत आहोत ) पाक च्या तोंडचे पानी का पळेल?

थोडी जास्त माहिती असेल तर द्या

पण १००० किलोचे बाँबगोळे फुटल्यावर फक्त ३००-४०० च कसे काय मरण पावतील..? नक्की किती दहशतवादी मारले गेले याचा आकडा कुठे मिळु शकेल का..?

नक्की किती दहशतवादी मारले गेले याचा आकडा कुठे मिळु शकेल का..?
नवीन Submitted by DJ. on 28 February, 2019 - 15:42
<<

नेहमी दुसर्‍याच्या बोळ्याने दुध पिण्याची सवय फार वाईट असते.
मिडीयात येणार्‍या आकड्यांवर तुमचा विश्वास नसेल तर भारतीय वैमानिकांनी ज्या ठिकाणी हजार किलोचे बॉंब टाकले तिथे तुम्ही स्वत: जाऊन खात्री करुन घ्या, की नक्की किती दहशतवादी मारले गेले ते व तो आकडा अधिकृतपणे प्रसिद्ध करा.

स्वत: जाऊन खात्री करुन घ्या, की नक्की किती दहशतवादी मारले गेले ते व तो आकडा अधिकृतपणे प्रसिद्ध करा.
नवीन Submitted by अनिरुध्द.. on 28 February, 2019 - 07:01

हाच बोळा मागे एकदा तुम्ही गांधी हत्येनंतर एका विशिष्ट समाजातील किती लोक मारले गेले विचारताना नेमका कुठे होता..??

शेवटच्या परिच्छेदातील संदेश अतीशय महत्वपूर्ण आहे. सध्याच्या सोशल मिडीया कानोकानी च्या काळात संयम आणि सतर्कता आवश्यक आहे.

<< त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका.. अफवा पसरवू नका. पूर्ण खातरजमा केल्याशिवाय कोणतीही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करू नका. >>
------ सहमत....

तुमचे याअधीचे लेख वाचलेले आहेत. छान असतात.

या लेखात, दुसर्‍याच वाक्यात "पाकमध्ये घुसून ४० च्या बदल्यात ४०० अतिरेक्यांना यमसदनी धाडलं " असा उल्लेख आहे. याची खातरजमा तुम्ही कशी केली?

४०० हा शेवटी अंदाज आहे. पण म्हणुन अतिरेकी नव्हतेच असं म्हणता येईल का?
त्यांचा आका चिडला कारण त्याचे 'तयार' केलेले माणसे मेली, म्हणुनच पाकने लष्करि हमला केला ना?
आता तर मसुद ने स्वतःच जाहीर केलय की हल्ला झालय आणी काही अतिरेकी मेले, पण तोही स्वतः सांगु शकणार नाही, किती ते?

>>मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेत आणि पाणी अडविण्याचा निर्णय घेऊन भारताने राजनैतिक पातळीवर पाकच्या नाकातोंडात पाणी आणले. ....>>>>
नक्की काय परिणाम झाला आहे याची काही आकडेवारी वगैरे उपलब्ध आहे का?>>>
याचा परिणाम एका दिवसात कसा दिसेल? पण व्यापार थांबला कि वाईट परीणाम पाक्साठी होणार हे स्पष्ट आहे न? का मिडीयासारखं - आज, आत्ता, ताबडतोब - असं काही हवय?

मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेत आणि पाणी अडविण्याचा निर्णय घेऊन भारताने राजनैतिक पातळीवर पाकच्या नाकातोंडात पाणी आणले. ....>>>>
नक्की काय परिणाम झाला आहे याची काही आकडेवारी वगैरे उपलब्ध आहे का?
स्वतः पाकिस्तान ने सांगितलं आहे कि साधारण २ अरब डॉलर चे नुकसान झाले आहे . पण त्याच सोबत बाकीच्या देशांनी सुद्धा गुंतवणूक कमी करण्यासाठी सुरुवात केली आहे , त्याचा एकत्रित परिणाम कराची स्टॉक मार्केट १४ तारखे पासून ६% पडले आणि गुंतवणूकदारांचे दिवाळे निघाले .. जेंव्हा एखादा मोठा देश असे निर्बंध लादतो त्याचा परिणाम हा होतोच..
https://lokmat.news18.com/national/india-attacked-pakistan-live-update-n...
<पाणी थांबवणे - हे फक्त भारताच्या वाट्याचे आहे, त्यामुळे पाकच्या वाट्याचे पाणी त्यांना मिळत असताना (हे सगळे ३ ४ वर्षानंतरचे बोलत आहोत ) पाक च्या तोंडचे पानी का पळेल?>
कर्नाटक ने अलमट्टी धरणाची उंची फक्त ५ मीटर ने वाढवली तरी सांगली मध्ये पूर परिस्थिती तयार होते आहे. सध्याची उंची ५१९ मीटर आहे म्हणजे फक्त १% उंची वाढवल्याने काय होऊ शकते , कदाचित ह्या मध्येच तुम्हाला ४-५% ने काय होईल हे कळून जाईल. आणि लक्षात ठेवा नदी हि भारतातून पाकिस्तानात जात आहे , आपण पूर नियंत्रण आपल्या हिशोबाने करू शकतो .
tv वाले म्हणतात हजारो किलो खजूर सडला,
बंदी घातल्याच्या दुसर्या दिवशी खजूर कसा सडायला लागेल
अहो एखाद्याचा मेंदू सडला म्हणजे खरंच सडला असे नसते , त्याला जर मागणी नसेल कि कमी किमतीत विकावा लागतो , व्यापाऱ्यांचे नुकसान होते आणि ते सरकारवर दबाव आणतात , ह्या अश्या गोष्टीनेच शत्रूचे धर्य खचीकरण होते . जरा छत्रपती शिवाजी महारांजाच्या इतिहास आठवून पहा,
तुम्हाला मोदी फोबिया आहे हेच तुमच्या पोस्ट वरून दिसते

या लेखात, दुसर्‍याच वाक्यात "पाकमध्ये घुसून ४० च्या बदल्यात ४०० अतिरेक्यांना यमसदनी धाडलं " असा उल्लेख आहे. याची खातरजमा तुम्ही कशी केली?
>>>>मान्य आहे, याला अद्याप अधिकृत पुरावा मिळलेला नाही..वृत्तसंस्थावर येणाऱ्या बातम्यांच्या आधारावरून आकडे घेतले आहेत..कदाचित यात काही कमी जास्त असू शकेल.पण, म्हणून त्याने काही फरक पडेल असं वाटत नाही. भारताचा एअर स्ट्राईक पाक च्या उरात धडकी भरवण्यात यशस्वी ठरला..हा आशय मांडायाचा होता.

<< या लेखात, दुसर्‍याच वाक्यात "पाकमध्ये घुसून ४० च्या बदल्यात ४०० अतिरेक्यांना यमसदनी धाडलं " असा उल्लेख आहे. याची खातरजमा तुम्ही कशी केली?
>>>>मान्य आहे, याला अद्याप अधिकृत पुरावा मिळलेला नाही..वृत्तसंस्थावर येणाऱ्या बातम्यांच्या आधारावरून आकडे घेतले आहेत..कदाचित यात काही कमी जास्त असू शकेल.पण, म्हणून त्याने काही फरक पडेल असं वाटत नाही. भारताचा एअर स्ट्राईक पाक च्या उरात धडकी भरवण्यात यशस्वी ठरला..हा आशय मांडायाचा होता. >>

------ तुम्हीच वर म्हणाले "पूर्ण खातरजमा केल्याशिवाय कोणतीही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करू नका. " आणि पुढे ४०० चा आकडा म्हणुन माझा प्रश्न होता. प्रत्येकवेळीच पुराव्याची अवशक्ता नसते, विश्वास पण महत्वाचा आहे. पण दोन - चार वेळा विश्वासाचा घात झाला तर मग पुढे प्रत्येक वेळेला जुमला दिसायला लागतो... तो तसा असतोच असे नाही.

आपले बोलणे/ वागणे आणि आपली प्रत्यक्षातली कृती / आचरण यांची सांगड घालणे मला महत्वाचे वाटते. घटनेचे राजकाराण करु नका, राजकाराण करु नका अशी सुरवात असते.... आणि चारच वाक्यानंतर राजकारणाचा शिरकाव होतो आणि विरोधी विचारांना दोष देणे सुरु होते...

नक्की काय परिणाम झाला आहे याची काही आकडेवारी वगैरे उपलब्ध आहे का?

>>> राजनैतिक कूटनीतीचे परिणाम नेहमी आकड्यातच मोजायचे नसतात. “दर्जा” या शब्दाला आंतरराष्ट्रीय राजकारणात एक प्रतिष्ठा म्हणून विशेष महत्त्व आहे.. दर्जा काढून घेतल्याने त्या राष्ट्राची राजकारणात नाचक्की होते. त्याच्या एकंदर भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. पाकिस्तानचा हा विशेष दर्जा काढून घेतल्याने राजनैतिक पातळीवर जो परीणाम साधायचा तो साधला गेलाच. सोबतच आकडेवारीच्या बाबतीतही हा परिणाम साधला गेलाय. 'मोस्ट फेव्हर्ड नेशन' दर्जाअंतर्गत पाकला कस्टम ड्युटी मध्ये विशेष सवलत देण्यात येत होती. ती काढून घेतल्याने पाकला आर्थिक फटका बसणार आहे.

पाणी अडविण्याचा निर्णय ही त्याच पातळीवरचा. पाणी अडवण्याची सुविधा नसल्याने भारताच्या वाट्याचे पाणी ही पाकमध्ये वाहून जात होते. आता ते पाणी भारतातच रोखण्याचा निर्णय घेऊन भारताने एक प्रकारे आपली भूमिका स्पष्ट केली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.आजवर कोणताही दहशतवादी हल्ला झाला कि भारताची प्रतिक्रिया निषेधापर्यंतच सीमित राहायची. मात्र आता भारताने नव्या नीतीची अवलंब  केला आहे. भारत नुसता प्रतिक्रियावादी नाही तर कृतीवादी आहे. हा संदेश एकंदर दृष्टीने गेम परिणामकारकचं

उदयजी, ज्यावेळी हा लेख लिहिला त्यावेळी देशातील बहुतांश सर्व वृत्तसंस्था हा आकडा दर्शवित होत्या. “जवळपास”हा शब्द वापरून या आकड्याची निश्चिती केली जात होती. त्यामुळे तो वापरण्यात आलाय. महत्त्वाचे म्हणजे त्यामागील उद्देश जर आपण लक्षात घेतला तर त्यात अफवा पसरविण्यास सारखे काहीच नाही. अर्थात, अधिकृत खातरजमा केली नाही.. (तसा कोणता पर्याय उपलब्ध नव्हता.)हे मान्य. त्याबद्दल दिलगीर आहे.

I read about 300 mobiles were active at the time of attack. I think the number can't be exact, but sure about the attack. Some channels showed the proof of attack.

Now read this
1. https://www.news18.com/news/india/defence-minister-breaks-silence-on-dea...
A day after Air Chief Marshal BS Dhanoa said the IAF cannot give an exact figure of those killed in the air strikes on a Jaish-e-Mohammed camp in Pakistan, defence minister Nirmala Sitharaman also said there was no number to give out.
and this 2. https://indianexpress.com/article/india/heard-huge-explosion-soldiers-ev...

पुलवामा बद्दल अर्णवला आधी माहीत होते , असे त्याच्या व्हॅटसप चौकशीत सापडले म्हणे

नेमके काय सुरू आहे ?

अर्णवचे व्हॅटसप ह्यावर स्वतंत्र धागा काढा , हे खरे आहे की खोटे ?

*बालाकोट हल्ल्याच्या नियोजनाची माहिती तीन दिवस आधीच अर्णब गोस्वामींना होती!*

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट उघड झाले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट रिसर्च ऑडियन्स कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट उघड झाले आहे. बालाकोटमधील हल्ल्यासह अतिशय महत्वाची माहिती गोस्वामींना आधीपासूनच असल्याचे यातून समोर आले आहे.

https://www.sarkarnama.in/desh/arnab-goswami-said-something-big-will-hap...