काहीतरी लिहावसं म्हणते..

Submitted by शब्दरचना on 27 February, 2019 - 11:28

आयुष्यात आलेल्या प्रत्येकावर
काहीतरी लिहावसं म्हणते,
त्यांना थोडफार शब्दांत
मांडावसं म्हणते,

थोडा राग-रुसवा
त्यांच्यावरचा माझा,
अन् माझ्या वरचा त्यांचा
आठवावासा म्हणते,

मी जपलेल्या 'मला'
अन् त्यांनी जपलेल्या 'मला'
थोडं तोलावसं म्हणते,

त्यांच्यामुळे मला मिळालेल्या
नव्या दृष्टीला थोड पडताळावं
म्हणते, सुखदु:खाश्रुनां थोडं
अडवावसं म्हणते,

त्यांनी घडवलेल्या मला
थोडं पहावं म्हणते,
अन् त्यांच्यामुळे घडलेल्या
मला थोडं आजमवावं म्हणते,

त्यांचे थोडे आभार
मानावे म्हणते ,
आयुष्यात आलेल्या
प्रत्येकावर काही
लिहावं म्हणते . . . !

Group content visibility: 
Use group defaults

मी जपलेल्या 'मला'
अन् त्यांनी जपलेल्या 'मला'
थोडं तोलावसं म्हणते,

वा...